३०/०५/२०१९

Article on the program on ABP Majha , which is suppose to be decide Great Savarkar as Villein



अ”प्रसन्न” करणा-या  चर्चा

पूर्वी दूरदर्शनच्या मराठी वाहिनीवर “सपट महाचर्चा” असा एक प्रायोजित कार्यक्रम सादर होत असे.
कदाचित आठवड्यातून एकदाच त्याचे प्रसारण होत असावे. या कार्यक्रमाने खूप लोकप्रियता मिळवली होती. याचे कारण सर्व चर्चा या चांगले विषय , योग्य हाताळणी , सर्वांना बोलण्याची संधी व चर्चा सुजाणपणे , सुयोग्य शब्दांत पुढे सूत्रधार. कुठेही कोणता आक्रस्ताळेपणा नाही का      दुस-याला चूप बसवण्याची घाईगर्दी नाही.  परंतू हळू-हळू विविध वृत्त वाहिन्यांचे आगमन झाले. यात मोठ-मोठ्या कंपन्या व त्यांचे बातम्या देणारे चॅनल्स आले. स्पर्धा आली. आपल्या वाहिनीला अधिक TRP मिळावा म्हणून नाना क्लृप्त्या आल्या. मग त्यात कुणाचे चारित्र्य हनन का होत असेना. नाना वाहिन्यांनावर नाना चर्चा सुरु झाल्या. सूत्रधार जणू स्वत:चीच री ओढू लागले. सर्कसीतील रिंगमाष्टर ज्याप्रमाणे एका चाबकाच्या फटका-याने मोठ मोठ्या हिंस्त्र प्राण्यांना मुकाट्याने आपल्या जागी खिळवून ठेवत असे त्याप्रमाणे हे सूत्रधार आपल्या शाब्दिक बाणांनी चांगल्या-चांगल्या वक्त्यांना मूक करु लागले. मुद्दा पूर्ण होण्याच्या आधी मध्येच बोलणे,  कुणी बोलायला लागला की वेळ कमी असल्याचे सांगणे व चर्चा आपल्याला जशी पाहिजे बरोबर त्या पद्धतीने वळवणे असे यांचे उपद्व्याप सुरु झाले. परवा “स्वातंत्र्यवीर सावरकर नायक की खलनायक” अशी चर्चा एबीपी माझा या वृत्तवाहिनीने ऐन सावरकर जयंतीच्याच दिवशी आयोजित केली होती. या चर्चेने तमाम महाराष्ट्रवासी प्रसन्न जोशी या सुत्रधारावर अप्रसन्न झाले. ज्या सावरकरांबद्दल देशातील जनतेत नेतांत आदर, प्रेम आहे त्या सावरकरांना खलनायक ठरवू पाहणारे असे चर्चेचे शीर्षक देऊन एबीपी माझाने रोष ओढवून घेतला. याच प्रकारचा विषय बीबीसी ने सुद्धा हाताळला. एबीपी व बीबीसी
यांच्यातील हा समान विषय नक्कीच काहीतरी सूचित करणारा आहे. सुनियोजित पद्धतीने बरोबर टार्गेट निवडायचे व टीका करायच्या हे यांचे व्यावसायिक फायदे मिळवण्याचे गणित. या देशातील महान नेत्यांना, त्यातही ज्यांच्या विरोधात बोलण्याने जास्त उपद्रव होणार नाही असे नेते निवडणे जेणे करून TRP तर वाढेलच शिवाय व्यावसयिक फायदाही होईल. उपद्रव मूल्य कमी असलेल्या जनतेच्या नेत्यांना टार्गेट केल्याने यांच्या कार्यालयावर कुणी हल्लेही करणार नाही व यांच्या कर्मचा-यांना कुणी मारहाणही करणार नाही. जनतेने या अशा वृत्तवाहिन्यांना ओळखणे जरुरी आहे. ज्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याच्या नावाखाली जनता ज्या नेत्यांवर प्रेम करते , ज्यांना आदरस्थानी मानते , ज्यांनी इंग्रजांच्या अत्याचा-यांचा धीराने सामना केला आहे त्या सावरकरांसारख्या स्वातंत्र्यवीर नेत्याला हेतुपुरस्सर खलनायक ठरवू पाहतात. परंतू यांच्या या अशा उपद्व्यापाला आता जाणती जनता थारा देणार नाही. नवीन पिढी आता अधिक जागरूक व आहे. पुरोगामीत्वाचा आव आणून उठ-सूठ हिंदू नेते , हिंदू देवी देवता , केवळ हिंदू धर्मातीलच प्रथा यांविरोधीच तेवढे बोलायचे हाच काय यांचा तो कार्यक्रम. एबीपी माझा व बीबीसी वरील सावरकरांना खलनायक ठरवू पाहण्याचा प्रयत्न करणारेच खलनायक ठरले आहेत. सावरकरांची प्रतिमा तर आणखी उजळून निघाली आहे. एबीपी माझा वर प्रसन्न जोशीने जरी दिलगिरी व्यक्त केली असली तरी प्रसन्न व एबीपी यांबाबत जनतेची अप्रसन्नता कदापी न संपणारी आहे.          


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा