१८/०१/२०१८

Article related to Maharashtra Government Resolution about providing reservation and other facilities to orphan youths

‘अनाथां’च्या नाथा तुज ‘नमो’  
     काल महिला व बालविकास मंत्री पंकाजाताई मुंडे यांनी ‘अनाथ’ ही एक वर्गवारी असणार आणि या वर्गवारीची नोंद सर्व प्रकारच्या अर्जांवर राहणार जेणे करून महाराष्ट्रात जी अनाथ मुले आहेत यांना शिक्षण व नोकरी मिळवतांना नेहमीच येणारा जातीचा अडसर , जातीची नोंद नसल्याने होणारा त्रास हे सर्व दूर होणार आहे. असे माध्यमांना सांगितले. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हा कौतुकास्पद निर्णय मंत्री मंडळाने घेतला ही उचित बाब आहे. राज्याच्या प्रमुखाला जनतेच्या प्रश्नांची जाण आहे आणि त्या त्रासाचे निराकरण करण्याची तळमळ आहे हे यातून सिद्ध झाले. आजकाल तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असणा-यांना सुद्धा आरक्षण हवे आहे. संपूर्ण भारतातच मागास म्हणवून घेऊन आरक्षण लाभ घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरु आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याने एक पाऊल पुढे टाकून जे अनाथ तरूण आहेत , ज्यांना खरोखरच कुटुंब प्रमुख बनून पुढचे जीवन सुखकारक बनवायचे आहे अशा ‘अनाथ’ तरुणांचा वेगळा असा प्रवर्ग निर्माण केला आहे शिवाय त्यास 1 टक्का आरक्षण सुद्धा दिले आहे. या निर्णयानुसार शासकीय नोकरीतल्या अर्जावर जातीच्या रकान्यांसोबत आता अनाथ असाही रकाना असणार आहे. ज्यामुळे शासकीय नोकरीत 1 टक्के आरक्षण तर मिळेलच, शिवाय अनाथ मुलांसाठी आता जातीची कटकट राहणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्या पासून येन केन प्रकारेण त्यांना शह देण्यासाठी अनेक धुरंधर महाराष्ट्रात विविध मुद्दे उकरून काढून सरकारला जेरीस आणण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे हे दिसतेच चित्र आहे. तरीही सकारात्मक पद्धतीने वाटचाल करीत केंद्राच्या मार्गदर्शनाखाली फडणवीस यांची घोडदौड सुरु आहे. अनाथ मुलांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी आरक्षण तर ठेवलेच आहे शिवाय इतर सुद्धा काही चांगले निर्णय या अनुषंगाने घेण्यात आले आहे. इनोव्हेटीव्ह स्टार्टअप पॉलिसी, जमीन संपादन , इस्त्रायल सोबत सामंजस्य करार , ग्रामपंचायत कार्यालय बांधणी व इतर काही चांगल्या निर्णयांचा  समावेश यात आहे. यात अनाथ विद्यार्थ्यांच्या बाबतीतला निर्णय खरोखर वाखाणण्याजोगा आहे. समाधानकारक गुण मिळूनही एमपीएससीला मुकलेल्या अमृता नामक मुलीच्या उदाहरणावरुन मुख्यमंत्र्यानी ही घोषणा केली होती. अनाथ मुलांना त्यांचा संस्थेतील कालावधी संपल्यानंतर खुल्या जगात वावरताना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषतः त्यांचा प्रवर्ग निश्चित नसल्याने शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती आणि लाभांपासून वंचित राहावे लागत होते हे ध्यानात घेऊन काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी अनाथ मुलांसाठी विशेष प्रवर्ग तयार करण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार काल या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. म्हणूनच महिला आयोगाच्या विजयाताई रहाटगांवकर मुख्यमंत्र्यांना अनाथांचे नाथ असे म्हणाल्या तेंव्हा हे ‘अनाथां’च्या नाथा तुज ‘नमो’  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा