१७/०९/२०२०

Article about increasing numbers of Covid-19 patient in unlock phase

आमची सध्याची प्राथमिकता

“शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा“ बालपणी रोज संध्याकाळी आम्ही सर्व भावंड ही प्रार्थना म्हणत असू. संध्याकाळ झाली की आजी-आजोबा प्रार्थना म्हणण्यास सांगत असत. दिव्यापुढे म्हणावयाच्या या प्रार्थनेमुळे आरोग्य हेच आपले खरे धन आहे. हे संस्कार रुजण्यास मदत झाली. आज कोरोनाच्या काळात आपल्या सर्वांनाच आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास “First Priority” देणे अत्यंत गरजेचे आहे. 2019 च्या उत्तरार्धात चीन मधून अवघ्या विश्वात पसरलेल्या या #ChiniseVirus ने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. भारतात मार्च महिन्यात #Lockdown सुरु झाले त्या काळात भारताची कोरोनाशी लढण्याची तयारी नसल्यामुळे अत्यंत कडक असे #Lockdown पार पडले. ते केले ते योग्यच केले नाहीतर आज भारतातील मृत्यूदर हा हमखास जास्तच असता. परंतू जसे जसे #UnLock सुरु झाले. जनसामान्य मोठ्या संख्येने घराबाहेर पडू लागले. ते सुद्धा काय करतील म्हणा ! घरात राहून- राहून आता  सर्वच जण या कोरोनाला अगदी कंटाळून गेले आहेत. मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो आहे. नैराश्यातून आत्महत्या होत आहेत. #DomesticViolance च्या घटना वाढत आहेत. या सर्व परिस्थितीत सर्वानीच आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सांभाळण्यास प्राथमिकता देऊन या कोरोना विषाणूचा सामना करायचा आहे. आता #Unlock सुरु असल्याने लोक बाहेर पडत आहेत. बसेस , खाजगी वाहने यात गर्दी दिसू लागली आहे. शारीरिक दुरतेचे निकष पाळतांना जनता दिसत नाही. लोक बाहेर गर्दी करून खातांना दिसत आहेत. यामुळेच आता कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दवाखान्यांमध्ये आता खाटा रिकाम्या नाहीत , खाजगी रुग्णालये भरली आहेत. आमदार अमोल मिटकरी यांच्या मित्राला सुद्धा रुग्णालयात जागा मिळाली नाही. शिवाय तेथील खर्च सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरचा आहे. बुलडाणा जिल्ह्यात परवा एकाच दिवशी 218 कोरोना संशयित आढळून आले, खामगांवातील एकाच परिवारात दोन मृत्यू झाले. खामगांवच्याच एक पोलीस कर्मचा-याचा मृत्यू झाला. प्रशासनावर सुद्धा आता ताण आहे तेंव्हा विविध मागण्या , आंदोलने करणा-या संघटनांनी आपली आंदोलने , मागण्या यासाठी थोडी कळ सोसली पाहिजे. नाशिकला आमदार फरांदे एका सभेनंतर कोरोना चाचणीत positive आढळून आल्या. या सर्व घटनांचा अबालवृद्धांनी विचार करून अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडले पाहिजे. आपल्याला या संकटावर मात करण्यासाठी थोडा संयम , प्रतीक्षा करावी लागणार आहे या आजाराचे गांभिर्य आता या वाढत्या रुग्ण संख्येच्या काळात तरी ओळखणे जरुरी आहे.

“कोरोना संकटमे स्वयं अपने स्वास्थ्यकी तरफ ध्यान देना यही हमारी प्राथमिकता होनी चाहिये”

हा एक सूचक संदेश फिरत आहे. हा संदेश तशीच आपली “आरोग्यम धनसंपदा” , “Health is Welath” या सर्व बाबी  ध्यानात ठेवल्या तर निश्चितच बचाव होण्याची शक्यता बळावेल. आपल्या जिल्ह्यात पालक मंत्र्यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्याचे सर्वानी सुयोग्य पालन केले तर त्यातच सर्वांची भलाई आहे. सततच्या बंद , कर्फ्यू मुळे अनेकांना आर्थिक विवंचना आहे. केंद्र सरकारने पूर्वीच आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे त्याचा लाभ मिळत नसेल तर त्याचा पाठपुरावा करावा परंतू कोरोनाच्या काळात सर्वांनीच आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या आरोग्यास प्राथमिकता द्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा