२८/०१/२०२०

Jalees Ansari alias Dr Bomb brought to Mumbai, lodged at Arthur Road prison. Article on Ansari


 देशद्रोह्यांना हवे देहांत शासन
1993 Mumbai blasts convict Jalees Ansari
was arrested from Kanpur on Friday. (File photo)
CAA/NRC विरोध, शाहिनबाग बातम्यांच्या ओघात जलीस अन्सारीची बातमी झाकोळली गेली. मागील आठवडयात जलीस अन्सारी या 1993 मधील मुंबई साखळी  बॉम्बस्फोटात दोषी असलेल्या व पॅरोल वर मुक्त असलेल्या दहशतवाद्यास पळून जाण्याच्या बेतात असतांना उत्तरप्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने जेरेबंद केले. हा अन्सारी मुळचा मालेगावचा. एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण झाल्यावर हा अब्दुल करीम टुंडा च्या संपर्कात आला व बॉम्ब बनवणे शिकला. याच जलील अन्सारीने 1990 मध्ये दत्ता सामंत यांच्या परळ येथील कार्यालयात स्फोट घडवून आणला होता तद्नंतर मुंबई मध्ये अनेक ठिकाणी व 1993 मध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोट, शिवसेना शाखा , चित्र सिनेमा हॉल , गुरुव्दारा अशाप्रकारे त्याने  52 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले. जास्तीत जास्त जिवितहानी व्हावी अशाच पद्धतीने त्याने हे बॉम्बस्फोट घडवले आहेत. हा अन्सारी उर्फ डॉ. बॉम्ब राजस्थान मधील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना त्याला 21 दिवसांचा पॅरोल मंजूर झाला. या पॅरोलची मुदत 17 जाने रोजी संपली. त्याआधीच तो फरार झाला. अजमेर दर्ग्यात हाजीर होण्याचे त्याने वचन दिले होते शिवाय दररोज ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश होते. पॅरोल संपण्यापूर्वीच उत्तरप्रदेश मधून नेपाळ मध्ये पळून जाण्याचा
त्याचा मनसुबा होता परंतू अन्सारी कानपूर येथील मुस्लिम वस्तीत असल्याची खबर उत्तरप्रदेश दहशतवाद विरोधी पथकास लागली व त्यांनी त्याला पकडले. या घटनेवरून तरी केंद्र व सर्व राज्य सरकारांनी कायद्यात मोठे बदल करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. देशद्रोही कृत्ये , भाषण करणा-यांना इतर देशात जशा शिक्षा होतात तशा शिक्षा आपल्या देशात का होत नाही ? आपल्या देशात कायदे तर कठोर नाहीच शिवाय शिक्षा देण्यात फार मोठा अवधी लागतो त्यामुळे गुन्हा करणा-यावर म्हणावा तसा जरब बसत नाही . कालच्या पुढील तीन घटना सुद्धा त्यातल्याच

     कालची ती शरजील इमामची आसाम तोडण्याची भाषा असलेली चित्रफित, आफरीन फातिमाची सुप्रीम कोर्ट व शासनावर विश्वास नसल्याचे सांगणारी चित्रफित व AMU च्या कुलगुरूंनी त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांना हिंसा न करण्याचे आवाहन केले असता त्या विद्यार्थ्यांनी एकाच गदारोळ करून त्यांच्या भाषणातच हिंसाचार सुरु केला याची चित्रफित. शरजील जिंदाबादचे नारे. हे कशाचे निदर्शक आहे ? या देशात या देशद्रोही लोकांची एवढी हिम्मत कशी होते ? याचाच अर्थ कायद्याचा धाक नाही ? तेंव्हा सरकारने देशद्रोही कृत्ये करणा-यांना तात्काळ पॅरोल देण्याची तरतूद रद्द करावी जेणे करून पॅरोल वर असतांना डॉ. बॉम्ब सारख्यांना पळून जाता येणार नाही तसेच देशद्रोही कायदा अधिक कठोर करावा की इमाम , फातिमा सारख्यांना देश विरोधात काहीही बरळण्याची हिम्मत होणार नाही. देशद्रोह्यांना जरब बसविण्यासाठी व देशाची एकात्मता व अखंडता कायम राखण्यासाठी  देशद्रोह्यांना तात्काळ देहांत शासनच हवे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा