१५/१२/२०१९

Article regarding Rahul Gandhi's statement about V D Savarkar

सावरकरांची अवहेलना करणा-यांनो, तुमच्या कडून कोलू तरी हालेल का? -2

      राहुल गांधी पुन्हा बरळलेच. "रेप इन इंडीया" या
त्यांच्या वक्तव्या   बद्द्ल माफी ची मागणी झाली असता "माफी मागायला  मी काही राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे." असे राहुल म्हणाले. सावरकरांची उपेक्षा पारतंत्र्यात तर झालीच झाली परंतू स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा होतच आली, सावरकरांच्या मृत्यू उपरांत सुद्धा होतच आहे. यात राहुल यांच्या  बरळण्याने पुनश्च भर पडली. या देशात अद्यापही स्वतंत्र सेनानींचा असा अनादर , असा अपमान होत असेल तर यासारखे दुर्दैव कोणते. या आजच्या पिढीतील नेत्यांना झाले तरी काय ? विचारसरणी वेगळी म्हणून हे स्वतंत्रता सेनानींचा अनादर, अपमान करतात. हे सर्व बंद होणे, प्रसंगी यासाठी सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करणे जरुरी आहे. स्वतंत्र सेनानी मग ते कोणत्याही विचारसरणीचे असो त्यांचा अपमान, अनादर कुणी करूच नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून , धूर्त राजकारणी स्वत:ची राजकीय पोळी शेकण्यासाठी काहीही बरळतात, शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल करतात. हे सर्व थांबले पाहिजे. तमाम स्वतंत्र सेनानीचा आदर देशवासीयांनी, सरकारनी कायम राखणे आवश्यक आहे. कुण्या का पक्षाचे सरकार असो  खरा,प्रेरणादायी इतिहास हा शैक्षणिक अभ्यासक्रमात असलाच पाहिजे, त्यात सर्वच स्वतंत्रता सेनानींचा
सामावेश असलाच पाहिजे, त्यांचा सन्मान कायम राखल्याच गेला पाहिजे. यांच्या कडून असे म्हणवले तरी कसे जाते ? ज्या  सावरकरांचा तुम्ही असा अपमान करता , सावरकरांची महानता नाकारता, तुमचे मणिशंकर अंदमानातील सावरकरांच्या काव्यपंक्ती पुसतात. तुमच्या या असल्या व्देषपूर्ण कृतीच तुम्हाला रसातळाला नेत आहेत. सावरकरांची देशभक्ती,देशप्रेम,इंग्रज विरोधी लढा, हे तुम्ही नाकारता ?  सावरकरांनी अंदमानात भोगलेल्या यातना तुम्ही नाकारता ? सावरकरांनी अंदमानात काथ्याकुट केली . तुम्हाला सुक्या नारळाच्या शेंड्या तरी  काढता येतील का ? सावरकरांनी कोलू फिरवून तेल काढले तुमच्या कडून कोलू हालेल तरी का ? तुम्ही
समुद्राच्या तीराशी जरी उभे राहिले तर तुमचे डोळे फिरतील तो समुद्र सावरकर लांघून गेले. सावरकरांना 
स्वतंत्रता सेनानी म्हणून नाकारण्याचे जे धैर्य करीत आहात त्याने आज तुमचे जे काही अस्तित्व या देशात 
शिल्लक आहे ते सुद्धा नष्ट होईल व ते सुध्दा तुमच्याच या असल्या नतद्रष्ट आकस,व्देष भावनांच्या कृतींमुळे.

1 टिप्पणी: