गाडी “रेड लाईट” ची...भाषा “रेड
लाईट एरिया” ची
सुसंस्कृत म्हणवल्या जाणा-या महाराष्ट्रात
दिवसेंदिवस राजकारणाची पातळी खालावते आहे.लोकप्रतिनिधी कर्मकां-यांना काय मारतात,
असभ्य, अश्लाघ्य भाषेत भाषणे काय ठोकतात त्यांचा तोल केंव्हा ढासळेल काही नेम
नसतो.दोन वर्षांपूर्वी एका मोठ्या नेत्यास त्याच्या बोलण्याचे परिणाम भोगावे लागले
होते. ते नेते त्यांच्या बोलण्यामुळे आजही पश्चातापदग्ध आहेत. आता त्याच नेत्यावर
सत्त्ताधारी पक्षातील मंत्र्याने गरळ ओकली.”भगवानाच्या” पायथ्याशी जमलेल्या
नेत्यांनी जनतेसमोर भाषणे ठोकली आणि विजया दशमीला विजय मिळवल्याचे समाधान सुद्धा
मिळवून घेतले. परंतू येथील भाषणांमुळे महाराष्ट्र राज्यातील राजकारण मात्र निम्न दर्जाचे
झाले हे स्पष्ट दिसून आले. ज्यांच्यामुळे काही लोक मंत्री पदावर पोहचून “रेड लाईट”
गाडीत विराजमान झाले त्यांनी स्वत:चा मोठेपणा, अभिमान दाखवून दिला. तर ज्यांना “रेड
लाईट”ची गाडी मिळाली त्यांनी त्यांची भाषा, मग्रुरी दाखवून दिली. महाराष्ट्रात
पूर्वी असे नव्हते. शरद पवार यांची काही मदत शिवसेनेला झाली तर त्याचा गवगवा होत
नसे, किंवा शरद पवार मोठेपणा दाखवत नसत. मा. बाळासाहेब ठाकरेंमुळे कित्येकांना “रेड
लाईट” गाडया मिळाल्या होत्या परंतू त्यांनी कधी अभिमानाने तसे जाहीर भाषणात बोलुन नाही
दाखवले. “भगवानाच्या” समाओर मात्र अभिमान, तोरा सर्वच दिसून येत होते. विजया
दशमीला शत्रूचा नायनाट करून सर्वांप्रती आदर प्राक्त करावयाचा असतो, आपट्याचे पानं
सोने म्हणून देवून नम्र व्हावयाचे असते नेमके त्याच दिवशी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यावर असभ्य भाषेत दिका केली.
महाराष्ट्रातील जनतेला वाटले होते की गरीबीतून वर आलेला नेता आहे परंतू सब “जानकर
भी अंजाना” अशी यांची वागणूक आहे. आपण सर्व मेळावे घेता तेंव्हा त्या मेळाव्यात तुम्ही
काय विकास केला, तुमची पुढील धोरणे काय आहेत, तुमच्याशी संबंधीत खात्यांमध्ये
तुम्ही काय भरीव कामगिरी केली हे ऐकण्याची जनतेची अपेक्षा असते. परंतू तुम्ही जनतेसमोर केवळ स्वस्तुतीपर आणि दुस-याची
निंदा नालस्ती करणारेच भाषण ठोकत असता.लोकप्रतिनिधींचा आदर कर्मचा-यांनी करावा असे
काहीसे परिपत्रकच निघाले होते परंतू तुमच्या अशा वागणूकीमुळे तुमच्या कार्यकर्त्यांखेरीज
तुमचा आदर कोण करेल ही शंका आहे. तुम्ही जेंव्हा चांगली,आदर्श वागणूक ठेवाल
तेंव्हाच जनता तुम्हाला मान सन्मान देईल.कुठेही असो कुणा बाबतही असो योग्य उद्गार
काढा. अनुद्गार जाहीररीत्या काढल्याने जनतचे मनोरंजन होते परंतू जनता नंतर मात्र
तुम्हाला त्याचे फळ देतेच. आपण सुसंस्कृत राज्य म्हणून मिरवतो त्या राज्याचा, राज्यातील
महापुरुषांचा आदर्श लक्षात असू द्या. निव्वळ शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र
नुसते म्हणून चालत नसते तर शाहू, फुले, आंबेडकर यांच्या सारखी वागणूक सुद्धा असावी
लागते. कुणी शिव्या काय देते, कुणाला लघुशंका काय आठवते, कुणाला दस नंबरी नागीन
काय आठवते. महाराष्ट्र असा नव्हता. यशवंतराव,वसंतराव असे नेते या महाराष्ट्रानी
पहिले, सेतू माधवराव पगडी, एस एम जोशी यासारखे संयमी व्यक्तिमत्वे बघितली अगदी
आताचे बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या विरुद्ध काय नाही ते बोलले गेले परंतू त्यांनी ब्र
सुद्धा काढला नाही असे लोक आपल्या महाराष्ट्रानी पाहेले आहेत त्यामुळे त्यांचा
आदर्श अंगी बाणवा. तुम्हाला तुमच्या स्वकर्तुत्वाने असो वा इतर कुणामुळे जी “रेड
लाईट” ची गाडी मिळाली आहे ती गाडी मिळण्यास जनता सुद्धा कारणीभूत आहे हे विसरू
नका. “रेड लाईटच्या“त्या गाडीत विराजमान होऊन तुम्ही लीन व्हा, तुमच्या जिभेवर,
भाषेवर नियंत्रण राखा “रेड लाईट एरिया” मधील भाषेप्रमाणे भाषा वापरू नका नाहेतर जनता
तुम्हाला ट्रॅफिक चा “रेड लाईट” दाखवून थांबवून टाकेल.
लोगोका दिल, अगर, हाँ जितना हो तुमको तो, बस मिठा मिठा बोलो