Click "Follow" Button below To Follow this Blog

३०/०५/२०१९

Article on the program on ABP Majha , which is suppose to be decide Great Savarkar as Villein



अ”प्रसन्न” करणा-या  चर्चा

पूर्वी दूरदर्शनच्या मराठी वाहिनीवर “सपट महाचर्चा” असा एक प्रायोजित कार्यक्रम सादर होत असे.
कदाचित आठवड्यातून एकदाच त्याचे प्रसारण होत असावे. या कार्यक्रमाने खूप लोकप्रियता मिळवली होती. याचे कारण सर्व चर्चा या चांगले विषय , योग्य हाताळणी , सर्वांना बोलण्याची संधी व चर्चा सुजाणपणे , सुयोग्य शब्दांत पुढे सूत्रधार. कुठेही कोणता आक्रस्ताळेपणा नाही का      दुस-याला चूप बसवण्याची घाईगर्दी नाही.  परंतू हळू-हळू विविध वृत्त वाहिन्यांचे आगमन झाले. यात मोठ-मोठ्या कंपन्या व त्यांचे बातम्या देणारे चॅनल्स आले. स्पर्धा आली. आपल्या वाहिनीला अधिक TRP मिळावा म्हणून नाना क्लृप्त्या आल्या. मग त्यात कुणाचे चारित्र्य हनन का होत असेना. नाना वाहिन्यांनावर नाना चर्चा सुरु झाल्या. सूत्रधार जणू स्वत:चीच री ओढू लागले. सर्कसीतील रिंगमाष्टर ज्याप्रमाणे एका चाबकाच्या फटका-याने मोठ मोठ्या हिंस्त्र प्राण्यांना मुकाट्याने आपल्या जागी खिळवून ठेवत असे त्याप्रमाणे हे सूत्रधार आपल्या शाब्दिक बाणांनी चांगल्या-चांगल्या वक्त्यांना मूक करु लागले. मुद्दा पूर्ण होण्याच्या आधी मध्येच बोलणे,  कुणी बोलायला लागला की वेळ कमी असल्याचे सांगणे व चर्चा आपल्याला जशी पाहिजे बरोबर त्या पद्धतीने वळवणे असे यांचे उपद्व्याप सुरु झाले. परवा “स्वातंत्र्यवीर सावरकर नायक की खलनायक” अशी चर्चा एबीपी माझा या वृत्तवाहिनीने ऐन सावरकर जयंतीच्याच दिवशी आयोजित केली होती. या चर्चेने तमाम महाराष्ट्रवासी प्रसन्न जोशी या सुत्रधारावर अप्रसन्न झाले. ज्या सावरकरांबद्दल देशातील जनतेत नेतांत आदर, प्रेम आहे त्या सावरकरांना खलनायक ठरवू पाहणारे असे चर्चेचे शीर्षक देऊन एबीपी माझाने रोष ओढवून घेतला. याच प्रकारचा विषय बीबीसी ने सुद्धा हाताळला. एबीपी व बीबीसी
यांच्यातील हा समान विषय नक्कीच काहीतरी सूचित करणारा आहे. सुनियोजित पद्धतीने बरोबर टार्गेट निवडायचे व टीका करायच्या हे यांचे व्यावसायिक फायदे मिळवण्याचे गणित. या देशातील महान नेत्यांना, त्यातही ज्यांच्या विरोधात बोलण्याने जास्त उपद्रव होणार नाही असे नेते निवडणे जेणे करून TRP तर वाढेलच शिवाय व्यावसयिक फायदाही होईल. उपद्रव मूल्य कमी असलेल्या जनतेच्या नेत्यांना टार्गेट केल्याने यांच्या कार्यालयावर कुणी हल्लेही करणार नाही व यांच्या कर्मचा-यांना कुणी मारहाणही करणार नाही. जनतेने या अशा वृत्तवाहिन्यांना ओळखणे जरुरी आहे. ज्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याच्या नावाखाली जनता ज्या नेत्यांवर प्रेम करते , ज्यांना आदरस्थानी मानते , ज्यांनी इंग्रजांच्या अत्याचा-यांचा धीराने सामना केला आहे त्या सावरकरांसारख्या स्वातंत्र्यवीर नेत्याला हेतुपुरस्सर खलनायक ठरवू पाहतात. परंतू यांच्या या अशा उपद्व्यापाला आता जाणती जनता थारा देणार नाही. नवीन पिढी आता अधिक जागरूक व आहे. पुरोगामीत्वाचा आव आणून उठ-सूठ हिंदू नेते , हिंदू देवी देवता , केवळ हिंदू धर्मातीलच प्रथा यांविरोधीच तेवढे बोलायचे हाच काय यांचा तो कार्यक्रम. एबीपी माझा व बीबीसी वरील सावरकरांना खलनायक ठरवू पाहण्याचा प्रयत्न करणारेच खलनायक ठरले आहेत. सावरकरांची प्रतिमा तर आणखी उजळून निघाली आहे. एबीपी माझा वर प्रसन्न जोशीने जरी दिलगिरी व्यक्त केली असली तरी प्रसन्न व एबीपी यांबाबत जनतेची अप्रसन्नता कदापी न संपणारी आहे.          


२८/०५/२०१९

Rajasthan modifies Savarkar chapter in textbooks, he is no longer described as ‘brave revolutionary’...article elaborate on this issue


सावरकरांची अवहेलना करणा-यांनो, तुमच्या कडून कोलू तरी हालेल का?

      आज सावरकर जयंती. सावरकरांची उपेक्षा पारतंत्र्यात तर झालीच झाली परंतू स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा होतच आली, सावरकरांच्या मृत्यू उपरांत सुद्धा होतच आहे. यात पुनश्च भर पडली ती राजस्थानात सत्ता बदल झाल्यावर. राजस्थानात वसंधुरा राजे सरकार पडले व नवीन सरकार आले. नवीन सरकार आल्यावर इतर काही उपाययोजना , विकासात्मक कामे हे हाती घेण्या ऐवजी शिक्षण मंत्रालयाने पहिले कार्य कोणते केले असेल ? तर ते होते इयत्ता दहावीच्या समाज विज्ञान पुस्तकातील सावरकर चरित्रातील मजकूर बदलण्याचे. काय तर म्हणे की , “या पाठात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्वतंत्रता सेनानी म्हणून जो उल्लेख केला आहे जो चुकीचा आहे. वर्ष 2017 मध्ये “अंग्रेजी साम्राज्य के प्रतिकार और संघर्ष“ या पाठाचा समावेश करण्यात आला होता. या पाठात सावरकरांच्या चरित्राचा सुद्धा समावेश आहे. शिवाय इतरही स्वतंत्र सेनानींचा सुद्धा समावेश या पाठात आहे. यात सावरकरांचा जो स्वतंत्र सेनानी म्हणून उल्लेख करण्यात आला , त्यांना दोन वेळ जन्मठेप झाल्याचें सांगितले आहे त्याला काही आधार नाही असे श्री गोविंदसिंह डोटासरा या शिक्षण मंत्र्यांना वाटते व तसे त्यांनी त्यासाठी गठीत केलेल्या समितीला कळवले आहे. या समितीने त्याही पुढे जाऊन सावरकरांचा अनादर केला आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकात सावरकरांनी स्वत:चे वर्णन पोर्तुगाल पुत्र असी केल्याचा उल्लेख आहे. या देशात अद्यापही स्वतंत्र सेनानींचा असा अनादर , असा अपमान होत असेल तर यासारखे दुर्दैव कोणते. या आजच्या पिढीतील नेत्यांना झाले तरी काय ? विचारसरणी वेगळी म्हणून हे स्वतंत्रता सेनानींचा अनादर, अपमान करतात, कुणी सावरकरांचा तर कुणी गांधीजींचा. हे सर्व बंद होणे, प्रसंगी यासाठी सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करणे जरुरी आहे. स्वतंत्र सेनानी मग ते कोणत्याही विचारसरणीचे असो त्यांचा अपमान, अनादर कुणी करूच नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून , धूर्त राजकारणी स्वत:ची राजकीय पोळी शेकण्यासाठी काहीही बरळतात,

शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल करतात. हे सर्व थांबले पाहिजे. तमाम स्वतंत्र सेनानीचा आदर देशवासीयांनी, सरकारनी कायम राखणे आवश्यक आहे. राज्यात कुण्या का पक्षाचे सरकार येवो.  खरा , प्रेरणादायी इतिहास हा शैक्षणिक अभ्यासक्रमात असलाच पाहिजे, त्यात सर्वच स्वतंत्रता सेनानींचा सामावेश असलाच पाहिजे, त्यांचा सन्मान कायम राखल्याच गेला पाहिजे.महाराष्ट्र सरकारने या बाबत राजस्थान सरकारला पत्र देणे जरुरी आहे. तसेच तमाम सावरकर प्रेमींनी राजस्थान शिक्षण मंत्र्यांना निवेदने पाठवावीत. याच राजस्थान सरकारच्या शिक्षणा खात्याने मागे लोकमान्य टिळकांचा “दहशतवादाचे जनक” असा उल्लेख संदर्भ पुस्तकात केला होता. आता त्याच राजस्थानचे शिक्षण मंत्रालय सावरकरांना स्वतंत्रता सेनानी म्हणून नाकारत आहे. यांच्या कडून असे म्हणवले तरी कसे जाते ? ज्या सावरकरांचा तुम्ही असा अपमान करता तुमचे अध्यक्ष सावरकरांची महानता नाकारतात, तुमचे मणिशंकर अंदमानातील सावरकरांच्या काव्यपंक्ती पुसतात. तुमच्या या असल्या व्देषपूर्ण कृतीच तुम्हाला रसातळाला नेत आहेत. सावरकरांची देशभक्ती,देशप्रेम,इंग्रज विरोधी लढा, हे तुम्ही नाकारता ?  सावरकरांनी अंदमानात भोगलेल्या यातना तुम्ही नाकारता ? सावरकरांनी अंदमानात काथ्याकुट केली . तुम्हाला सुक्या नारळाच्या शेंड्या तरी काढता येतील का ? सावरकरांनी कोलू फिरवून तेल काढले तुमच्या कडून कोलू हालेल तरी का ? तुम्ही समुद्राच्या तीराशी जरी उभे राहिले तर तुमचे डोळे फिरतील तो समुद्र सावरकर लांघून गेले. सावरकरांची अवहेलना करण्यापेक्षा तुम्ही ज्या राज्यात निवडून आले त्या राज्याचा विकास कसा होईल ते पहा , तेथील विद्यार्थी शैक्षणिक दुष्ट्या कसे प्रगत होतील त्याकडे लक्ष द्या.केंद्र सरकाने गती दिलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षणास प्राधान्य द्या तुम्ही हे सोडून आकस भावनेने अभ्यासक्रमात जो बदल करीत आहात, सावरकरांना स्वतंत्रता सेनानी म्हणून नाकारण्याचे जे धैर्य करीत आहात त्याने आज तुमचे जे काही अस्तित्व या देशात शिल्लक आहे ते सुद्धा नष्ट होईल व ते सुध्दा तुमच्याच या असल्या नतद्रष्ट आकस,व्देष भावनांच्या कृतींमुळे.

२३/०५/२०१९

After the victory of BJP and NDA in LS 2019 Elections under the leadership of PM Modi and Amit Shah


चौकीदार थोर आहे
     
बहुप्रतिक्षित असलेला लोकसभा निवडणूक 2019 चा निकाल अखेर लागला. तत्पूर्वी “एक्झिट पोल” मधून भाजपा व “एन डी ए” यांनाच सत्ता मिळेल असे भाकीत वर्तवल्या गेले होते. विरोधकांचे “ई व्ही एम” रडगाणे सुरूच होते. शरद पवारांसारखे मोठे नेते हिंसेची भाषा करीत होते, हार झाली तर लोकशाही वरचा विश्वास उडेल अशी वक्तव्ये करीत होते. आता सुप्रिया सुळे ह्या विजयी झाल्या आता तरी त्यांचा “ई व्ही एम” वर विश्वास बसला आहे की नाही ? निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीस राहुल गांधी यांनी “चौकीदार चोर है” करून मोदींविरोधात मोठा कुप्रचार आरंभिला होता. राफेल प्रकरणाचा गवगवा केला होता. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावर ज्या सावरकरांची माफीवीर म्हणून संभावना राहुल करतात त्याच राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाकडे एक नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाचे  पहिल्या माफीपात्राने समाधान झाले नाही म्हणून दोन वेळा माफी मागावी लागली. मोदींनी काहीच केले नाही अशी ओरड विरोधक जरी सतत करीत असले तरी उज्वला योजना, मुद्रा योजना , आयुष्यमान भारत , गावा-गावात वीज, रस्ते विकास , स्वच्छ गंगा यांसारख्या योजना जनतेपर्यंत पोहोचल्या होत्या व त्यांचा लाभ सुद्धा अनेकांना मिळत आहे. जरी सहिष्णू म्हणून आपली ओळख असली तरी अन्याय करणा-यां विरोधात जशास तसे उत्तर भारत देऊ शकतो असा नवीन , सक्षम, मजबूत भारताच्या निर्मितीकडे मोदींनी पाऊल टाकले. अंतरिक्षात मिसाईल सोडून उपग्रह निकामी करून भारताने उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात जगात दबदबा निर्माण केला. भारताच्या बदललेल्या राजकारणाने अजहर मसूद ला सुद्धा जागतिक आतंकवादी म्हणून गेल्या महिन्यात घोषित करण्यात आले. या सर्व गोष्टी जनता बघत होती. तरीही काही तथाकथित मिडीयावाले , बुद्धीजीवी मोदी सरकार पुन्हा येणार नाही, भाजपाच्या कमी जागा येतील ,
मोदी लाट नाही याचा पुनरुचार करीतच होते. परंतू जसे-जसे कल येत गेले तसे तसे या मंडळीना आपण चुकलो असल्याचे कळले हे एका वृत्तचित्रवाहिनीवर स्पष्टपणे कबूल करण्यात आले. मोदी हेच देशासाठी योग्य आहे हे जनतेने जाणले म्हणूनच त्यांना जनतेने पुनश्च कौल दिला. 9 राज्यात भाजपा ला स्पष्टपणे कौल मिळाला आहे. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी “आता आणखी जबाबदारी वाढली आहे, अधिक जोमाने कामे करावी लागतील” असे वक्तव्य केले आहे. खरेच आहे जनतेने भाजपा व मित्र पक्षांची केलेली निवड ही आगामी सरकारला सार्थ करून दाखवावी लागणार आहे. विरोधकांनी सुद्धा कुठे चुकले याची पडताळणी करणे जरुरी आहे. अमेठीचा परंपरागत गड राहुल गांधी यांना राखता आला नाही, अशोक चव्हाण सारखे दिग्गज नेते यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. दिग्विजयसिंग पडले, सुशीलकुमार शिंदे सुद्धा पराभूत झाले. विरोधकांनी आत्मपरीक्षण करणे जरुरी आहे, विकासाचे राजकारण करणे जरुरी आहे , राज्यातील नेत्यांना केंद्रीय नेतृत्वाने पुढे आणणे जरुरी आहे. भारतीय राजकारण आता बदलत आहे नवीन तरुण मतदार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या तरुणांना आपला देश आपले नेतृत्व हे कणखर , सक्षम असे हवे आहे. लेचेपेचे काहीही बरळणारे, कुटुंबाच्या पुण्याईवर पुढे आलेले नेते त्यांना नकोत. याची सुद्धा जाण नेत्यांनी ठेवायला हवी. शिवाय मोदींची खूपच तुच्छ शब्दात , प्रसंगी शिव्या देऊन केलेली संभावना दुस-याला, उच्चपद्स्थांना मान देण्या-या , आदर करण्या-या अस्सल भारतीयांना कधीच रुचणार नाही. विरोधकांनी मोदींना शिव्यांची लाखोली वाहिली. “चौकीदार चोर है” असे म्हणून भंडावून सोडले. मोदींनी मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आपली वाटचाल सुरूच ठेवली. व्यस्त कार्यक्रम , देशाची जबाबदारी , प्रचार सभा सर्वांना हाताळत आपल्या पक्षाची व पूर्वी प्रंचड टीका करणा-या सहकारी पक्षातील काही पक्षांची यशाकडे वाटचाल कायम करण्याचे  प्रयत्न सुरु ठेवले. आजच्या या निवडणूक निकालानंतर मोदींनी हेच सिद्ध केले की चोर नसून देशाचा हा “चौकीदार थोर आहे”.

१६/०५/२०१९

Article in memory of Ice Candy , its hawker and related things


आईस्कांडी
आईssssस्कांडी वाला” अशी आरोळी ऐकली की, स्कूटरचे चाक असलेली तीन डब्बे असलेली एक लाकडाची छोटीशी रंगीत लोटगाडी घेऊन आलेल्या त्या फेरीवाल्या जवळ 10,20,50 पैसे घेऊन मुले गोळा होत असत. एक चपटी लाकडी काडी किंवा बांबूच्या छोट्या कामटी पासून बनवलेली काडी असलेल्या छोट्या बर्फाला रंग दिलेली आईस कांडी मुलांना मिळत असे. लाल ,पिवळ्या हिरव्या रंगाची ती कुल्फी असे. लाकडी झाकण उघडून त्यातून तो कुल्फीवाला कुल्फी काढी व मुलांच्या हाती सोपवी.50 पैस्यांची आईस कांडी घेणा-या मुलाचा मोठा मान असे. 10, 20 पैसे वाले त्याच्याकडे व त्याच्या आईस कांडी कडे कुतूहलाने पहात. “आईस कांडी” खरे तर दोन इंग्रजी शब्द यातील “आईस” जसा आहे तसाच राहिला “कँडी” चे मात्र कांडी झाले व हे शब्द उच्चारतांना दोन्ही जोडून “आईस्कांडी” असे उच्चारण सर्व करीत असत. उन्हाळ्यात आईस कांडी मिळणे हिच मोठी गोष्ट होती. ती मिळाली की लहान मुले खुश. “आईस कांडी खाऊ नको रे त्यात अळ्या असतात“ अशी एक अफवा अधूम मधून पसरत असे . कदाचित ज्यांना ती मिळत नसे ते ती अफवा हळूवार पसरवून देत अशी शंका आज मनात येते. खरोखर त्यात अळ्या असत का नाही देव जाणे परंतू आईssssस्कांडी वाल्याची विक्री मात्र चांगली होत असे. हळू-हळू बदल झाला मोठी आईस कांडी, मटका कुल्फी  ह्या काळाच्या ओघात लुप्त झाल्या. कदाचित ग्रामीण भागात त्या मिळतही असतील परंतू शहरातून त्या गेल्या व मलई कुल्फी आली. विविध कंपन्यांचे नाना फ्लेवरचे आईस्क्रीम आले. फॅमिली पॅक आले. कुटुंबातील लोक आपल्या
आपल्या आवडीचे फ्लेवर चाखू लागले.आईssssस्कांडी वाला” ही गल्लोगल्ली ऐकू येणारी आरोळी मात्र ऐकू येईनाशी झाली. आता अमूल , दिनशॉ, वाडीलाल , नॅचरल अशा कितीतरी कंपन्यांचे

आईस्क्रीम शहरात व खोडोपाडी सुद्धा उपलब्ध होत आहे. नाना प्रकारची सरबते मिळत आहेत. यांच्या सर्वांच्या भाउगर्दीत ऊसाचा रस आजही तग धरून आहे आईस कांडी मात्र आपला बचाव करू शकली नाही. लोकांची आवड आता झपाट्याने बदलत आहे. जाहिराती, ब्रँड यांना लोक भुलत आहेत परंतू जे साधे आहे, चांगले आहे, ज्याची जाहिरात नाही त्याला आता खराब समजले जात आहे. ज्या आईस कांडीत पूर्वी अळ्या आहे अशी अफवा अधून मधून पसरत असे व त्या कारणास्तव प्रसंगी ती नाकारली सुद्धा जात असे. आज आकर्षक वेष्टनात गुंडाळलेल्या अनेक आईस्क्रीमवर ”यात वनस्पती तेलाचा वापर केला आहे” अशी स्पष्ट सूचना दिली असते. अनेक ठिकाणी अन्न व औषधी प्रशासनाने जास्त प्रमाणात “डालडा” असलेल्या आईस्क्रीम केंद्रांवर धाडी टाकल्या आहेत. आकर्षक म्हणून आपण काय खात आहोत याचे भान ग्राहकाने ठेवणे जरुरी आहे. आज जनतेजवळ पैसा चांगला खुळखुळतो आहे. क्रयशक्ती वाढली आहे. परंतू आपण काय खातो याकडे बारकाईने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. कालच नागपूरला वडा सांबारच्या थाळीत चक्क पाल निघाली. आपल्या व आपल्या मुलांच्या प्रकृतीला जपा. योग्य ते निवडा. पूर्वी 10,20,50 पैस्यांची आईस कांडी घेणारे आज बक्कळ कमावत आहेत परंतू आज दिसायला जरी चांगले असले , महागडे असल्रे तरी आजच्या अन्नात ,खाद्य पदार्थात भेसळ मात्र जास्त आहे. आईस्क्रीम म्हणून चक्क डालडा पोटात जातो आहे. साधा बर्फ व रंग यांचा वापर करून बनवलेली ती आईस्कांडी आजच्या भेसळयुक्त , डालडायुक्त आईस्क्रीम पेक्षा निश्चितच कितीतरी पटीने चांगली होती. परवा महागडा चोकोबार घेतांना सहज आईस्कांडी, आईssssस्कांडी वाला, त्याची गाडी हे सर्व चित्र डोळ्यासमोर तराळले. चाखत तर तो ब्रँडेड चोकोबार होतो परंतू तोंडात मात्र चव घोळत होती त्याच 10,20,50 पैस्यांच्या आईस्कांडीची. 

०४/०५/२०१९

Birthday Bumps Ends Birthday Boy's Life . article about how this bumping on birthday is dangerous

“बर्थ डे बंप” एक जीवघेणा प्रकार  
तरुण म्हटले की नाविन्य. परंतू या नाविन्यात काही चांगले तर काही वाईट असते. असेच एक वाईट काल ऐकावयास मिळाले. वृत्त होते एका तरुणाच्या दू:खद निधनाचे ते सुद्धा त्याच्या वाढदिवसाच्याच दिवशी. तरुणांचा देश म्हणून आपला देश सध्या जगात मिरवतो आहे. परंतू हा तरुण कसा आहे ? त्याची समाजातील वागणूक काशी आहे? त्याला सामाजिक भान आहे का? याचाही विचार व्हावयास हवा. अर्थात सर्वच तरुण हे भरकटलेले आहे असे सुद्धा नाही अनेक चांगले, सामाजिक जाणीव असलेले, स्वत:च्या करीअर संबंची जागरूक असलेले अनेक तरुण आहेत.परंतू तरीही तरुणांना बालपणीपासूनच योग्य/अयोग्य काय? आपल्या सण साजरे करण्याच्या पद्धती कशा आहेत ? याचे ज्ञान आता अभावानेच दिले जाते असे दिसून येते. वाढदिवस साजरे करणे हे गत काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहे. केक कापणे, मेणबत्त्या विझवणे  येथपर्यंत ठीक आहे परंतू पुढे यात त्या केक वरील क्रीम एकमेकांच्या तोंडाला फासण्याचे नवीन नाटक निघाले. त्याहीपुढे आता “बर्थ डे बंप” ही एक नवीन टूम निघाली. या नवीन जीवघेण्या प्रथेत ज्याचा वाढदिवस असतो त्याला आमंत्रित मित्र मंडळींनी लाथा, बुक्के मारून बुकलून काढायचे असते. म्हणजे पार्टी टर द्या वरतून मार पण खाऊन घ्या हे असले नसते थेर सुरु झाले आहे. याच जीवघेण्या नसत्या कुप्रथेतून परवा एका तरुणाच्या वाढदिवसालाच त्याच्या मित्रांनी त्याला चांगलेच "बंप" मारले. नाजूक जागी मुष्टीचा प्रहार झाल्याने त्याच्यावर वाढदिवसाच्याच दिवशी यमसदनास जाण्याची वेळ आली. ही वेळ सुद्धा आणली त्याच्या मित्र म्हणवल्या जाणा-यांनी. वाढदिवस असल्याने पार्टी उकळणे, फुकटची मिळते म्हणून यथेच्छ दारू ढोसणे, त्यानंतर बुद्धी भ्रष्ट झाली की मग असले प्रताप घडतात. पालकांनी आपल्या प्रिय पाल्यांकडे आपल्या “बिझी शेड्यूल” मधून थोडा वेळ काढून लहानपणी, किशोरवयात आवर्जून लक्ष देणे, त्यांना चांगल्या शब्दात , प्रसंगी काही दाखले देऊन त्यांना योग्य/अयोग्यतेची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण “The Best Investment for your kids is giving your time to them” ही आहे. जर त्यांच्यासाठी वेळ काढला तर कदाचित फरक पडू शकतो. आज हे "बर्थ डे बंप " आहे. उद्या अजून काही तरी नवीन, कदाचित आणखी भयंकर व जीवावर बेतणारा प्रकार निघेल त्यामुळे पालक, तरुण, समाजबांधव सर्वांनीच वेळेवर जागरूक होणे जरूरी आहे. अन्यथा आपली तरुणाई वाहवत जाईल , हकनाक बळी जातील. वृक्ष लाऊन, छोटा मोठा एखादी सामाजिक मदत करून , एखादे सत्कृत्य करून , वह्या पुस्तके वाटून जर आपला वाढदिवस साजरा केला तर एक आत्मिक समाधान , चिरकाल टिकणारा आनंद मिळेल. तरुणांनो तुमचे वाढदिवस जरुर साजरे करा , आनंद लुटा परंतू हे असले "बर्थ डे बंप" सारखे असुरी आनंदाचे प्रकार मात्र टाळा.

०२/०५/२०१९

Naxal attack in Gadchiroli leaves 15 security personnel dead... article related to this news


नक्षल्यांचा कायमचा बिमोड करा                       
     काल गडचिरोली जंगलात भुसुरुंग लाऊन सीआरपीएफ जवानांची गाडी नक्षल्यांनी उडवली. 15 जवान शहीद झाले. किती जवान आपण गमावत आहोत. या नक्षल्यांचा कायमचा बंदोबस्त नाही का करता येणार ? आता गेल्या महीन्यात छत्तीसगड मध्ये सुद्धा याच पद्धतीने भाजपा आमदाराची गाडी उडवण्यात आली. या नक्षल्यांं जवळ ही स्फोटके , अत्याधुनिक शस्त्रास्त्रे येतात तरी कशी? आपल्या सुरक्षा यंत्रणा , गुप्तचर यंत्रणा यांना याचा सुगावा कसा लागत नाही ? सुगावा असल्यास त्या शस्त्र पुरवठादारांवर कारवाई करण्यास कुणी अटकाव अथवा दबाव आणते आहे का ? या सर्व बाबी स्पष्ट होणे जरूरी आहे. नक्षल्यांना शस्त्रे, स्फोटके या कामात मदत करणारे हुडकून काढणे जरूरी आहे. ते सापडले की त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची नितांत गरज आहे. यासाठी प्रसंगी कायद्यात बदल करणे जरूरी असल्यास तसे करावे परंतू आपल्या जवानांचा हकनाक बळी जाता कामा नये.आपले जवान हे नक्षल्यांंपासून संरक्षण करण्यासाठी तैनातीवर जात असतात. ते नक्षल्यांवर प्रतिकारात्मक हल्ले करतात. नक्षली मात्र थेट हल्ले करतात. गतवर्षी 40 नक्षल्यांचा बंदोबस्त करण्यात आला होता. यंदा गडचिरोली भागात चांगले मतदान सुद्धा झाले. यामुळे कदाचित कालचा हा हल्ला झाला असण्याचा कयास आहे. आपले काही तथाकथीत बुद्धीवादी, पत्रकार, वृत्तपत्रे जवान शहीद झाल्यावर मूग गिळून गप्प असतात मात्र नक्षली मारल्या गेले की यांना “धक्कादायक” वाटते.मानवाधिकाराची आठवण येते.  दिग्विजयसिंग सारखे अतिरेक्यांना सन्मानाने संबोधणारे नेते "निवडणूकीत नक्षलवाद्यांची मदत घेऊ" अशी विधाने सर्रास करणारे नेते आपल्या देशात आहेत ही आपल्या देशाची शोकांतिका आहे. “नक्षलबारी” या पश्चिम बंगाल मधील एका खेड्याच्या नावावरून "नक्षल" व त्यावरून "नक्षलवाद" हा शब्द रुढ झाला. 1969 मधे माओवाद भारतात आला. चीन मधला नेता माओ त्याच्या विचारांची भारतात आज खरच गरज आहे का ? 60 च्या दशकात असेलही असे आपण गृहीत धरू. परंतू आता आहे का ? आपल्या देशात सुद्धा अनेक थोर नेते होऊन गेले परंतू त्यांच्या विचारांचे इतर देशात कुणी अनुसरण करते का ? मग आपण इतरांचे विचार दुस-याची हत्या करण्या इतपत का आत्मसात करावे? माओचे विचार आजच्या घडीला उपयुक्त आहेत का ?  त्याचे विचार अनुसरून आपण आपल्याच देशातील सरकारी यंत्रणे विरुद्ध यलगार पुकारून कुटुंबे उध्वस्त करणे हे योग्य आहे का? तुमच्या काही मागण्या असतील त्या आपल्याच देशातील नेत्यांच्या अहिंसा,सत्याग्रह यांसारख्या आंदोलनांद्वारे नाही का पूर्ण करता येणार ? यांवर विचार व्हावा तसेच ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या म्हणण्यानुसार प. बंगाल , छत्तीसगड , महाराष्ट्र , ओरीसा , बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश या भागात पसरलेल्या या नक्षली चळवळीवर एकाच वेळी हल्ला करून त्यांना जेरीस आपणायला हवे.  
सरकारने नक्षली व त्यांना पाठबळ देणारे शहरी नक्षली समर्थक या प्रश्नावर प्राथमिक तत्वावर लक्ष घालून त्यांचा बंदोबस्त करणे अत्यंत जरूरी आहे. अजून किती जवान आपण गमावणार ? किती कुटुंबे उध्वस्त होऊ देणार ?