“संजय” उवाच
महाभारत या महाकाव्यात अनेक
पात्रे होती. व्यासांनी प्रत्येक पात्राला विशिष्ट अशा खुबी प्रदान केली आहे.
प्रत्येका जवळ काही तरी विशेष गुण अथवा कला व्यासांनी दाखवली आहे. त्यापैकीच एक पात्र होते संजय.धृतराष्ट्राचा
सारथी आणि सल्लागार असलेल्या संजयला सुद्धा एक कला अवगत होती.ती म्हणजे त्याला
दूरवरचे पाहण्याची. अगदी आताच्या दूरदर्शन प्रमाणे.संजय ह्यास कुरुक्षेत्रातील
युद्ध राजमहालात बसल्या बसल्या दिसत होते आणि ते तो धृतराष्ट्रस सांगत असे.त्याला दिव्यदृष्टीचे
वरदान होते,तो जवळपास ८० किमी अंतरावरचे पाहू शकत असे.म्हणूनच संजय कुरूक्षेत्रा
पासून दूर असलेले युद्ध, आक्रमण पाहून कुरुक्षेत्रावर खरोखर युद्ध होते आहे हे धृतराष्ट्राला
सांगणारा,वर्णन करणारा एकमेव पुरावा धृतराष्ट्राजवळ होता.धृतराष्ट्र अंध असल्याने
तो काही व्हीडिओ पाहू शकला नसता आणि तेंव्हा तसे तंत्रच मुली नव्हते त्यामुळे त्याला संजयावर विश्वास ठेवणे क्रमप्राप्त
होते.आज उलट आहे सर्व म्हणतात भारतीय सैन्याने हल्ले केले आणि एकटा “संजय” नाही
म्हणत आहे.आताच्या “संजय” जवळ “सर्जिकल स्ट्राईक” प्रत्यक्ष पाहण्याची दिव्यशक्ती
नाही.त्यामुळे मग त्याला सर्जिकल स्ट्राईक कसे दिसणार? म्हूणून मग त्याने परवा सर्जिकल
स्ट्राईकचा व्हीडिओ मागितला.त्यातच आताचा हा “संजय” विरोधी पक्षाचा आहे.या कोणतीही
“उपमा” न देता येवू शकणा-या “निरुपमेय” संजयास काय सांगावे? एका पक्षाशी एकनिष्ठ न
राहता हा स्वत: दुस-या पक्षाच्या वळचणीला जावून बसला.तेथे त्यांच्याच एका मासिक का
पाक्षिकात याने त्यांच्याच वारीष्टांची खिल्ली उडवली होती.त्यामुळे त्याला सध्याच्या
पक्षात तशी फारशी किंमत नाही. तेथे तो “मुहाजीरच” आहे. मग अशा माणसाला अजून काय सुचणार?
ठीक आहे या संजयच्या म्हणण्यानुसार सर्जिकल स्ट्राईक चा पुरावा हवा. मान्य आहे अरे
पण तुझ्या पक्षाला नको हवा आहे ना ! आणि तुझ्यासारखे,ओम पुरी सारखे,आजू-बाजूला
सर्वत्र चिखल आणि आपणच तेवढे निर्मळ आहोत असे चिखलातूनच उगवणारे ‘अरविंदां’ सारखे विरोधी
या देशांत आहे त्याचे पाकड्यांना चांगलेच फावते आहे.अहो सर्जिकल स्ट्राईक तर झाले
आहेच परंतू नसते जरी झाले तरी आपण सर्वानी पक्षभेद वापरून एक होवून सर्जिकल स्ट्राईक
झालेच आहे असेच म्हणायला हवे.तसे केले तर जगात भारतात पाकिस्तान हा देश दहशतवाद
पोसणारा देश आहे हे समजेल ना ! मा. पंतप्रधान पाकिस्तानला एकाकी पडण्याचा प्रयत्न करीत
आहे तो यशस्वी होण्याची शक्यता अधिक वाढेल.परंतू तेवढे शहाणपण तुम्हाला कसे सुचणार?तुम्हाला
तर राज्यातील आगामी निवडणुकांची भीती ! म्हणून मग तुम्ही देशहित सुद्धा बाजूला
सारले आहे.अहो अमेरीकेचे उदाहरण पहा जरा ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यावर तेथील
विरोधी पक्षातील लोकांनी तुमच्या सारखी बेताल वक्तव्ये केली नव्हती. तुम्ही निव्वळ
“बालिश बहु बायकांत बडबडला” सारखे महाभारतातील “उत्तर” सारखे “आम्ही पण केले होते सर्जिकल
स्ट्राईक” असे लहान मुला प्रमाणे आता सांगत सुटला आहात. तेंव्हा काय झाले होते
सांगायला? परंतू उशिराने सुचलेले शहाणपण हे हास्यास्पद असते हे सुद्धा समजत नसावे
काय?
सर्व पक्षीय प्रतिनिधी, जनता यांनी ध्यानात
ठेवावे की इतर कोणत्याही मुद्द्यावर भांडा परंतू पाकिस्तान विरोधात एकजूट राहा.आताच्या
“संजयाने” महाभारतातील “संजय” सारखी दिव्यदृष्टी जरी त्याला नसली तरी इतरांबाबतचा,
देशाबाबतचा, देशहिताचा दृष्टीकोण तरी निदान चांगला असू द्यावा हे ध्यानात ठेवावे.
एकजुटीचा प्रश्न नाहीयेय...प्रश्न आहे सत्याचा....जर अशी घटना घडल्याच युनोचे निरीक्षक,अमेरिकन/आंतरराष्ट्रीय उपग्रह, इतर देशांची वृत्तपत्रे नोंदवत नसतील, तर नक्कीच संशयाला वाव आहे,आणि हे जर खरे असेल तर केजरीवाल आदींवर 'देशद्रोह''पाकिस्तानात जा'अशा प्रतिक्रिया देऊन आपण सत्याचा अपलाप करण्याच्या प्रवृत्ती जोपासून कोणता राष्ट्रवाद जपत आहोत?
उत्तर द्याहटवा