मुंह के चबरे.....
जेंव्हा एखाद्या राष्ट्राचा विकास खुंटलेला
असतो. आर्थिक बाजू कमजोर असते, देशात बेकारी वाढलेली असते, आणि त्या राष्ट्राचा
शेजारी प्रबळ असेल तर अजूनच वैफल्य भावना या पहिल्या देशाच्या होत असतात. देशातील
नेते, आतंकवादी नेते मग शेजारील प्रबळ देशाच्या विरोधात बेछुट वक्तव्ये करीत
सुटतात. यातील पहिले अविकसित राष्ट्र म्हणजे पाकिस्तान आणि प्रबळ राष्ट्र म्हणजे
भारत हे काय सांगणे लगे? काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे अण्वस्त्र विकसित करणारे
अब्दुल कादिर खान यांनी दर्पोक्ती केली होती. म्हणाले होते कि दिल्ली आम्ही पाच
मिनटात बेचिराख करू....अन आम्ही काय
स्वस्थ बसून राहू? तुम्ही पाच मिनटात बेचिराख करण्यापूर्वी अख्खा पाकिस्तान दोनच
मिनटात बेचिराख करण्याची क्षमता आमच्यात आहे.आमच्या ‘सहिष्णुतेची’ परीक्षा पाहता काय?
तुमची लायकी काय आहे हे समजून घेण्यासाठी काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘गदर’
सिनेमा एकदा पहा आणि त्यातील सनी देओल आणि अमरिश पुरी यांच्यातील पाकिस्तान बाबत
संवाद ऐका.चौर्यकर्म करून अण्वस्त्र सिद्ध झालेले तुम्ही आम्हाला काय बेचिराख
करणार? इतक्या वर्षांपासून वायव्य सरहद्दी कडून येणा-या आक्रमकांनी आम्हाला बेचिराख करण्याचे
नाना प्रयत्न केले परंतु कुणाचीहि डाळ शिजली नाही. अनेक आक्रमक आले आणि गेले
त्यांना कायम सत्ता तर मिळालीच नाही उलट त्यांच्या अपयशाच्या खुणाच या भारताच्या
पावन भूमीत शिल्लक राहिल्या.त्यांच्या सत्तेच्या सिंहासना ऐवजी त्यांच्या कबरीच
येथे त्यांच्या अपयशाच्या साक्षी देत आहेत. बेचिराख वगैरेची भाषा काय बोलता? ज्या
स्वत:च्या धर्माचा तुम्हाला एवढा अभिमान आहे त्या तुमच्याच धर्माचे कितीतरी बांधव
तुमच्या बेचिराख करण्याने यमसदनी पोहोचतील याचा तरी निदान विचार करा. परंतु तेवढी
वैचारिक पात्रताच तुमच्याकडे नाही आहे म्हणा ! तुमचे होत नाही तर तो मुंबई ह्ल्ल्याचा “मास्टरमाइंड” असा आरोप असलेला आतंकवादी
जमात-उद-दावा चा प्रमुख हाफिज सईद. लपून छपुन मोठ्या गमजा करणारा, एका मोर्चास
संबोधित करतांना परवा त्याने दर्पोक्ती केली, काय तर म्हणे ,”जर भारताने द्रोण
हल्ला केला तर आम्ही संपूर्ण भारतात अनेक द्रोण हल्ले करू शकतो” भारत हा आक्रमक
देश नाहीच आहे हे काय त्या हाफिजला माहित नाही? त्यामुळे भारताकडून द्रोण हल्ला
होणारच नाही. अब्दुल कादिर आणि हाफिज सईद तुम्ही बोलता काय नुसते धमक असेल तर एकदा
कराच म्हणा हल्ला, मग बघा गंमत. अहो आता २०१६ सुरु आहे तुम्हाला तर आम्ही लालबहादूर
शास्त्री पंतप्रधान असतांनाच आमच्या भारतीय जवानांनी पळता भुई कमी पाडली होती. विसरले
का? आमच्याशी हल्ले वगैरे करण्याची भाषा बोलता? तुमच्या एका हल्ल्याच्यावेळी तुमचे दोन तुकडे पाडले होते हे हि विसरले का? आता
हल्ला कराल तर जे आहे तेही शिल्लक नाही राहणार. तुमच्या मध्ये सध्या नकारात्मक
भावना बळावली आहे. भारतातील प्रबळ सरकार, भारताची प्रगती, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा
वाढता दबदबा, तुमचे शेजारी राष्ट्र अफगाणिस्तान आणि भारताची वाढती मैत्री, तेथील
भारताची गुंतवणूक आणि या सर्वात तुम्ही कुठे आहात? तर तुम्ही अजूनही तिथेच 1947
च्या दशकात. भारताची प्रगती पाहून, संरक्षण सिद्धता पाहून तुमचा जळफळाट होतो. परंतु
करू काहीच शकत नाही. मग काय तर केवळ भारत विरोधी विधाने करायची स्वत:ची पाठ थोपटून
घ्यायची. काहीहि करता येत नाही म्हणून तुम्ही हतबल झालेलेल आहात. तुमच्या
हल्ल्यांना चोख प्रतिउत्तर भारतीय जवान देत आहेत.हि बेचिराख करण्याची आणि हल्ले
करण्याची भाषा बंद करा तुमचा स्वत:चा अंतर्गत विकास पहा. तुमच्या मिडीयाच्या बातम्यांचे
अवलोकन करा.निव्वळ तोंडात जोर असून नाही चालत. निव्वळ वटवट करीत बसाल तर जगात
तुम्ही केवळ “मुंह के चबरे.........” आहात असा संदेश जाईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा