१६/१२/२०१९

"Mahavikas Aaghadi government will work for 25 years in Maharashtra" article about this statement of Maharashtra CM Uddhav Thackarey

उद्धवजींचे “मी पुन्हा येईन”  
     देवेंद्र फडणवीस यांनी “ मी पुन्हा येईन” ही कविता वाचली. 
तेंव्हा  ती सर्वांना आवडली.  परंतू त्यातील  आत्मविश्वास,  मी म्हणजे माझा पक्ष, माझे आमदार हे निवडून येतील असेच देवेन्द्र्जींना अपेक्षित होते परंतू त्याची खिल्ली उडवल्या गेली व उडवल्या जात आहे. एकही सुट्टी ना घेता केलेली कामे ,पारदर्शक व्यवहार , सचोटी यातून आत्मविश्वास निर्माण झाला होता अहंकार नव्हे. त्यामुळेच देवेन्द्र्जींच्या नेतृत्वाखाली   सर्वाधिक असे 105 आमदार निवडून आले. परंतू तथाकथीत बुद्धीवादी , एखाद्याची जात काढून धर्मनिरपेक्षतेचे ढोल बडवणारे  पुरोगामी यांना मात देवेन्द्र्जींच्या “पुन्हा येईन” या कवितेत अहंकार दिसला. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सभागृहात देवेन्द्र्जींना टोमणे मारले. आता तेच उद्धवजी काल “महाविकास आघाडीचे सरकार 25 वर्षे चालेल“ असे बोलले यातील आता या वाक्याचा काय अर्थ ? महाविकास आघाडीचे सूत्रधार जाणत्या राजांना आता उद्धवजींच्या या वाक्यातून अहंकाराचा दर्प येईल की नाही ? देवेन्द्र्जी तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसे म्हणाले होते. तुमच्या महाशिव आघाडीचे महाविकास आघाडी झालेल्या सरकारला तर अजून उणे-पुरे 25 दिवसही उलटत नाही तर तुम्ही 25 वर्षांच्या गप्पा मारायला लागले. मुख्यमंत्री नागपूर विमानतळावर आयोजित सभेत बोलतांना वरील वाक्य बोलले ते “महाराष्ट्र घडवू , जनतेला
न्याय मिळवून देऊ असेही म्हणाले . मान्य आहे की , विकासासाठी स्थिर सरकार असायलाच हवे. परंतू महाविकास आघाडीचे सरकार 25 वर्षे टिकवण्यास उद्धवजी तुम्हाला नक्कीच खूप त्रास होणार आहे. परवाचे राहुल गांधी यांनी ज्या सावरकरांना तुम्ही खूप मानता , त्यांना भारतरत्न देण्याची मागणी करता त्यांचा अनादर केला. पूर्वी सावरकरांच्या अवहेलने संदर्भात बोलतांना राहुल गांधीना जोडे मारू असे वक्तव्य तुम्ही केले होते आज मात्र राहुल गांधींच्या वाक्यावर तुम्ही गप्प आहात. दिल्लीपुढे झुकणार नाही अशी तुमची भाषा होती आता ती भाषा तुम्ही फारच लवकर विसरले. ज्या मातोश्रीला आदेश देण्याची सवय आहे त्यांना आता अगदी सुरुवातीपासूनच आदेश मिळायला लागले आहेत. मुख्यमंत्री पद तुम्हीच सांभाळा हा आदेश  साहेबांनीच तुम्हाला दिला असल्याचे त्यांच्याच मुलाखतीत सांगितले आहे. अजूनही पुढे किती आदेश तुम्हाला मिळतील देव जाणे. शिवसेनेची अशी अगतिकता पाहतांना शिवसैनिक , हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेबांच्या चाहत्यांना नक्कीच दु:ख होत असेल. इंग्रजांनी जेंव्हा सावरकरांना 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा केली होती तेंव्हा ते म्हणाले होते की , “50 वर्षे इंग्रज सरकार राहिले तर !” तसेच तुमचे महाविकास आघाडीचे सरकार 25 वर्षे टिकले तर तुम्ही महाराष्ट्र घडवाल , न्याय मिळवून द्याल हे सर्व करू शकाल. तुम्ही जेंव्हा 25 वर्षे महाविकास आघाडी सरकार राहील असे म्हणता तेंव्हा ते सुद्धा ज्यात तुम्हाला अहंकार वाटला त्या “मी पुन्हा येईन” या ओळीं सारखेच नाही का ?


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा