साध्या-सुध्या(धा)
मूर्ती
आपल्या भारतात साधी राहणी
असलेले अनेक व्यक्ती होऊन गेले आणि आजही आहेत. बाह्य जगतातील
चमकधमक त्यांना
आकर्षित करीत नाही. महात्मा गांधींपासून तर आताच्या बाबा आमटे, साधनाताई,श्री व सौ प्रकाश आमटे यांच्या पर्यंत. तशी तर ही यादी फार मोठी होईल पु.ल.देशपांडे, नाना
पाटेकर,मेधा पाटकर व इतरही अनेक यात
समाविष्ट आहेत. याच यादीत एक नांव अजूनही आहे ते म्हणजे कर्नाटकातील कुळकर्णी दाम्पत्याची कन्या व Infosys च्या मालकीणबाई
सुधा मूर्ती. सुधा मूर्ती या तशा उत्कृष्ट लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून
देशात सर्वज्ञात आहे. “वाईज अॅण्ड अदरवाईज”,“डॉलरबहू”,”सुकेशिनी” अशी त्यांची
पुस्तके गाजली आहेत.इयत्ता सातवीच्या महाराष्ट्र महामंडळाच्या मराठीच्या पुस्तकात
त्यांच्या एका गोष्टीचा पाठ म्हणून सुद्धा समावेश केला आहे. अनेक लोकांना त्यांनी
त्यांच्या संस्थेतर्फे मदत केली आहे.त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य परवाचा तरुण भारत वाचतांना समजले ते “एकवीस वर्षांपूर्वी घेतली शेवटची साडी” अशा शीर्षकाची बातमी
वाचून.कुणालाही वाचताक्षणी खरी वाटणार नाही अशी ती बातमी होती.साड्या हा
बायकांच्या अत्यंत आवडीचा विषय.आपली साडी सर्वांपेक्षा वेगळी असावी असा त्यांचा
नेह्मीचा प्रयत्न. साड्यांचा संग्रह करण्याची आवड सर्व बायकांमध्ये सारखीच असते.
सुधा मूर्ती यांना मात्र शेवटची साडी खरेदी करून आता तब्बल एकवीस वर्षे झाली आहेत.श्रीमंतांचे कपडे,त्यांची खरेदी हे आपण अनेकदा वाचतच असतो.भारतातील श्रीमंत महीलांपैकीच एक असेलेल्या सुधा मूर्ती यांनी मात्र एकविस वर्षात एकही साडी घेतली नाही.एकवीस वर्षांपूर्वी त्या काशीला गेल्या होत्या.या क्षेत्री एखादी आवडीची वस्तू त्यागावी असे त्यांना कळले आणि त्यांनी साडी खरेदीचा त्याग केला.अनावश्यक खर्चाचा त्याग केला तर आपल्या जवळील शिलकीतून गरजूंना मदत करता येते असे त्यांचे तत्व.1981 मध्ये Infosys कंपनीची सुरुवात सुद्धा त्यांनी जमा केलेल्या 10000 रुपयांतूनच झालेली आहे.आपले पती नारायण मूर्ती जे आता अब्जावधींची उलाढाल करतात त्यांना सुधा मूर्ती यांनी ते 10000 रु दिले होते.त्यांची साधी राहणी पाहून प्रश्न पडतो की,साधे राहण्याची ही अंत:प्रेरणा येते तरी कुठून? याचे उत्तर

शोधू जाता हेच लक्षात येते की ज्यांना पै-पैची किंमत
आहे,ज्यांना पैसा आणि भौतिक सुख म्हणजे सर्वस्व वाटत नाही,ज्यांना नश्वरता आणि अध्यात्म
कळले आहे,ज्यांना गरीबी काय असते याची जाणीव आहे त्याच लोकांना हे जमू शकते.आताच्या
जाहीरातींना भुलून दिवसापरत आवश्यकता नसतांनाही “शॉपिंग” करणा-
यांना,भौतिक सुखातच
रममाण होणा-यांना ते शक्य नाही.“हे घेऊ का ते घेऊ, दुकान उचलून सारे नेऊ” याप्रमाणे आता सर्वांची गत झालेली आहे.चपलांचे अनेक जोड,“एक नूर आदमी आणि दस नूर
कपडा” एवढे प्रत्येकाचे कपडे,साड्यांनी भरलेली कपाटे,शेजा-याने अमुक वस्तू घेतली
काय? मग माझ्याकडे पण ती वस्तू असलीच पाहिजे असा परिस्थिती नसतांनाही असलेला अट्टाहास
अशीच स्थिती आता सर्वत्र दिसत आहे. कुणी काय घ्यावे? आणि कुणी किती खरेदी करावी
आणि किती करू नये? हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न.या
तंत्रसमृद्ध परंतू मनाची
शक्ती लुप्त झालेल्या काळात कुणाला काही सांगावे,उपदेश द्यावा अशी आताची परिस्थिती
नाही.“आमच्या जवळ आहेत पैसे,म्हणून आम्ही घेतो,तुम्ही कशाला नसता सल्ला देता”
असेही उत्तर मिळू शकते व सल्ला देणा-यास मूग गिळून गप्प बसावे लागू शकते.“गरज असेल
तर घ्या, वस्तू जपून वापरा किंवा टिकवा” असा जमाना गेला.परंतू आजही सुधा मूर्ती
यांच्या सारख्या लोकांच्या समाज कार्य,साधेपणा,सचोटी अशा आशयाच्या सकारात्मक बातम्या
वाचल्या की त्या जनतेला प्रेरणा देऊन जातात.साधी राहणी आणि सचोटी हा गुण सुधा
मूर्ती यांच्यात बालपणापासूनच आहे.त्यांच्या या गुणांना तसेच त्यांच्या सामाजिक
कार्याला मानाचा मुजरा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा