२५/१२/२०१९

Article about the speech of Prof. Sumant Tekade on Chhatrapati Shivaji Maharaj

कर्णतृप्ती करणारे व्याख्यान 
  स्थानिक टिळक स्मारक मंदिर खामगांव येथील  व्याख्यानमालेत छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर दोन दिवसांचे व्याख्यान झाले. प्रथम दिवशीचे व्याख्यान चुकले. परंतू दुस-या दिवशी प्रा. सुमंत टेकाडे हे व्याख्याते आहे म्हणून कळले प्रा. टेकाडे यांचे दर रविवारी तरुण भारत दैनिकाच्या पुरवणीत शिवाजी महाराज या विषयावर सदर सुरु आहे. वाचक या सदराची आवर्जून वाट पाहत असतात. हे सदर वाचत असल्याने दुस-या दिवशी व्याख्यानास जाण्याचा निश्चय केला. व्याख्यानात प्रा. टेकाडे यांनी ओघवत्या शैलीत श्रोत्यांना अडीच ते तीन तास खिळवून ठेवले. शिवाजी महाराज, त्यांचे बालपण , युद्ध शैली , अफझल खानाचा निप्पात, शिवाजी महाराज कोणत्याच एक जातीच्या विरोधात नव्हते तर दुर्जन मग तो कोणत्या का जाती,धर्माचा असो त्याचा मुलाहिजा शिवाजी महाराजांनी ठेवला नाही हे त्यांनी हे दाखले देऊन सांगितले. आपल्या स्वत:च्या मुलाचे श्राद्ध त्याच्या जीवंतपणी कोण करू शकतो ? परंतू शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी संभाजी राजांचे श्राद्ध घातले तेंव्हा त्यांच्या मनाची काय घालमेल झाली असेल. या संबधी ऐकतांना रसिक श्रोत्यांच्या
भावना दाटून आल्या. औरंगजेबाच्या दरबारात झालेल्या अपमानामुळे मोगल दरबाराची तहजीब झुगारून फोडलेली डरकाळी. आग्र्याहून बिना युद्धाने सर्वांना सुटका करून आणणे हे सर्व नियोजना मुळे होते . नियोजन,व्यवस्थापन यात त्या काळातही शिवाजी महाराज पुढारलेले होते.खांदेरी- उंदेरी किल्ल्याहून महाराजांच्या आरमाराने इंग्रजांना कसे पिटाळले, त्यानंतर इंग्रजांनी केलेला पत्रव्यवहार व त्यावरुन शिवाजी महाराज कसे लढवय्ये होते हे लक्षात येते. आपले बंधू व्यंकोजी यांना महाराजांनी म्लेंच्छां पासून सावध राहण्याचा इशारा दिला होता. मोगली शब्द व्यवहारात वापरले जात असल्याचे पाहून  शिवाजी महाराजांनी पत्रव्यवहार मराठी भाषेतून कसा सुरु केला. संस्कृतप्रचुर मराठी शब्द मराठी भाषेस दिले. या कार्यासाठी त्यांनी हणमंते नामक तज्ञाची नेमणूक केली होती.परंतू इंग्रजांनी रायगडावर जाळपोळ केल्याने अनेक महत्वाच्या पत्रव्यवहारा समवेत तो मराठी शब्दकोश सुद्धा जळाला. अनेक विषयांचे दाखले देत असतांना प्रा टेकाडे यांनी पोर्तुगीज किती निष्ठूर होते,पोर्तुगीजांनी भारतीयांना दिलेला त्रास, शिक्षा, यातना याबाबत सांगितले तेंव्हा अनेकांचे डोळे पाणावले. या व्याख्यानात त्यांनी सद्यस्थिती,मुलांवरचे संस्कार,संस्थामध्ये व इतर ठिकाणच्या कर्मचा-यांची कर्तव्यनिष्ठा त्यांची कार्यशैली याबाबत सुद्धा मार्गदर्शन केले. संपूर्ण व्याख्यान हे पुराव्यांवर आधारीत असे होते , कुठल्याही दंतकथा यात नव्हत्या. असे श्रवणीय व्याख्यान ऐकतांना श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले होते. तीन तास केंव्हा सरले हे श्रोत्यांच्या ध्यानात सुद्धा आले नाही. व्याख्यानोत्तर अनेकांनी श्री टेकाडे यांचे अभिनंदन केले. टिळक स्मारक महिला मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला याबाबत श्री टेकाडे यांनी त्यांचे कौतुक केले. महिलांनी स्थापित व महिला संचालित असलेल्या टिळक स्मारक मंडळाची शतकोत्तर वाटचाल खरोखर प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. या स्मरणीय व्याख्यान आयोजनासाठी टिळक स्मारक महिला मंडळाचे तसेच व्याख्याते प्रा सुमंत टेकाडे या दोहोंचेही खामगांवकर रसिक कृतज्ञ राहतील.

२४/१२/२०१९

Article on the occasion National Consumer Day 24 Dec 2019


ग्राहक हक्काप्रती प्रशासनाची उदासीनता    

              आधुनिकीकरण , खुली 
अर्थव्यवस्था यामुळे व्यापाराची पद्धत पार बदल झाला आहे. संपूर्ण जग  एक मोठी बाजारपेठ बनली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे जगातील सर्वच देशात मांकित ब्रँडस् सहजपणे उपलब्ध होत आहेत. ऑनलाईन शॉपिंगकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.  एका क्लिकसरशी ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या वस्तू घरपोच मिळू लागल्या आहेत. बाजारातल्या या वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहक राजा बनला आहे. परंतू याच राजाची अनेकदा फसवणूक सुद्धा होतांना दिसते. या ग्राहक राजाची फसवणूक होऊ नये याकरिता ग्राहक हक्क सरंक्षण व्यवस्था मजबूत असणे गरजेचे आहे. शिवाय ग्राहकाने सुद्धा जागरूक असणे व त्याला त्याच्या हक्कांची पुर्णपणे माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून प्रतिवर्षी साजरा केला जातो.शासनाच्या वतीने सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तालुका स्तरावर व तहसील कार्यालयात पुरवठा विभागामार्फत राष्ट्रीय व जागतिक ग्राहक दिन साजरे केले जात असतात.तसे शासनाचे निर्देश आहेत. ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदुमाधव जोशी यांच्या लढ्यातून लोकांच्या आग्रहाने ग्राहक हक्क कायदा 24 डिसे 1986 रोजी पारीत झाला होता म्हणून 24 डिसे हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आपल्या देशातील ग्राहक हक्क संरक्षण व्यवस्थेबाबत जाणून घेता येईल. ग्राहकहिताचे रक्षण करण्याकरिता विविध पातळ्यांवर कार्य केले जात आहे. ग्राहक तक्रार निवारण मंच हा याच व्यवस्थेचा एक भाग आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार स्थापन करण्यात आलेल्या या मंचाच्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या सोडविण्याचे कार्य होत आहे. महाराष्ट्रात बिंदुमाधव जोशी यांनी 1974 साली ग्राहकांचे संघटन केले आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना करण्यात आली. सुरूवातीला ग्राहक हक्क संरक्षण चळवळ क्षेत्रात खाजगी व स्वंयसेवी संस्थां ह्या प्रयत्न करीत होत्या. त्यांच्या प्रयत्नांच्या माध्यमातून ग्राहक चळवळीचा विस्तार देशभरात झाला. तद्नंतर ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन झाला. सध्या ग्राहक मंच हा ग्राहकांना दाद मागण्यासाठी एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध आहे.पुढे देशात लोकाग्रहास्तव ग्राहक संरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे सर्व ग्राहकांना सुरक्षेचा अधिकार,उत्पादनाबाबतच्या माहितीचा अधिकार,निवडीचा अधिकार,तक्रार निवारणाचा अधिकारआणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे.या आधारे एखाद्या उत्पादन सेवेबाबत जाणून घेणे त्याबाबत तक्रार असल्यास त्याचे निरसन करुन घेण्याचा हक्क नागरिकांना मिळू शकला.या कायद्यामुळे ग्राहकांचे हक्क जोपासण्याच्या द्ष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले. यासाठी विविध पातळीवर ग्राहक मंचाची स्थापना करण्यात आली आहे.जिल्हा पातळीवर जिल्हा ग्राहक मंचाच्या माध्यमातून ग्राहक हक्काचे संरक्षण केले जात आहे. तिथे ग्राहकांचे समाधान झाले नाही तर राज्य किंवा राष्ट्रीय ग्राहक मंचच्या माध्यमातून ग्राहकाला न्याय मिळवून दिला जातो. ग्राहक चळवळीला बळ देण्यासाठी महाराष्ट्र ग्राहक संरक्षण (सुधारणा) नियम 2004 नुसार जिल्हास्तरावर ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. ग्राहकांना आवश्यक मार्गदर्शन थेट मिळावं यासाठी राज्यात 15 सप्टेंबर 2011 पासून स्वतंत्र हेल्पलाईन कार्यरत आहे.ग्राहक 1800-22-2262 या क्रमांकावर हेल्पलाईनला फोन करुन आपल्या शंकाचे निरसन करु शकतात.ग्राहक हित जोपासणारी व्यवस्था असली तरच ग्राहक हा राजा’ होऊ शकेल. प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसे व जागतिक ग्राहक दिन 15 मार्च असे दिवस साजरे करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. परंतू गेल्या काही वर्षात तहसील कार्यालय व पुरवठा विभाग यांचे ग्राहक दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. प्रशासन ग्राहक हक्क जागृती , ग्राहक दिन साजरा करणे याप्रती अतिशय उदासीन झाले आहे. ग्राहकांना  आमंत्रित न करणे , जागृतीचे कार्यक्रम न राबवणे  असे होत आहे . तेंव्हा प्रशासनाने ग्रह हिताच्या दृष्टीकोनातून ग्राहक हिताच्या हेतून हे दिन उत्साहाने साजरे करावे व ग्राहक चळवळीस पाठबळ द्यावे.  

१९/१२/२०१९

Article about old songs related to home and wish of a bride and bridegroom of their new home .

ये बनायेंगे एक आशियाँ
ज सकाळी “वर्कआऊट” करीत असतांना एक होलगा पक्षी चोचीत काडी घेऊन बसलेला दिसला. तो उडून जवळच्याच एका झाडावर गेला तिथे त्याची मादी होती आणि त्यांचा आशियाँ अर्थात घरटे निर्माण होत होते. होलग्याच्या त्या जोडीला घरटे बांधतांना पाहून “दो पंछी दो तिनके कहो लेके चले है कहाँ“ हे गीत आठवले. काही जुने चित्रपट विशेष उल्लेखनीय जरी  नसले , त्यात आघाडीचे नायक-नायिका जरी नसले तरी त्या चित्रपटातील गीते मात्र सुमधुर असत. परीक्षित सहानी आणि राखी यांच्या “तपस्या” या चित्रपटातील हे गीत त्याच प्रकारातील. स्वत:चे घर व्हावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यातही नवपरिणीत जोडपे असेल तर स्वत:चे छोटेखानी का असेना परंतू एक टुमदार घर,एक आशियाँ असावा अशी त्यांची मनीषा असते. हीच मनीषा पक्षांच्या रूपकाने कवीने “दो पंछी दो तिनके” या गीतात व्यक्त केली आहे. “वो तो अपनेही धून मे गाये” म्हणत आपल्याच धुंदीत गात “मंजिल के मतवाले देखो छुने चले आसमाँ“ असे म्हणत आपली ही घराची इच्छा पूर्ण करण्यासाठी मग ते आकाशाला सुद्धा गवसणी घालण्यास तयार असतात. “एक फुलोभरी हो डाली , और उसपर हो बसेरा” या घरट्यासाठीची जी फांदी आहे ती फुलांनी भरलेली असावी अर्थात घरात हसणारे,
खेळणारे एक मुल सुद्धा असावे ही सुप्त इच्छा सुद्धा कुठेतरी दडलेली असते. आपली ही स्वप्ने पूर्ण व्हावीत असे कुणाला नाही वाटत आणि म्हणून “ये सपना सच होगा, कह रही धड्कनो की जुबान” असे दोघांनी मिळून पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्याची आशा सुद्धा ते हृदयाशी बाळगून असतात. त्याला व तीला दोघांना सुद्धा कुठेतरी स्पेस मिळावी म्हणून हे घराचे स्वप्न असते. या स्पेससाठी मग भाड्याच्या घरात किंवा कुटुंबातील अनेक सदस्यांसह चाळीतील घरात राहणा-या कुटुंबातील ती दोघे घरौंदातील अमोल पालेकर व झरिना वहाबच्या रुपात “दो दिवाने शहरमे , रातमे या दोपहरमे आबोदाना धुंडते है एक आशियाना धुंडते है” असे म्हणत घराच्या शोधात असतात. “पिया का घर" चित्रपटात चाळीतील जया भादुरी आणि तीचा पती अनिल धवन यांची घुसमट "...उसे अपनालो जो भी जीवन की रीत है |" असे किशोर कुमारच्या आवाजात  व्यक्त होतांना खूप सुरेख चित्रित केली आहे. खेड्यातील मोठ्या घरात राहिलेली ती “पिया का घर है , रानी हुं मै“ म्हणत चाळीतील त्या 'पार्टीशन' च्या घरात गुण्या गोविंदाने राहत  त्याला समजून घेतांना दाखवली आहे. साथ-साथ सिनेमात याच शहरातील त्यांच्या साध्या घराबद्दल फारूख शेख आणि दीप्ती नवल “ये तेरा घर ये मेरा घर” म्हणत घराबाबत व्यक्त होतात. त्यांना त्यांचे ते घर "ये घर बहोत हसीन है"  या ओळींप्रमाणे "हसीन" वाटत असते. 
त्यांचे ते घर इतरांनी त्यांच्याच नजरेने पाहावे असे त्यांना वाटत असते. या घरात जाण्यास जरी फुलांचे ताटवे नसले “ना फुल जैसे रास्ते बने नही इसके वास्ते“ , चांदणे नाही , खुले आंगण नाही तरीही “हमारे घर ना आयेगी कभी खुशी उधार की” असे त्यांना वाटत असते.
     जुन्या चित्रपटातील ही घराभोवती फिरणारी गीते, कथानक, आपल्यातील वाटावे असे ते अमोल पालेकर, अनिल धवन, फारुख शेख , झरीना वहाब , दीप्ती नवल सारखे अभिनेते, बासू चॅटर्जी , ऋषिकेश मुखर्जी यांसारखे दिग्दर्शक आता लुप्त झाले आहेत. होम लोन देणा-या बँका , कंपन्या अशा सुविधा उपलब्ध झाल्याने “ अब घर मिलना हो गया आसान” असे झाले आहे. आता भली मोठी पॅकेज कमावणारी ती नवपरिणीत दोघे दोन दिशांना व आप-आपल्या कामात अतिव्यस्त असतात. “फुलोभरी डाली” वरचे फुल कोमेजलेले भासत असते. 2 BHK , 3 BHK चे ते घर सणासुदीच्या दिवसांत कधी "...बनाएंगे एक आशियाँ " असे स्वप्न पाहात बांधलेले ते घर रिकामे-रिकामे आणि निव्वळ एक “ईट पत्थरोंका घर” असे वाटत असते. ते घर "घर असावे घरा सारखे.. " या कवितेतील ओळींप्रमाणे नेहमी आनंदी , माणसांची रेलचेल असलेला एक आशियाँ बनून राहायला नको का ?    

१८/१२/२०१९

Maharashtra ruling party leader seen in a modern look in Nagpur winter assembly

पुन्हा सुट-बुट 

     कुणी कोणते कपडे घालावे हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. आवड असते. परंतू आपल्या भारतात अनेक वेळा कुणी काय घालावे यावरून वाद उपस्थित झाले आहेत. भारतात नेत्यांचा पोशाख हा नेहमी कुर्ता जॅकीट असा असतो. नेता झाला की सर्व लोकप्रतिनिधी याच पोशाखात दिसायला लागतात. असे नेते क्वचित प्रसंगी इतर पोशाखात दिसले की वेगळे वाटते. यंदाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात तसेच झाले. अनेक नेते विविध पोशाखात आलेले दिसले. कुणी जीन्स पँट, कुणी सुट तर कुणी स्टाईलीश कॅप घातलेले असे दिसले. यातील बहुतांश नेते हे शेतक-यांचे सरकार म्हणवणा-या सरकार मधील आहेत. सभागृहात येतांना नेहमी सफेद कुर्त्यात दिसणारे नेते विविध फॅशनेबल पोशाखात असे येत होते जणू काही पुरुषांचा फॅशन शो आहे की काय ? एकीकडे महात्मा गांधींचे गोडवे गायचे तर 
दुसरीकडे शेतक-यांच्या हिताची भाषा बोलत ऊंची कपड्यांत कामकाजासाठी यायचे. सद्यस्थितीत राज्य सरकारात सहकारी पक्ष असलेल्यांनी व त्यांच्या नेत्यांनी 2014 मध्ये जेंव्हा पंतप्रधान हे सुटा-बुटात आले असता “सुट-बुट वाली सरकार” म्हणून बरेच हिणवले होते, हे सरकार सामान्य माणसाचे, शेतक-यांचे नसून सुटा बुटातील सरकार आहे , उद्योगपतींचे सरकार आहे अशी टीका केली होती. वृत्तचित्रवाहिन्यांनी तेंव्हा त्या बातम्या तिखट मीठ लाऊन प्रसारित केल्या होत्या. आता मात्र वृत्तचित्रवाहिन्या या सत्ताधारी पक्षातील नेत्यांना सुटा-बुटात आल्याचे पाहून त्यांच्या बातम्या अशा पद्धतीने दाखवीत आहेत की जणू काही या नेत्यांनी शेतक-यांना सरसकट कर्जमाफी दिली.महाराष्ट्र राज्य सरकारचे नेते,आमदार नागपुरातील बोच-या थंडीचे कारण दाखवत सुट-बुट मध्ये अधिवेशनासाठी येत आहे. मान्य आहे थंडी आहे तरीही आपण पुर्वी याच सुटा-बुटा वरून गदारोळ माजवला होता,शेतक-यांप्रती प्रेमाचा खोटा कळवळा दाखवला होता याचे या नेत्यांना विस्मरण झालेले दिसते. तसेच ज्या महात्मा गांधीचे आदर्श हे नेते दाखवत असतात त्या महात्मा गांधीनी भारतातील गरीब,शेतकरी यांना पाहून आयुष्यभर साधी राहणी अंगीकारली होती. सावरकर, सावरकरांची देशभक्ती, साहित्य, अस्पृश्यता निवारणाचे कार्य हे काहीही जाणून न घेता वृथा वल्गना करणा-या यांच्या नेत्यांनी जरा आता स्वत:च्या सहकारी पक्षांना सुटा-बुटात न मिरवता शेतक-यांसाठी लवकर कसे कामास लागतं येईल हे सांगण्याची थोडी तसदी घायावी हीच रास्त अपेक्षा शेतकरी व जनता लाऊन बसली आहे. 

१६/१२/२०१९

"Mahavikas Aaghadi government will work for 25 years in Maharashtra" article about this statement of Maharashtra CM Uddhav Thackarey

उद्धवजींचे “मी पुन्हा येईन”  
     देवेंद्र फडणवीस यांनी “ मी पुन्हा येईन” ही कविता वाचली. 
तेंव्हा  ती सर्वांना आवडली.  परंतू त्यातील  आत्मविश्वास,  मी म्हणजे माझा पक्ष, माझे आमदार हे निवडून येतील असेच देवेन्द्र्जींना अपेक्षित होते परंतू त्याची खिल्ली उडवल्या गेली व उडवल्या जात आहे. एकही सुट्टी ना घेता केलेली कामे ,पारदर्शक व्यवहार , सचोटी यातून आत्मविश्वास निर्माण झाला होता अहंकार नव्हे. त्यामुळेच देवेन्द्र्जींच्या नेतृत्वाखाली   सर्वाधिक असे 105 आमदार निवडून आले. परंतू तथाकथीत बुद्धीवादी , एखाद्याची जात काढून धर्मनिरपेक्षतेचे ढोल बडवणारे  पुरोगामी यांना मात देवेन्द्र्जींच्या “पुन्हा येईन” या कवितेत अहंकार दिसला. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सभागृहात देवेन्द्र्जींना टोमणे मारले. आता तेच उद्धवजी काल “महाविकास आघाडीचे सरकार 25 वर्षे चालेल“ असे बोलले यातील आता या वाक्याचा काय अर्थ ? महाविकास आघाडीचे सूत्रधार जाणत्या राजांना आता उद्धवजींच्या या वाक्यातून अहंकाराचा दर्प येईल की नाही ? देवेन्द्र्जी तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसे म्हणाले होते. तुमच्या महाशिव आघाडीचे महाविकास आघाडी झालेल्या सरकारला तर अजून उणे-पुरे 25 दिवसही उलटत नाही तर तुम्ही 25 वर्षांच्या गप्पा मारायला लागले. मुख्यमंत्री नागपूर विमानतळावर आयोजित सभेत बोलतांना वरील वाक्य बोलले ते “महाराष्ट्र घडवू , जनतेला
न्याय मिळवून देऊ असेही म्हणाले . मान्य आहे की , विकासासाठी स्थिर सरकार असायलाच हवे. परंतू महाविकास आघाडीचे सरकार 25 वर्षे टिकवण्यास उद्धवजी तुम्हाला नक्कीच खूप त्रास होणार आहे. परवाचे राहुल गांधी यांनी ज्या सावरकरांना तुम्ही खूप मानता , त्यांना भारतरत्न देण्याची मागणी करता त्यांचा अनादर केला. पूर्वी सावरकरांच्या अवहेलने संदर्भात बोलतांना राहुल गांधीना जोडे मारू असे वक्तव्य तुम्ही केले होते आज मात्र राहुल गांधींच्या वाक्यावर तुम्ही गप्प आहात. दिल्लीपुढे झुकणार नाही अशी तुमची भाषा होती आता ती भाषा तुम्ही फारच लवकर विसरले. ज्या मातोश्रीला आदेश देण्याची सवय आहे त्यांना आता अगदी सुरुवातीपासूनच आदेश मिळायला लागले आहेत. मुख्यमंत्री पद तुम्हीच सांभाळा हा आदेश  साहेबांनीच तुम्हाला दिला असल्याचे त्यांच्याच मुलाखतीत सांगितले आहे. अजूनही पुढे किती आदेश तुम्हाला मिळतील देव जाणे. शिवसेनेची अशी अगतिकता पाहतांना शिवसैनिक , हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेबांच्या चाहत्यांना नक्कीच दु:ख होत असेल. इंग्रजांनी जेंव्हा सावरकरांना 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा केली होती तेंव्हा ते म्हणाले होते की , “50 वर्षे इंग्रज सरकार राहिले तर !” तसेच तुमचे महाविकास आघाडीचे सरकार 25 वर्षे टिकले तर तुम्ही महाराष्ट्र घडवाल , न्याय मिळवून द्याल हे सर्व करू शकाल. तुम्ही जेंव्हा 25 वर्षे महाविकास आघाडी सरकार राहील असे म्हणता तेंव्हा ते सुद्धा ज्यात तुम्हाला अहंकार वाटला त्या “मी पुन्हा येईन” या ओळीं सारखेच नाही का ?


१५/१२/२०१९

Article regarding Rahul Gandhi's statement about V D Savarkar

सावरकरांची अवहेलना करणा-यांनो, तुमच्या कडून कोलू तरी हालेल का? -2

      राहुल गांधी पुन्हा बरळलेच. "रेप इन इंडीया" या
त्यांच्या वक्तव्या   बद्द्ल माफी ची मागणी झाली असता "माफी मागायला  मी काही राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे." असे राहुल म्हणाले. सावरकरांची उपेक्षा पारतंत्र्यात तर झालीच झाली परंतू स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा होतच आली, सावरकरांच्या मृत्यू उपरांत सुद्धा होतच आहे. यात राहुल यांच्या  बरळण्याने पुनश्च भर पडली. या देशात अद्यापही स्वतंत्र सेनानींचा असा अनादर , असा अपमान होत असेल तर यासारखे दुर्दैव कोणते. या आजच्या पिढीतील नेत्यांना झाले तरी काय ? विचारसरणी वेगळी म्हणून हे स्वतंत्रता सेनानींचा अनादर, अपमान करतात. हे सर्व बंद होणे, प्रसंगी यासाठी सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करणे जरुरी आहे. स्वतंत्र सेनानी मग ते कोणत्याही विचारसरणीचे असो त्यांचा अपमान, अनादर कुणी करूच नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून , धूर्त राजकारणी स्वत:ची राजकीय पोळी शेकण्यासाठी काहीही बरळतात, शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल करतात. हे सर्व थांबले पाहिजे. तमाम स्वतंत्र सेनानीचा आदर देशवासीयांनी, सरकारनी कायम राखणे आवश्यक आहे. कुण्या का पक्षाचे सरकार असो  खरा,प्रेरणादायी इतिहास हा शैक्षणिक अभ्यासक्रमात असलाच पाहिजे, त्यात सर्वच स्वतंत्रता सेनानींचा
सामावेश असलाच पाहिजे, त्यांचा सन्मान कायम राखल्याच गेला पाहिजे. यांच्या कडून असे म्हणवले तरी कसे जाते ? ज्या  सावरकरांचा तुम्ही असा अपमान करता , सावरकरांची महानता नाकारता, तुमचे मणिशंकर अंदमानातील सावरकरांच्या काव्यपंक्ती पुसतात. तुमच्या या असल्या व्देषपूर्ण कृतीच तुम्हाला रसातळाला नेत आहेत. सावरकरांची देशभक्ती,देशप्रेम,इंग्रज विरोधी लढा, हे तुम्ही नाकारता ?  सावरकरांनी अंदमानात भोगलेल्या यातना तुम्ही नाकारता ? सावरकरांनी अंदमानात काथ्याकुट केली . तुम्हाला सुक्या नारळाच्या शेंड्या तरी  काढता येतील का ? सावरकरांनी कोलू फिरवून तेल काढले तुमच्या कडून कोलू हालेल तरी का ? तुम्ही
समुद्राच्या तीराशी जरी उभे राहिले तर तुमचे डोळे फिरतील तो समुद्र सावरकर लांघून गेले. सावरकरांना 
स्वतंत्रता सेनानी म्हणून नाकारण्याचे जे धैर्य करीत आहात त्याने आज तुमचे जे काही अस्तित्व या देशात 
शिल्लक आहे ते सुद्धा नष्ट होईल व ते सुध्दा तुमच्याच या असल्या नतद्रष्ट आकस,व्देष भावनांच्या कृतींमुळे.

१४/१२/२०१९

People blamed another on their failure or defeat in election.


अपयशाचे खापर दुस-याच्याच माथी फुटते
   मानवी स्वभावाला अनेक कंगोरे असतात. यश मिळाले तर ते मी कसे मिळवले , कसा “संघर्ष” केला , काय-काय यातना भोगल्या हे गवगवा करून सांगितले जाते. त्याउलट जर अपयश मिळाले तर त्यासाठी मात्र स्वत:चे आत्मपरीक्षण करण्याऐवजी निरनिराळी “एक्सक्यूजेस” शोधली जातात. कमी-अधिक प्रमाणात अनेकांत स्वभावाचा हा कंगोरा असु शकतो. मग याला राजकारणी कसे अपवाद ठरतील ? याची प्रचीती नुकतीच आली. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपातील काहींचा पराभव झालाकाहींच्या आप्तांचा पराभव झाला पराभव पचवण्याचे बळ मात्र फार क्वचितच लोकांच्या अंगी असते. पराभव झाला की मग जात-पात, “मूठभर लोक” वगैरे आठवायला लागते. यत्कदाचीत सत्तेची समीकरणे जुळली असती तर मग पराभूत लोकांची काय प्रतिक्रिया असती ? परंतू आता पराभूत तर झालेच आहे शिवाय सत्तेची चाबी सुद्धा स्वपक्षाजवळ नाही. मग स्वत:चे राजकीय अस्तीत्व शाबूत राहण्यासाठी काही मुद्दा तर लागेल ना ! राजकारणात कधी हार कधी जीत होतच असते परंतू जे राजकारणी पराभवातही आपला संयम राखतात , तोल ढळू देत नाही ते राजकारणात जास्त लोकप्रिय झालेले दिसतात. किंबहुना ते जनतेच्या मनात आपली जागा बनवतात. 2019 विधानसभा निवडणूकीत अनेक ठिकाणी दलबदलूंना पराभव पत्करावा लागला आहे. पराभूत झाल्यावर मग आपल्या समर्थक, स्वजातीय, स्ववर्गवारीच्या लोकांची सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्न करणे, मुठभर लोकांचा व्देश प्रकट करणे. वास्तविक पाहता मुठभर लोक जे कुणी असतील , ज्या कोणत्या पक्षात असतील त्यांना किंवा त्या मुठभर लोकांच्या बांधवाचा असा कोणता मोठा फायदा झाला आहे याचे सुद्धा अवलोकन करावे. पराभव झाला असेल, अंतर्गत विरोधही असेलही किंवा पाडा-पाडी झाली असेल तरी याप्रसंगी हारून मनोबल न खचू देऊ नये हे अटलजींनी ज्या शब्दात सांगितले त्या ओळी आठवतात.

क्या हार में, क्या जीत में किंचित नहीं भयभीत मैं कर्तव्य पथ पर जो मिला यह भी 
सही वो भी सही वरदान नहीं मांगूंगा हो कुछ, पर हार नहीं मानूँगा।

त्यामुळे आपला पराभव स्विकारून कर्तव्यपथावर मार्गक्रमण करीत राहावे व हार मानू नये 
तसेच ज्या पक्षाने आपल्याला मोठे केले ते विसरून पराभवाचे खापर इतरांच्या माथी फोडणे 
न फोडता “हार नहीं मानूंगा” प्रमाणे यशपथावर अगेसर होत आणखी मोठे होत जावे.

११/१२/२०१९

Panipat movie released on Friday 6 Dec 2019. Article regarding Panipat battle, Sadashivrao Bhau Peshwe and Marathas

पानिपत...मराठ्यांच्या पराक्रमाची कथा     




रवा आशुतोष गोवारीकरचा पानिपत चित्रपट प्रदर्शित झाला. लोक आता चित्रपट पाहतीलच परंतू त्यांनी पानिपत कादंबरी वाचली तर पानिपत कळण्यासाठी ते अधिक संयुक्तिक ठरेल असे वाटते. 14 जाने 1761 रोजी 258 वर्षांपूर्वी झालेले मराठा आणि अहमदशहा अब्दाली यांच्यात झालेल्या युद्धामुळे मराठा पराक्रमाची ख्याती जगभर पसरली.“दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा” हे सिद्ध झाले.मराठा साम्राज्य दक्षिणोत्तर पसरले होते.अटक पर्यंत भगवा फडकत होता. पानिपतच्या या युद्धात सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या नेतृत्वात अठरा पगड जाती-जमातीतील जनता, त्यांना भारताच्या विविध भागातून येऊन मिळालेले सैन्य व त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाने विश्वास पाटील या सनदी अधिका-यास झपाटून टाकले व पानिपत या विषयावर त्यांनी 80 च्या दशकात “पानिपत” ही कादंबरी लिहिली. कादंबरीला मोठा प्रतिसाद मिळाला.याच कथेवर आता आशुतोष गोवारीकरने “पानिपत“ हा चित्रपट काढला.पानिपत चित्रपट का पहावा? तर या चित्रपटामुळे पेशव्यांची शाहू महाराज आणि स्वराज्याप्रतीची निष्ठा कळेल. चिमाजी आप्पा पुत्र सदाशिवराव भाऊ पेशवे म्हणजे महापराक्रमी पहिले बाजीराव पेशवे यांचे पुतणे कसे पराक्रमी योद्धे होते, सत्ता किंवा पदाची त्यांना मोह नव्हता हे समजेल.हे युद्ध म्हणजे मराठ्यांच्या पराभवाचे युद्ध म्हणून शिकवले गेले.परंतू या युद्धात मराठ्यांनी छातीचा कोट करून, उपाशी पोटी दुर्राणी सैन्याशी कशी टक्कर दिली आणि लढाईत, इतिहासात अजरामर करणारा पराक्रम गाजवला हे ज्ञात होईलअब्दालीस पुन्हा दिल्लीकडे कूच करण्याचे धैर्य झाले नाही कारण मराठे जरी पराभूत झाले असले तरी अब्दालीला सुद्धा हा विजय फार महागात पडला होता. पेशव्यांना शिवाजी महाराजांनी स्थापित केलेले स्वराज्य अटकेपर्यंत विस्तृत करायचे होते असे लक्षात येईल. इब्राहीम गारदी या निझामाच्या तोफखाना प्रमुखावर सदाशिवराव भाउंनी ठेवलेला विश्वास व त्याने गाजवलेला पराक्रम, राजा अराजक, नबाब सुजाउद्दौला, सुरजमल जाट यांनी सोडलेली 
सदाशिवरावांची साथ, तरीही न डगमगणारे भाऊ,विश्वासराव व भाऊ यांचे काका-पुतण्याचे जिवापाड प्रेम, त्याकाळात आपल्या पत्नी पार्वतीबाई यांना सती न जाण्याचे सांगणारे सुधारक भाऊ,प्राणपणाने लढणारे जनकोजी शिंदे,बाजीवर-मस्तानी पुत्र समशेरबहाद्दर हे सर्व कळण्यासाठी सर्वानी कुटुंबासहित पहावा असा हा चित्रपट आहे.दत्ताजी शिंदे यांची "बचेंगे तो और भी लडेंगे" ही कथा मात्र अगदीच संक्षिप्तात आटोपली आहे.या चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे, झिनत अमान, रवींद्र महाजनी हे जुने कलावंतही दिसतात. मल्हारराव म्हणून रविंद्र महाजनींची निवड योग्य झाली आहे. 
     पानिपतच्या या लढाईमुळे काही म्हणी सुद्धा रूढ झाल्या जसे “दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा”, विश्वास ठेवण्या बाबत विषय निघाला तर “विश्वास तर पानिपतातच गेला.” (विश्वासराव पानिपत युद्धात कामी आले होतेहुतात्मा झाले होते). खूप मोठे नुकसान झाले तर "पानिपत झाले." खूप मोठा पराक्रम केला तर "अटकेपार झेंडे लावले." या म्हणी आजही महाराष्ट्रात प्रचलीत आहेत. हरियाणातील भाऊपूर या गावाचे नांव भाऊंच्या वास्तव्यामुळे पडले आहे अशी कथा आहे.
     प्रा. शेषराव मोरे म्हणतात “जर या युद्धात संपूर्ण पराभव झाला असता तर अहमदशहा अब्दाली हा भारताचा शासक झाला असता व जिहादी राजसत्ता व प्रवृत्ती भारतात रुजली असती मात्र या युद्धामुळेच भारतात लोकशाही अबाधीत राहिली
     हल्लीच्या ऐतिहासिक चित्रपटात "सिनेमॅटीक लिबर्टी" च्या नावाखाली कथेत अवास्तव बदल केले जातात. संजय लीला भंसालीने पद्मावत , बाजीराव मस्तानी या चित्रपटात आक्षेपार्ह असे प्रसंग , गाणी चित्रित केली होती.परंतू आशुतोष गोवारीकरने मात्र "सिनेमॅटीक लिबर्टी" चा अतिरेक टाळला. नाच-गाणी आहेतच परंतू ती तितकी आक्षेपार्ह वाटत नाही.तरीही चित्रपटात पार्वतीबाई या डोक्यावर पदर घेतलेल्या, किंवा पूर्णवेळ अंबाडा घातलेल्या दिसल्या नाही. ऐतिहासिक सिनेमात मुख्य पात्रांना नाच-गाणी करतांना दाखवण्याऐवजी नाच- गाणी 'एक्स्ट्रा' कलावंतांवर चित्रित करायची.या सिनेमाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांनी स्थापित केलेल्या हिंदवी स्वराजाच्या विस्तारीकरणासाठी पेशव्यांनी गाजवलेला पराक्रम भारतीयांच्या समोर आला. आपला इतिहास आपण विसरत चाललो आहोत. नवीन पिढीला कित्येक ऐतिहासिक गोष्टी ज्ञात नाहीत. इतिहास हा वर्तमान काळात निर्णय  घेण्यास सहाय्यक ठरत असतो. भारतीयांनी , लोकप्रतिनिधींनी इतिहासाचे ज्ञान ठेवावे म्हणजे वर्तमानात योग्य निर्णय घेण्यास इतिहास सहाय्यक ठरतो.इतिहासात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टळते. संक्रांतीला झालेल्या या युद्धात पेशव्यांच्या नेतृत्वात सर्व जाती जमातीचे लोक सामील झाले होते  त्यामुळे हा दिवस जाती भेद विसरून आपण महाराष्ट्रात "एकता दिवस" म्हणून पाळायला हवा हीच खरी पानिपतात कामी आलेल्या मराठ्यांना श्रद्धांजली ठरेल तसेच आपल्या पूर्वजांची गौरवगाथा, पराक्रम, त्याग, निष्ठा कळण्याठी पानिपत चित्रपट सहकुटुंब पाहावा तसेच पानिपत कादंबरी सुद्धा वाचावी. आपण एरवी सलमान खानच्या बाष्कळ कॉमेडी चित्रपटांना उत्स्फूर्त प्रतिसाद  देतो. तसाच प्रतिसाद मराठ्यांचा भीम पराक्रम दाखवणा-या पानिपत चित्रपटाला सुद्धा द्यायला हवा.

०५/१२/२०१९

Article about forming Government in Maharashtra by three political parties.


एक जगह जब जमा हो तीनो ....  
शेवटी महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार स्थापन 
झाले. स्थापने नंतर शिवसेनेने हिंदुत्व स्विकारले. काँग्रेसला अनेकवेळा सहकार्य केलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 2004 मध्ये एका मुलाखतीत काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सरकार स्थापन करणार का ? 
असा प्रश्न विचारला असता “मै दुकान बंद कर दुंगा” असे उत्तर दिले होते. त्यांना त्यांचीच शिवसेना भविष्यात याच पक्षांसह दुकान वाढवेल असे यत्किंचीतही वाटले नसेल. काहिही करून सत्ता स्थापन करायची विचारसरणी गेली चुलीत आता राजकारणात कदाचित असेच होत राहील. देवेन्द्र फडणवीस यांनी तीन चाकी रिक्षा चालवणे कठीण असते असे म्हटले तर काँग्रेसचे संजय निरुपम यांनी "तीन तिघाडा काम बिगाडा" असे वक्तव्य केले होते. आणि खरेच अद्याप नवीन सरकारचे कामकाज सुरु होते न होते तोच नाराज्या , अवास्तव मागण्या , नोकर भरतीत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून सुरु केलेले पोर्टल बंद करणे, विकासाच्या योजना पडताळणी सुरु करणे हे सर्व सुरु झाले आहे. काँग्रेसचे नितीन राऊत यांना सुरुवातीला जो बंगला दिला होता तो त्यांना आवडला नाही म्हणून ते नाराज झाले आणि आता त्यांना 
 दुसरा बंगला दिल्या गेला. मंत्रालयातील एका कार्यालयाला सुद्धा पद जाते या अंधश्रद्धेमुळे कुणाचीही पसंती नसते. मागण्यांच्या बाबतीत म्हणाल तर हुसेन दलवाई यांनी सनातन संस्थेवर बंदी घालावी तसेच मिलिंद एकबोटे, सर्वसंगपरीत्यागी संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा मागण्या करून “शिवसेनेचे हिंदुत्व कालही होते , आजही आहे आणि उद्याही राहील” असे विधान सभागृहात करणा-या उद्धव ठाकरे यांच्यापुढे आता मोठा पेच निर्माण केला आहे. विकासाच्या योजना बंद करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी दुरदृष्टीपूर्वक विचार करणे जरुरी आहे. आकस भावना, पूर्वग्रह न बाळगता विकास होणे सुद्धा जरुरीच आहे हे ध्यानात घेणे सुद्धा गरजेचे आहे. उपरोक्त मागण्या , नेत्यांच्या नाराजीला आता सरकार स्थापनेच्या प्रारंभीच्या काळातच सुरुवात झाली आहे. पुढे आणखी काय होते ? कुणास ठाऊक. अमर अकबर अँथनी या चित्रपटात तीन वेगवेगळ्या धर्मात वाढलेली एकाच आईची लहान भावंड मुले मोठेपणी एकत्र येतात आणि “अनहोनी को होनी करदे , होनी को अनहोनी..एक जगह जब जमा हो तीनो” याप्रमाणे तिघे बंधू खलनायकाला चारही मुंड्या चित करतात. तसेच भिन्न विचारसरणीचे शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे तीन पक्ष सत्तेसाठी विचारसरणीला तिलांजली देऊन “एक जगह जमा” झाले आहेत. त्यांनी विकासाच्या सुरु असलेल्या योजनांच्या बाबतीत मात्र “अनहोनी को होनी” या पद्धतीने कार्य करावे “होनी को अनहोनी” होऊ देऊ नये हीच विकासाभिमुख , सुसंस्कृत महाराष्ट्राला अपेक्षा आहे.

०३/१२/२०१९

Article on Sharad Pawar statement about Devendra Fadanvis in ABP Majha interview

“मी” पणा नसलेला नेता
काल एका वृत्तचित्रवाहिनीला सरकार स्थापने नंतर शरद पवार यांनी मुलाखत दिली  या  
मुलाखतीत त्यांनी म्हटले  की , महाराष्ट्राचे माजी  मुख्यमंत्री   देवेंद्र  फडणवीस  यांच्या अनेक भाषणांमध्ये असं जाणवतं की,  त्यांच्या तोंडी 'मीपणाचा दर्प आहे.  त्यामुळेच महाराष्ट्राने त्यांना नाकारलं, पवार साहेब जनतेने युतीला स्पष्ट बहुमत दिले होते त्याअर्थी जनतेने नाकारले असे कसे काय ? युती नंतर तुटली त्यामुळे फडणवीस आज मुख्यमंत्री नाहीत. या  मुलाखतीमध्ये पवारांनी राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात घडलेल्या अनेक गोष्टींवर  भाष्य केले.  तसेही माध्यमांनी  सध्या  पवार  यांच्यावर स्तुतीसुमने उधळणे सुरु  केले  हे.  शरद  पवार म्हणाले  कीप्रचारादरम्यान  देवेंद्र फडणवीस म्हणाले की  मी पुन्हा  येईन, यामध्ये फडणवीसांचा 'मी'पणा जाणवतो. पवार साहेब तुमची सुद्धा भाषणे आणि हातवारे जनतेने ऐकली आहेत आणि पाहिली आहेत. एका परिपक्व धुरंधर चाणक्य म्हणवल्या जाणा-या नेत्याला असे हातवारे करणे कुठे शोभले होते ? चाणक्य हे बिरूद आपणास आपले तथाकथीत स्तुतीपाठक लावत असतात. वास्तविक पाहता चाणक्याने जे काही केले ते राष्ट्रासाठी केले आपले सर्व जीवन त्याने केवळ देशाच्या 
हितासाठी वाहिले. तुम्ही परीवारातील लोकांना राजकारणात पुढे आणले. लोकांचा असा पाठिंबा

मिळाल्यानंतर आपण पक्षवाढीसाठी काम  करायचं असतं. असे आपण फडणवीसांना म्हटले. परंतू आपल्या राष्ट्रीय पक्ष असलेल्या पक्षाची महाराष्ट्र वगळता देशात काय अवस्था आहे ? फडणवीसांच्या भाषणांत त्यांनी केलेल्या वक्तव्यांमध्ये तुम्हाला  'मी'पणाचा दर्प जाणवतो. परंतू आपले पुतणे अजित पवार यांचे एका आमदाराला उद्देशून तू कसा निवडून येतोअसे म्हणणे , सुप्रिया सुळे यांचे मी दस नंबरी नागीण आहेही अशी वक्तव्ये तुम्हाला काय वाटते जनता विसरली असेल? आणि  या वाक्यात कोणता दर्प होता ? असा प्रश्न सुध्दा जनतेला पडला आहे. तुम्ही म्हणता महाराष्ट्रातील जनतेला हे आवडत नाहीत्यांना 'मी'पणा आवडत नाही. त्यांना विनम्रता आवडते. पवार साहेब फडणवीसांची विनम्रता जनतेला चांगली ठावूक आहे. फडणवीस कोणत्या विचारधारेतून आले आहे तुम्हाला ठाऊक आहे. त्यांना तुम्ही विनम्रतेचे धडे देण्याची गरज नाही. तुम्ही म्हणता फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होतेपरंतु राज्याच्या राजकारणात त्यांना मोठं स्थान निर्माण करता आलं नाही. ते अजून तिथेच आहेत. तुम्ही इतकी वर्षे महाराष्ट्रात राजकारणाच्या केंद्रस्थानी होता , केंद्र सरकार मध्ये होता. बारामती वगळता तुम्ही महाराष्ट्राला कुठे प्रगतीशील केले. फडणवीस तर फक्त पाचच वर्षे होते. तरीही त्यांनी शेतात विद्युत पुरवठा मागितल्या बरोबर सुरू केला  होता , जलयुक्त शिवार योजना राबवली होती तसेच इतरही विकासाभिमुख योजना प्रभावीपणे ते राबवत होते. मराठा मोर्चा , भीमा कोरेगांव सारखे प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळले. नवीन सिंचन प्रकल्प , रस्ते , महाराष्ट्रात उद्योगधंदे आणण्यासाठी केलेले प्रयत्न ही सर्व कार्ये जनतेला चांगली ठावूक आहेत. तुम्ही म्हणता फडणवीस यांच्यावर भाजपचे राज्यातले दिल्लीतील नेते नाराज आहेत. फडणवीस यांच्यावर कोण-कोण नाराज आहेत हे पहाण्यापेक्षा तुम्ही अजित पवार नाराज आहेत की नाही? असल्यास का आहे हे पहा. जे नाराज आमदार अजित पवार यांचेसह शपथविधीसाठी गेले होते ते का नाराज आहेत ते पहा. प्रत्यक्षात फडणवीस यांच्यातील विकासाभिमुख, प्रामाणिक , अभ्यासू , निष्कलंक महाराष्ट्रासाठी झटणारा राजकारणी हा महाविकास आघाडीच्या डोळ्यात खुपत होता आणि प्रामाणिक, सरळ माणसाला. दोष देण्यास कुठेही जागा नसते आणि म्हणूनच त्यांच्यातील “जे आहे ते आहे आणि जे नाही ते नाहीअशा पद्धतीने कार्य करण्यात , “पुन्हा येईनयातल्या आत्मविश्वासात इतरांना मी पण दिसतो. परंतू फडणवीस हे मी पणाचा लवलेशही नसलेले नेते आहे हे अभिनंदनाच्या भाषणांतून विशेषत: बच्चू कडू यांच्या भाषणातून महाराष्ट्रवासीयांना दिसून आले.