०५/०९/२०२०

Article on the occasion of Teachers Day ( Memories of my teachers)

आमचे शिक्षक   
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला
जातो. कृतज्ञता व्यक्त केली जाते.  खरेच शिक्षकाची भूमिका फार  महत्वाची आहे.  पूर्वी खेडेगावातील शिक्षकाला विचारून सर्व कामे केली जात. गुरुजींप्रती आदराची भावना होती. ती भावना आता लोप पावली आहे. पु.लं च्या चितळे मास्तर यांच्यासारखे हाडाचे शिक्षक आता दुरापास्त झाले आहेत. परंतू आजही अनेक शिक्षक प्रयोगशील आहेत , झपाटून झोकून देऊन शैक्षणिक कार्य करीत आहेत. आजच्या दिनी प्रत्येकास त्याच्या शालेय जीवनाची व त्यांना प्रेरणादायी ठरलेल्या शिक्षकांची आठवण झाल्यावाचून राहत नाही. #whatsapp , #facebook वरील शिक्षक दिनाचे अनेक संदेश पाहून , माजी विद्यार्थ्यांचे आलेले फोन व संदेश पाहून मन भूतकाळात गेले. अगदी बालवाडी पासूनचे शिक्षक , शिक्षिका यांच्या आठवणी येऊ लागल्या. टिळक स्मारकच्या बालवाडीतील #Kulkarni बाई , त्यानंतर नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 6 (आताची #LokmanyTilakSchoolNo6) मध्ये प्रवेशित झालो. मुख्याध्यापिका #घिके बाई होत्या. पूर्वी सर्व विद्यार्थी शिक्षिकांना मॅडम , टीचर असे न संबोधता बाई असे संबोधत. घिके बाईंचा चेहरा आजही डोळ्यासमोर येतो. नऊवारी पातळ , कपाळावर ठसठशीत कुंकू असलेल्या घिके बाई शिस्तीच्या होत्या. या शाळेत मी इंगळे संरांच्या वर्गात होतो परंतू #पानट बाई , #मस्ने सर , #राठी सर , #जावरकर बाई , हे सुद्धा शिक्षक आठवतात. बसायला पट्ट्या असायच्या , काही आले नाही किंवा चुकले तर इंगळे सर मांडीवर मारत. पुढे माध्यमिक शिक्षणासाठी #AKNationalhighschool मध्ये प्रवेश घेतला. या शाळेत सुद्धा अनेक चांगल्या शिक्षक वृंदांकडून शिक्षणाचे तसे जीवनातील आचरणाचे धडे मिळाले. कडक शिस्तीच्या मुख्याध्यापिका #VanmalaAne मॅडम , शिस्तप्रिय व रामरक्षा, गीतेचे अध्याय शिकवणारे, अफलातून शिक्षा करणारे व त्या शिक्षांमधून काहीतरी धडा देणारे #MRDeshmukh सर , इतिहास अप्रतिम शिकवणारे #Sangare सर , मोत्याच्या दाण्यांसारखे हस्ताक्षर असलेले #RRJoshi, खूप प्रेमाने बोलणारे व हिंदी शिकवणारे #Tawalare सर , #Gawhande सर , गणिताचे #Satputale सर व स्व. ओंकार खंडारे सर ,  मृदूभाषिक #SanjayDeshpande सर , इंग्रजीचे #kharche सर व शारीरिक शिक्षण देणारे #kharche सर , संगीत शिक्षक #Khandare सर , खंडारे  सर अनेक चांगली चांगली गीते शिकवत त्यातून राष्ट्रीय एकतेची भावना , जातीभेद धर्मभेद न पाळण्याची शिकवण मिळत असे. #NCC चे #Puntambekar सर , नेहमी प्रेमाने बोलणारे शाळेचे क्लर्क #Korde सर, #SportTeacher #Kale सर.   या सर्व शिक्षकांनी शिकवले असल्यामुळे ही नांवे आठवतात शाळेत इतरही अनेक चांगले शिक्षक होते. पुढे #GSCollege व #NutanMarathaCollegeJalgaon #BEd चे शिक्षक वृंद , गो.से. महाविद्यालयचे प्राचार्य  #Jawandhiya सर संगणक संस्थेतील शिक्षक #MilindDandwate , #HemantKhedkar या सर्व शिक्षकांमुळे जीवनात खुप काही शिकायला मिळाले , अर्थार्जन व कुटुंबाचा रहाटगाडगा चालवणे शक्य झाले , सामाजिक भान मनात निर्माण झाले, धर्मभेद , जातीभेद न करणे शिकलो. मी व माझ्या मित्रांनी उपरोक्त शिक्षण संस्थात शिक्षण घेतले त्यातील एक समानता म्हणजे सर्व संस्थांचे मुख्याध्यापक मोठे शिस्तीचे होते. सांगण्यास आनंद वाटतो की उपरोक्त शिक्षकांपैकी अनेकांशी आजही संपर्क आहे , काहिंच्या पुढील पिढीशी संपर्क आहे कारण पूर्वी शिक्षकाच्या कुटुंबियांशी सुद्धा संवाद व आपुलकी असे. काही शिक्षक आज हयात नाही परंतू त्यांचे विचार , त्यांनी दिलेले शिक्षण , सांगितलेले किस्से, प्रसंगी कठोर व प्रसंगी तितकेच मायाळू , आपुलकीची वागणूक देणारे आमचे शिक्षक आम्हाला नेहमीच प्रेरणादायी व सदैव स्मरणात राहतील. आजच्या शिक्षक दिनी सर्वच शिक्षकांना त्रिवार वंदन. (अनावधानाने काही नावे सुटली असतील तर दिलगीर आहे, उपरोक्त लेखात त्यांचे नांव जरी सुटले असले तरी ज्या सर्वानी शिकवले त्या आमच्या सर्वच शिक्षकांचे आम्ही ऋणी राहू )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा