Click "Follow" Button below To Follow this Blog

३०/०७/२०२६

Article on abusing and vulgarllity in jantar mantar protest

 ना माँ का डर, ना बाप का डर बेटा निकला व्हॉलेंटीयर 

जंतर-मंतर दिल्ली येथे झालेल्या आंदोलनात  तरुण तरुणींनी केलेला अश्लीलतेचा कळस पाहून त्यांची कीव येते, रागही अनावर होतो. हे निर्लज्ज तरुण तरुणी त्याच वैभवशाली देशातील आहे का ज्या देशात अनेक महान तरुण होऊन गेले.

लहानपणी अभ्यास न करता जी मुले निव्वळ खेळायला, हुंदडायला जाणाऱ्या मुलांना  वडील मंडळी शीर्षकात जी हिंदी भाषेतील म्हण दिली आहे ती ऐकवत असत. बरेच राजकीय पक्ष त्यांच्या पक्षाचे वॉलेंटियर बनावे म्हणून आवाहन करीत असतात. नुकत्याच नव्याने जन्म घेतलेल्या आणि अजब नांव धारण केलेल्या झुरळ पार्टीने सुद्धा तसे आवाहन त्यांच्या वेबसाईटवरून केलेले आहे. त्याच पार्टीने नीट पेपरफूट प्रकरणावरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केले आणि त्यासाठी लाखो Gen Z तरुण रस्त्यावर उतरले होते. आंदोलना दरम्यान या तरुणांनी मांडलेला उच्छाद अवघ्या जगाने पाहिला. या आंदोलनाचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये प्रचलित झाले  तरुण-तरुणींच्या तोंडातून देशाच्या पंतप्रधानांना दिलेल्या शिव्यांची लाखोली ऐकून भारतातील सुज्ञ, विचारी, संस्कारी जनांना वाईट वाटले, वेदना झाल्या. शिव्याच नव्हे तर अश्लील हावभाव सुद्धा Gen  Z पिढीतील काही तरुण करत होते. एका महिला पत्रकाराचा विनयभंग सुद्धा या दरम्यान झाला. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे काही गैर नाही. सरकार जर का काही चुकीचे करत असेल तर आंदोलन होणारच पेपरफुटीचे प्रकरण झाल्यावर cjp ने आंदोलन पुकारले परंतु नीट पेपरफुटीमध्ये सहभागी असणाऱ्यांवर सरकारने कारवाई केलेली होती.  काहींना अटक सुद्धा झाली होती. तरीही शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा तगादा सीजेपीने लावला व अखेर त्यांनी तो दिला. त्यांच्या  आंदोलनात काही समाजकंटक सहभागी झाले आणि त्यांनी शिव्या, अश्लील हावभाव, तोडफोड, पोलिसांवर हल्ले, सार्वजनिक संपत्तीची नासधूस अशी कृत्ये केली पण असे करणारे तरुण हे सीजेपीचे नव्हते असे अभिजीत दिपके यांनी सांगितले. पण ते कोण होते हे आता हळूहळू पुढे येत आहेच. काही तरुणांची मजल तर भारतीय सेना, पोलीस यांच्याविरुद्ध अपशब्द काढण्यापर्यंत त्यांना धक्काबुक्की करणे व मारण्यापर्यंत गेली. कोण होते हे तरुण ? यांची एवढी हिंमत कशी काय होते ? यांना मदत करणारे कोण होते ? यांच्या मागे आतंकवादी , देशविघातक लोकं होते का ? याचा सर्व शोध तपास यंत्रणा आता घेतीलच. मोदींना हुकुमशहा म्हणत हे नतद्रष्ट तरुण त्यांना शिव्या देत होते. मोदी जर हुकूमशाह असते तर हे तरुण त्यांना अशा मोकाटपणे सुसाट शिव्या देऊ शकले असते का ? यांना हुकूमशहा कसा असतो ते दाखवण्यासाठी अफगाणिस्तान, उत्तर कोरिया सारख्या देशांमध्ये पाठवायला हवे. हिटलरची कृत्ये वाचायला द्यायला हवी. तेंव्हा यांना लोकनियुक्त पंतप्रधान आणि हुकुमशाह यातला फरक कळेल. भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की जो लोकशाहीचे तंतोतंत अनुसरण करतो. या देशाने कित्येक असे तरुण पहिले आहे ज्यांनी अल्पायुष्यात मोठी प्रगल्भता दाखवून महान कार्ये केली आहे. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, तोरणा किल्ला जिंकला तेव्हा शिवाजी महाराज सोळा वर्षाचे होते, 

उदंड शिव्या दिधल्या । तितुक्या अंतरात्म्यास लागल्या ।
विचार पाहतां प्रत्यया आल्या । यथातथ्य ॥
शिव्या दिल्या की त्या अंतरात्म्याला जाऊन लागतात असे सांगणारे रामदास स्वामी ऐन तारुण्यात घर सोडून बाहेर पडले होते व जगाला दासबोध सारखा ग्रंथ दिला, वयाच्या तिशीत  अमेरिकेमध्ये हिंदू धर्माची पताका फडकवून, भारताचा नावलौकिक वाढवून स्वामी विवेकानंद 39 व्या इहलोक सोडून गेले होते, वयाच्या चाळिशीत महापराक्रमी बाजीराव पेशव्याने 41 लढाया जिंकून शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याचा भारतभर विस्तार केला होता, सावरकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, बाबू गेनू, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू या तरुणांनी ऐन तारुण्यात देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले होते, प्राण दिले होते. अशा या तरुणांची यादी केली तर त्या यादीनेच कितीतरी पाने भरून जातील. अशा या तरुणांच्या देशात जंतर-मंतर दिल्ली येथे झालेल्या आंदोलनात काही तरुण-तरुणींनी केलेला अश्लीलतेचा कळस पाहून त्यांची कीव येते, रागही अनावर होतो. हे निर्लज्ज तरुण-तरुणी त्याच वैभवशाली देशातील आहे का ज्या देशात वर उल्लेखलेले महान तरुण होऊन गेले ? असा प्रश्न या देशवासीयांना हे आंदोलन पाहून पडला.
     Gen  Z पिढीतील अनेक तरुण हे चांगल्या इमारती, भरमसाठ फी, उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या शाळा महाविद्यालयातून शिकलेले आहे. त्यापैकीच काही या आंदोलनामध्ये समाविष्ट होते. मग यांना खरोखरच चांगले शिक्षण मिळाले आहे ? यांनी जिथे शिक्षण घेतले त्या शिक्षण संस्था भरमसाठ फी घेऊनही यांना एक आदर्श विद्यार्थी का घडवू शकल्या नाहीत ? की खरे विद्यार्थी हे घरीच होते व  आंदोलनकर्त्यांमध्ये मध्ये सर्व समाजकंटक आणि देशविघातक प्रवृत्ती होत्या ?  मोठमोठ्या शहरांमधील इंग्रजी शाळांमधून, महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य मिळत आहेत का ? असे काही प्रश्न या आंदोलनातील काही तरुण-तरुणींना अश्लील हावभाव आणि शिवीगाळ करतांना पाहून तमाम देशवासीयांना पडले आहे. 
         विद्यार्थ्यांना हाताशी धरून त्यांचा सत्ता प्रवेशासाठी मार्ग म्हणून उपयोग करणाऱ्या सगळ्या पक्षांच्या उपद्रवी कार्यकर्त्यांना या देशातील जनता "ना माँ का डर, ना बाप का डर बेटा निकला व्हॉलेंटीयर" असेच आज म्हणत असेल.

२८/०७/२०२६

Article about ideal teacher, head mistress Aney madam

जानेवालो की याद आती है..


आज गुड पॅरेंटिंग और स्कूल मे न डाटना, न मारना, विद्यार्थीयोको सजा न देना इस कारण Gen Z पिढी के कई युवा बिगड गये है|आज की पिढीमे अणे मॅडम जैसे आदर्श शिक्षक ज्यादा से ज्यादा संख्यामे हो ऐसी उम्मीद है |
ऐसे आदर्श शिक्षक जो बालकोमे, युवाओमे
नया जोश, नयी उमंग और देशभक्ती भर  दे |

कल शाम साडेचार पाच बजे के करीब व्हाट्स ॲटप के एक गृपमे एक दुखद संदेश दिखाई दिया | वो संदेश था राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका हम सब की चहेती प्रधानाचार्या वनमाला अणे इनके निधन का | संदेश पढा और मै शोकाकुल तथा स्तब्ध हो गया | संदेश की खातरजमा करने के लिए मैने वनमाला अणेजी के सहकारी रहचुके स्व. प्रल्हाद कोरडे के सुपुत्र मेरे बालमित्र राधेश्याम कोरडे को फोन कर पुछा तब राधेश्याम कोरडे ने इस वृत्त की पुष्टी की | फिर कई सारे सोशल मीडिया गृपपर उनके निधन की वार्ता आने लगी और मेरे साथ अणे मॅडम के कार्यकालमे ए.के. नॅशनल हायस्कूल के विद्यार्थी रह चुके मेरे कई दोस्त भी गमके सागर मे डूब गये| एक दुसरे को फोन करके मॅडम के निधन का शोक जताने लगे |आखिर अणे मॅडम मे ऐसा क्या था की विद्यार्थी  इतने शोकाकुल हो गये थे ? मै ये सोचने लगा और मुझे मेरे पाठशाला मे बिताये हुए दिन याद आने लगे | नॅशनल हायस्कूल की प्रधानाचार्या एक अनुशासनप्रिय और एक सच्ची शिक्षका है यह देखकर मेरे पिताजी ने मुझे उस स्कुलमे दाखिल कर दिया था | मै उस दौरमें चला गया | प्रधानाचार्य को पूरी स्कूल का कार्य देखना होता है इस वजह से शिक्षकों की तुलनामें उसका विद्यार्थियों से संबंध कम आता है|ऐसा होने के बावजूद भी अणे मैडम विद्यार्थियोंमे इतनी प्रिय कैसे हो गई ? इसका उत्तर मैं सोचने लगा |  फिर मेरे मन ने जबाब दिया,  कोई भी व्यक्ति उसका कर्म सच्ची भावना और निष्ठासे  करता है, अपने कार्य को व्रत मानकर आगे बढ़ता है तो फिर सन्मान और लोकप्रियता उसके कदम छुती है | लोगों का प्यार उसे मिलता है और लोकप्रियता अपने आप उसके पीछे चली आती है | अणे मैडम का वैसा ही हुआ | कर्तव्यपथपर वह आगे बढ़ती गई और एक दिन ऐसा आया कि उन्हे उस समयके राष्ट्रपति शंकरदयाल शर्मा इनके करकमलो द्वारा आदर्श शिक्षक पुरस्कार भी प्राप्त हुवा| 

     आजसे दस साल पहले मैने उन्हे एक पत्र लिखा था जिसका जवाब उन्होंने मुझे दिया था| उन्होने उनके जवाब में मेरी सरहाना कर मुझे आशीर्वचन दिये थे | मैने उन्हे जो पत्र लिखा था उसमें उनकी कई यादे लिखी थी| यहाँ वो लिखी तो उनकी पुनरावृत्ती हो जायेगी और वो मैं नही करुंगा |

(अणे मॅडम को लिखा हुआ पत्र पढणे के लिए यहा क्लिक करे)

लेकिन उस पत्रमें जो यादे नही लिखी थी वो जरूर लिखुंगा|मुझे याद है मॅडम जब ऑफिस मे बैठी हुयी रहती थी तब किसी भी विद्यार्थी की मजाल नही थी की वो ऑफिस के सामने से जाये,  इतना आदरयुक्त डर विद्यार्थीयो के मनमे रहता था | वैसेही जब मॅडम स्कूल सुरू होने के बाद पुरे स्कूल का एक चक्कर लगाती थी तो सभी कक्षाओमें पिन ड्रॉप सायलेन्स रहता था, और बरामदे मे ऐसा वातावरण रहता था जैसे मानो कर्फ्यू ही लगा हुवा हो | मुझे खुशी है की कक्षा पाचवी मे ही मेरा और मॅडम का परिचय हुआ था मै मेरी कक्षा का वर्गनायक था और मॅडम ने मुझे वर्गनायक का बॅज लगाकर मेरा सन्मान किया था | मॅडमसे जुडी हुई ऐसी कई यादे कई विद्यार्थीयोको भी होगी|

शिक्षा क्षेत्रमे आने के कारण मुझे कई बार शिक्षा अधिकारी बुलढाणा कार्यालय मे जाने का मौका मिलता है और वहाँ जाने के बाद मै जब वहाँ लगी हुयी आदर्श शिक्षक सन्मान प्राप्त शिक्षको की सूची पढता हुं और उसमें  हमारी अणे मॅडम का नाम देखता हुं, तो मुझे बडा ही गर्व प्रतीत होता है, और मेरे दिल में मॅडम के प्रति जो आदर है वो और भी बढ जाता है |

हम खुशनसीब है की हमे अणे मॅडम जैसी प्रधानाचार्या और कई ऐसे आदर्श शिक्षक गण मिले जिनसे हमे बहुत कुछ सिखने को मिला | आज हमारे पुत्र-पुत्री Gen Z पिढी के युवा है जिनके अपने विचार है | जो मोबाईल युग मे पैदा होने के कारण उन्हे सही दिशा मिल नही रही है वो आभासकोही सत्यता मान रहे है | आज गुड पॅरेंटिंग और स्कूल मे न डाटना, न मारना, उन्हे सजा न देना इस कारण Gen Z पिढी के कई युवा बिगड गये है  | आज की पिढीमे अणे मॅडम जैसे आदर्श शिक्षक ज्यादा से ज्यादा संख्यामे हो, ऐसे आदर्श शिक्षक जो बालकोमे, युवाओमे नया जोश, नयी उमंग और देशभक्ती भर  दे |

 ऐसी उम्मीद रखते हुए यहाँ समापन करता हुं| 

जानेवाले कभी नही आते,

जानेवालो की याद आती है |

अणे मॅडम की भी याद उनकी कार्यप्रणाली, कर्तव्यपरायणतासे हमेशा आती रहेंगी | अणे मॅडम को भावपूर्ण श्रद्धांजली |

१७/०७/२०२६

Article about big tree cutting.

झाडे तोडलियावरी दुःखास पारावर काये ?...

संग्रहित चित्र


यंत्रांच्या सहाय्याने तोडलेल्या, पडलेल्या त्या झाडांच्या मुळांकडे पाहून येत होती. पुर्वी ज्या रस्त्यावर नेहमी वृक्षांची गर्द सावली असे त्या रस्त्याकडे पाहून आता ओकं-ओकं वाटत होतं. तो रस्ता बोडखा वाटत होता.

12 जुलै, रविवार रोजी काही खरेदी निमित्ताने मेन रोडवर गेलो होतो. मोठ्या देवी चौकात विड्याची पाने घेण्यास थांबलो तर तिथे एक व्यक्ती आला. "काय राजेहो मोठी - मोठी झाडे तोडणं लावलं" असे खिन्नतेने पानवाल्यास उद्देशून म्हणाला. कुठली झाडे ? मी त्याला त्वरीत विचारले.  "जाऊन पाहा न पोलिस स्टेशन रोडनी तो उत्तरला. मोठी देवी चौक ते पोलिस स्टेशन या रस्त्याने मी निघालो. खिलोशिया उपहारगृहासमोर एक ट्री गार्ड तोडलेल्या एका भल्या मोठ्या झाडाच्या खोडासह बांधकाम सुरू असलेल्या त्या रस्त्याचे तात्पुरते दुभाजक म्हणून ठेवण्यात आले होते. आणखी पुढे गेल्यावर एका तयार कपड्यांच्या दुकानासमोरचे मोठे कडूनिंबाचे झाड, आदर्श हॉटेलच्या बाजूचे भले मोठे झाड व आणखी काही झाडे तोडणे सुरू होते, त्यांच्या भल्या मोठ्या फांद्या मालवाहू गाड्यांमध्ये भरणे सुरू होते. बालपणी मी कमान गेट म्हणजे अग्रसेन चौका जवळ राहत होतो. मला समजायला लागल्यापासून ही झाडे मी बघत आलो होतो. यानुसार ही झाडे शंभर दीडशे वर्षांपेक्षाही अधिक असावी असा अंदाज आहे. नवीन रस्ता निर्मिती कार्यात ही झाडे अडथळा ठरली होती. मुळावर घाव घालणे या म्हणीची प्रचिती मला त्या भल्या मोठ्या, कवेत न येऊ शकणाऱ्या परंतु आता यंत्रांच्या सहाय्याने तोडलेल्या, पडलेल्या त्या झाडांच्या मुळांकडे पाहून येत होती. पुर्वी ज्या रस्त्यावर नेहमी वृक्षांची गर्द सावली असे त्या रस्त्याकडे पाहून आता ओकं-ओकं वाटत होतं. तो रस्ता बोडखा वाटत होता, नवीन रस्ता असूनही सध्यातरी मनहूस भासत होता. कदाचित भविष्यात पुन्हा तो  boulevard (दुतर्फा झाडे असलेला रुंद रस्ता) बनेलही, तशी काही योजना पण केली असेल पण सध्या तरी भकास वाटतो आहे. 

     गेली कित्येक वर्षे या झाडांनी नागरिकांना, त्यांच्या दुचाकी, मोटारसायकल आदी वाहनांना, फेरीवाल्यांना थंडी छाया दिली होती. परिसरातील व्यापारी प्रतिष्ठानांना हवा दिली होती. त्याच रस्त्यावर त्यावेळी मला नैराश्य, स्मशान शांतता दिसत होती, भकास वाटत होते. ते दृश्य पाहणारे तेथे उपस्थित नागरिक, पादचारी स्तब्ध होऊन ते वृक्ष कत्तलीचे दृश्य बघत होते.  मान्य आहे विकास व्हावा परंतू इतकी मोठ-मोठाली झाडे तोडणं अटळच आहे का ? त्या झाडांच्या ठिकाणी थोडा रस्ता अरुंद झाला तर चालणारच नाही का ? मी असे ऐकले आहे की बंगळुरू शहरात झाडे न तोडता त्यांना वाचवून रस्ते, कुंपणाच्या भिंती, छप्पर तयार केले जाते. काही वर्षांपुर्वी संभाजीनगरला एका दुकानाच्या आत काऊंटरला लागून एक मोठे झाड दुसरा मजला पार करून तिसऱ्या मजल्यावर त्याच्या फांद्या गेल्याचे मी स्वत: पाहिलेले आहे. मग याप्रमाणे काही नाही का करता येऊ शकत ? झाडे तोडल्यावर आम्ही नवीन झाडे लावू असे म्हटले जाते पण नवीन झाडे तेवढी मोठी नसतात, किंवा सावली देणारी सुद्धा नसतात. मागच्या वर्षी घाटपुरी बायपासवर फॉक्स टेल पाम मोठ्या संख्येने लावली पण आपल्या भागातील ऊन, दुभाजका मधील निकृष्ट माती यांमुळे त्यातील निदान 80 टक्के तरी झाडे वाळून गेली. म्हणजे झाडही गेले आणि शासनाचा पैसाही. झाडे लावताना आपल्या भागातील वातावरणाचा अभ्यास करून मग ती झाडे लावली गेली पाहिजे. खामगाव सारख्या प्रचंड ऊन असलेल्या शहरात फॉक्स टेल पाम जगणे कठीण आहे.

  आपण सर्व शिवाजी महाराजांचे खूप नांव घेतो त्यांचा अभिमान बाळगतो. ते योग्यच आहे पण छत्रपतींनी दिलेला संदेश मात्र पार विसरून जातो. नोकरशाही , नेते मंडळी सुद्धा विसरतात म्हणून शिवाजी महाराजांनी दिलेल्या आज्ञापत्रातील काही अंश येथे देत आहे.

लाकडे आरमाराचे प्रयोजनाची. परंतु त्यास हात लाऊ न द्यावा. काय म्हणोन, की ही झाडे वर्षा दो वर्षाने होतात यैसे नाही. रयतेने ही झाडे लाऊन लेकरांसारखी बहुत काळ जतन करून वाढविली ती झाडे तोडलियावरी त्यांचे दुःखास पारावर काये? येकास दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारासहित स्वल्पकाले बुडोन नाहिसे होते. किंबहुना धन्याचेच पदरी प्रजापीडनाचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावें हानीही होते. याकरितां हे गोष्ट सर्वथा होऊ द्यावी. कदाचित यखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल, तरी त्याचे धन्यास राजी करून त्याचे संतोषे तोडून न्यावे. बलात्कार सर्वथा न करावा.’

या आज्ञापत्रावरून शिवाजी महाराज रयतेप्रती आणि स्वराज्यातील झाडांविषयी किती काळजी करत हे सहज लक्षात येते.

     विकासास कुणाचाच विरोध नाही, तो अवश्य व्हावा. खामगांव शहर कधी नव्हे एवढे विकसित होत आहे हे कुणीच नाकारू शकत नाही. खामगांवातील उद्यानांनी आता कात टाकली आहे. काही नवीन उद्याने झाली आहे. ही उद्याने इतकी सुंदर झाली आहेत की, यात काढलेले फोटो कुण्या मोठ्या शहराच्या बगीच्यातील किंवा पर्यटन स्थळावरील वाटावीत अशी असतात. निसर्ग समृद्ध जनुना तलाव सुद्धा आता अत्याधुनिक खेळांच्या साधनासह, नूतनीकरणासह एक आनंददायी स्थळ म्हणून खामगांवकरांसाठी सज्ज होत आहे. 

    या लेखाचा उद्देश हाच आहे की, शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे मोठ-मोठाली झाडे न तोडण्याची आज्ञा दिली होती तशीच अंमलबजावणी सांप्रत प्रशासनाने सुद्धा करावी. अगदीच नाईलाज असल्यास मगच झाडे तोडावी. ती तोडलीच तर शोभेची झाडे न लावता तोडलेल्या झाडांच्या तोडीची नवीन झाडे लावावीत व ती जगवावी जेणे करून शिवाजी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे "झाडे तोडलियावरी दुःखास पारावर काये ?"  याप्रमाणे दुःख होणार नाही.