भिडे यांना कुळकर्णी संबोधन, सत्य की मिथ्या ?
ज्याप्रमाणे भिडे गुरुजी यांनी थोर समाज सुधारक यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले की ती त्यांच्या आवाजाची तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेली नक्कल होती याचा तपास व्हायला पाहिजे तसाच भिडे गुरुजी यांचे कुळकर्णी हे अडनांव सत्य आहे की मिथ्या ? हे सुद्धा समोर यावे.
भिडे गुरुजी यांनी सुधारकांबद्दल केलेल्या वक्तव्यांबद्दल नुकताच वाद निर्माण झाला आहे. विधानसभेत सुद्धा त्याचे पडसाद उमटत आहे. मी काही धारकरी नाही किंवा शिवसंग्रामचा सभासद नाही तरी मला इथे एक प्रश्न उपस्थित झाला तो म्हणजे भिडे गुरुजी यांच्या अडनांवाचा. माझ्याप्रमाणेच इतर अनेकांच्या मनात सुद्धा असा प्रश्न नक्कीच उपस्थित झाला असेल. भिडे गुरुजी यांच्या अमरावती, अकोला, खामगाव येथे सभा झाल्या. अमरावतीच्या सभेनंतर समाजसुधारकांबद्दल गुरुजी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाची क्लिप समाज माध्यमांत व्हायरल झाली व एकच वादंग निर्माण झाले भिडे गुरुजींनी केलेले वक्तव्य हे त्यांनीच केलेले आहे की त्यांच्या आवाजाची तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कॉपी करून , छेडछाड करून सुनियोजितरीत्या ती व्हिडिओ/ऑडिओ क्लिप समाज माध्यमांमध्ये पसरविली गेली याचा तपास अमरावती पोलीस करीत आहे. या क्लिप नंतर खामगांव येथे निवेदने, निदर्शने झाली. अकोला आणि खामगाव येथील सभेत भिडे गुरुजी यांनी त्यांच्या सभा महात्मा फुले यांना अभिवादन करून सुरु केल्या हे सुद्धा सर्वत्र प्रसिद्ध झाले. भिडे गुरुजींच्या वादग्रस्त विधानानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली आणि कोणीतरी भिडे गुरुजी यांचे नाव मनोहर कुळकर्णी असल्याचा जावईशोध लावला तसे पाहता महापुरुषांबद्दल कोणीही चुकीची वक्तव्य करणे हे निषेधार्हच आहे. याने आपल्या समाजात जातीय तेढ निर्माण होते. त्यामुळे असले उद्गार कोणीही काढू नये. काल सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हरियाणा प्रकरणात प्रक्षोभक विधाने करू नये अशी सूचना केली आहे. भिडे गुरुजींच्या झालेल्या भाषणाबद्दल व तदनंतर प्रकाशित झालेल्या अनेक लेख व वृत्तांमधे अनेकांनी त्यांचे नांव हे मनोहर कुळकर्णी असे असल्याचे लिहिले. पुन्हा नवीन वाद निर्माण व्हावा किंवा जातीय तेढ निर्माण व्हावी असाच हेतू या अशा कृत्यामागे असल्याचे स्पष्ट होते कारण 2019 मध्ये माझी व ज्याला काही लोक फ्रॉड असे संबोधत आहे असे शिवाजी महाराजांचे 32 मण सोन्याचे सिंहासन पुनश्च निर्माण करून ते रायगडावर स्थापित करण्याचे ध्येय ऊराशी बाळगणा-या भिडे गुरुजींशी वैयक्तिक भेट झाली होती. त्यावेळी सांगलीच्या काही लोकांशी संपर्क झाला होता. आता या आठ दिवसातच भिडे गुरुजी यांंना कुळकर्णी असे संबोधल्यावर सहजच माझ्या मनात भिडे यांचे अडनाव खरच कुळकर्णी आहे का ? किंवा त्यांच्या पुर्वजांपैकी कुणाला "कुळकर्णी" ( देशमुख , देशपांडे, वतनदार यांसारखी उपाधी ) अशी उपाधी होती का ? असे प्रश्न निर्माण झाले म्हणून मी सांगलीतील काही लोकांशी संपर्क केला. हे लोक असे आहेत की जे सांगली शहरांत गेल्या 60-70 वर्षापासून वास्तव्यास आहे, त्यांचे तेथे पिढीजात वास्तव्य आहे अशी ही मंडळी आहे. अशा या मंडळींना भिडे गुरुजींचे अडनाव हे खरेच कुळकर्णी आहे का ? किंवा त्यांच्या घराण्यास पुर्वाश्रमीची कुळकर्णी ही उपाधी आहे का ? असे विचारल्यावर " हे तर आम्ही पहिल्यांदाच ऐकत आहोत" असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. "आम्ही लहानपणापासून सांगलीला राहतो परंतु भिडे गुरुजींना कुणी कुळकर्णी म्हटल्याचे किंवा त्यांचे आडनाव कुळकर्णी असे असल्याचे कधीही ऐकले नाही". असेही या मंडळींनी स्पष्ट केले. असे असल्यास भिडे गुरुजी यांना समाज माध्यमांनी व काही वृत्तपत्रांनी कुळकर्णी असे संबोधणे म्हणजे खोटी वृत्ते/ अफवा पसरवणे अशी गंभीर बाब आहे. आणि खरेच जर त्यांचे अडनांव कुळकर्णी असेल तर तसा पुरावा देणे सुद्धा जरूरी आहे. एका पोलीसाचा अपमान करण्याचे प्रकरण अंगावर असलेल्यांनी तर थेट अफझलखानाच्या वकीलाच्या घराण्याशी भिडे गुरुजी यांचा संबंध जोडला. भिडे गुरुजी यांनी खरेच थोर समाज सुधारक यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले की त्यांच्या आवाजाची तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नक्कल करून तशा क्लिप समाजात पसरवण्यात आले हे तपासांती समोर येईलच त्याचप्रमाणे भिडे गुरुजी यांचे कुळकर्णी हे अडनांव सत्य आहे की मिथ्या ? हे सुद्धा समोर यावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा