०३/०३/२०१६

Article on the occassion "Das navmi" death anniversary of Samarth Ramdas Swami a great saint and Guru of Chatrapati Shivaji Maharaj king of Maratha empire

विश्वाचा संसारी

रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांचे तर अतूट प्रेम होते.निश्चयाचा महामेरू। बहुत जनाशी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।
शिवाजी महाराजांना बहुत जनाशी आधारू बहुत जन म्हणजेच बहुजन असे म्हणणारे हे सांगणे रामदास स्वामीच होते ना !
      आपल्या पूर्वजांचे स्मरण म्हणजे कर्तुत्वाच्या प्रेरणेचा अखंड स्त्रोत. त्यांच्या चरित्रातून सर्वांना नेहमीच मार्गदर्शन मिळत आले आहे. या पूर्वजांपैकी एक म्हणजे नारायण सूर्याजीपंत ठोसर अर्थात रामदास स्वामी. 400 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्राचे अखंड प्रेरणास्त्रोत राहिलेल्या, बलोपासक रामदास स्वामीनी व्यवस्थापन, चातुर्य, वागणूक कशी असावी एवढेच काय तर स्वयंपाक कसा करावा, स्वच्छता कशी ठेवावी इ. बाबत इत्यंभूत माहिती सांगून ठेवली आहे. रामदास स्वामींच्या घरी त्यांच्या लहानपणापासूनच अध्यात्मिक वातावरण होते त्यामुळेच एका खोलीत ते विचारमग्न अवस्थेत असतांना त्यांच्या आईने विचारले “नारायण काय विचार करतो आहेस?” त्यावर

“आई चिंता करितो विश्वाची कैसे क्षेम राहील जगती ?
असे उत्तर रामदास स्वामीनी दिले. इतक्या लहानपणी विश्वाची चिंता करणाऱ्या रामदास स्वामीनी मग विश्वाच्या भल्यासाठी खूप पायपीट केली. लग्नाच्या बोहल्या वरून संसार सोडणाऱ्या आणि विश्वाचा संसार करण्यास निघालेल्या रामदास स्वामीनी संपूर्ण भारत भ्रमण केले. परकीय आक्रमकांनी केले अत्याचार , दुष्काळ पिडीत लोक, गरिबी पाहून त्यांचे मन व्यथित झाले आणि मग
माणसा खावया अन्न नाहीअंथरूण पांघरूण नाही ।।
कित्येक अनाचारी पडली कित्येक याती भ्रष्ट झाली कित्येक ते आक्रांदली मुलेबाळे ।।
तसेच
म्लेंच्छ दुर्जन उदंड । बहुतां दिवसांचे माजले बंड ।।
या कारणे अखंड । सावधान असावे ।।
असे ते व्यथित होऊन म्हणाले. आजच्या परीस्थितीत सुद्धा असेच नाही का ? आणि मग व्यथित झालेले समर्थ पंढरपूरला आल्यावर विठ्ठलाला कळवळून विचारतात
येथे का उभा श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ।।
काय केले धनुष्यबाण ।।कर कटावर ठेवून ।।
रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांचे तर अतूट प्रेम होते.
निश्चयाचा महामेरू । बहुत जनाशी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।
बहुत जनाशी आधारू , बहुत जन म्हणजेच बहुजन हे सांगणारे रामदास स्वामीच होते ना ! समर्थांनी जनतेला सर्व काही सांगून ठेवले आहे.निव्वळ दासबोध आणि समर्थ चरित्र याचा जरी अभ्यास केले तर बाकी काहीही करण्याची गरज नाही.
देह त्यागिता कीर्ती मागे उरावी । मना सज्जना हेची क्रिया धरावी ।।
मना चंदनाचे परी त्वां झीझावे । परी अंतरी सज्जना नीववावे ।।
या ओळीच पहा ना किती काही सांगून जातात . तत्कालीन समाजाला नवचैतन्य देणाऱ्या समर्थांनी माघ नवमीला सर्वांना दर्शन दिले.
माझी काया आणि वाणी । गेली म्हणाल अंत:करणी । परी मी आहे जगज्जीवनी । निरंतर ।।
आत्माराम दासबोध । माझे स्वरूप स्वत:सिद्ध । असता न करावा खेद । भक्तजनी ।।
तसेच “श्रीराम श्रीराम श्रीराम” असा घोष केला आणि इहलोकीची लीला संपविली.
दासनवमीच्या पावन पर्वावर रामदास स्वामीना सादर प्रणाम
जय जय रघुवीर समर्थ ।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा