०७/०४/२०१६

Importance of water and conservation of old Wells

पाणी आहे...नियोजन नाही
      उन्हाळा आता चांगलाच जोर धरू लागला. आपण तहान लागल्यावर विहीर खोदणारी माणसे.परंतू जर का विहीर खोदण्याचे कामच नसेल तर? आता भीषण पाणी टंचाई आणि विहिरी खोदण्याचे काम कसे नाही? असा प्रश्न आपणास पडणे स्वाभाविक आहे. आता खामगाव शहराचे म्हणाल तर आजमितीस खामगावात माझ्या माहितीतील २० विहिरी अशा आहेत कि ज्या खूप जुन्या आणि पक्क्या पाण्याच्या आहेत. (इतरही अनेक विहिरी असतील) शासन दरबारी या विहिरींची नोंद असेलच. या २० विहिरींमधील काही विहिरी खाजगी आहेत तर काही नगर परिषदेच्या. अनेक विहिरी या खाजगी होत्या त्या नगर परिषदेला हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. इतर अनेक बाबीं प्रमाणे नगर परिषदेचा या विहिरींकडे सुद्धा कानाडोळा आहे. काही अपवाद वगळता या विहिरींमधील पाणी पिण्याच्याच काय तर वापरायच्या सुद्धा कामात आजच्या घडीला येत नाही. नुकत्याच झळकलेल्या “नटसम्राट” सिनेमा मध्ये एक चहावाला नाना पाटेकरांना म्हणतो “सरकार म्हटल की ते झोपलेलच असते बघा!” तीच गत आहे. इतरही अनेक गावात अशा विहिरी व तलाव असतीलच परंतू ते उपयोगात आणले जात नाही. खामगाव जवळच इंग्रजांनी बांधलेला जनुना तलाव आहे. हा जनुना तलाव आणि या मोठ्या-मोठ्या जवळपास २०-२५ विहिरी अर्ध्या खामगावची तहान भागवू शकतात पण..... . १५-२० वर्षापूर्वी पाणी टंचाई असतांना सिव्हील लाईन्स भागातील मोठ्या विहिरीतून परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा केला होता. तसे नगर परिषदेची 24*7 पाणी पूरवठा योजना आता अंतिम टप्प्यात आहे. हा एक स्तुत्य उपक्रम आहे. परंतू भविष्यासाठी सर्वानीच या जुन्या जल स्त्रोतांचे रक्षण करणे अत्यंत जरुरी आहे. शासनाने या सर्व विहिरींवर पंप बसवून यातून नागरिकाना पाणी पुरवठा सुरु केला तर पाणी समस्येची तीव्रता थोड्याफार प्रमाणात का होईना कमी होऊ शकते. (अमरावतीला कँप रोड परिसरात एका रहिवासी भागात आजही तेथील एका विहिरीतून पाणी पुरवठा होतो) परंतू हे करण्यासाठी काहीतरी ध्यास बाळगणारे व जनतेप्रती तळमळ असणारे नेते आणि अधिकारी असायला हवेत. बेताल विधाने करणे सोडून जनतेला, जंगली व पाळीव जनावरांना तहानेने व्याकुळ होऊन मरू देवू नका. जनता मेली काय,जनावरे मेली काय आपणास त्याचे काही सोयर-सुतक नसते दुर्दैवाने परंतू अशीच गत आहे. प्रशासनास या लेखाव्दारे आवाहन आहे की त्यांनी या विहिरींची पहाणी करून स्वच्छता करून पाणी पुरवठा होऊ शकतो की नाही याचीही शहानिशा करावी. पाणी पुरवठा करणे शक्य नसल्यास त्या विहिरींचे निदान संरक्षण तरी करावे. तुम्ही जर हा उपक्रम राबविला,यशस्वी केला तर तुमचेच सर्व दूर नांव होईल. वरील उपायांवर सखोल विचार करावा हि समस्त टंचाईग्रस्त व तहानलेल्या जनतेच्या वतीने कळकळीची विनंती.
   शासन दरबारी जर का शहरातील विहिरींची यादी नसेल किंवा हरवली असेल तर माहितीतल्या विहिरींची यादी सादर करीत आहे.

इंद्र बगीचा पूरवार गल्ली
११
अकोला रोड कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ
जोशी नगर
१२
ब्रह्म वकील प्रदीप हॉटेलच्या बाजूला
मढी रोड
१३
मोठी विहीर सिविल लाईन्स
खामगाव अर्बन बँक
१४
भिडे वकिलांच्या घरासमोर
स्टेट बँक
१५
जि.प.शाळा
विकमशी चौक ते चर्च रस्ता
१६
अंजुमन शाळा
माखरिया मैदान
१७
 नाथ प्लॉट
बालाजी प्लॉट कृष्णा फोटो स्टुडीओ मागे
१८
बी एस एन एल
केला गोडाऊन
१९
गोकुल नगर
१०
एल आय सी
२०
जिजामाता रोड कोर्टा जवळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा