जनतेला वाटत
असे. भोंग्यावर लिहिलेले ते “भँवर” हे
अक्षर मात्र “परमनंट मेमरीत” कुठेतरी
स्टोअर होतेच. चित्रपटाची जाहिरात ऐकून मग थिएटर मधील पोस्टर पाहण्यासाठी मुलांचे
टोळके जात असे. जाहीरातीत “केवळ वायस्कोके लिए” असे का असते ? काही कळत नसे व कुणाला विचारायची
हिम्मत सुद्धा नसे. काही मुलांची ती जाहिरात पाठ होऊन जात असे. मग प्रौढांसाठी
असलेल्या चित्रपटाच्या जाहीरातीतील “नको त्या” शब्दांसकट काही मुले ती जाहीरात सर्वांसमोर म्हणत व त्यानंतर घरात काही क्षण एक प्रकारची नीरवता पसरे. अनेक चित्रपट पाहिले , जाहिराती ऐकल्या, चित्रपट मध्येच बंद झाला
किंवा काटला की थिएटर वाल्याचे नांव घेऊन केलला उद्धार ऐकला. चित्रपट पाहण्याची ती
मजा कमी होतांना सुद्धा पाहिले. पीटातले प्रेक्षक कमी झालेले पहिले. चांगला प्रसंग, संवाद याला आता शिट्ट्या, टाळ्या पडत नाही.
तसे संवाद लिहिणारे लेखक नाही व "डायलॉग किंग" राजकुमार सारखे नट सुद्धा नाहीत. कालांतराने व्हिडीओ ,टीव्ही, केबल
टीव्ही , संगणक ,मोबाईल
आले. शोले , शहंशहा , आराधना , बॉबी इ. सारख्या चित्रपटांच्या
तिकीटासाठी लांब-लांब रांगा पाहिलेली थिएटरे सुनी-सुनी दिसू लागली. पुढे “परमनंट मेमरीत” असलेले “भँवर”
म्हणजे "भँवरलाल छांंगाणी" या नावातील “भँवर” असे लघुरूप आहे हे
कळले. अनेकांना ते आजही माहिती नसण्याची शक्यता आहे.
त्या चित्रपट जाहिराती भँवरलाल स्वत: म्हणत असत. एकदा
एका निर्माणाधीन भव्य मॉल समोरून बाजारात जात होतो. त्या ठिकाणी पूर्वी मोहन टॉकीज
होती. तिथेच कुठल्यातरी रिक्षावर जाहिरात सुरु होती. चित्रपटाची नव्हे तर
कुठल्यातरी सेलची. त्या जाहिरातीमुळे “भँवर” लिहिलेला भोंगा असलेली रिक्षा , चित्रपटाच्या
जाहिराती हे सर्व एखाद्या चित्रपटातील फ्लॅशबॅक प्रमाणे डोळ्यासमोर येऊन गेले.आजही खामगांवात “भँवर”
यांची पिढी जाहिरातीच्याच व्यवसायात आहे. चित्रपटांचे सुगीचे दिवस
सरले, त्यांच्या जाहिराती करणारे “भँवरलाल
छांंगाणी” मात्र आजही भोंग्यावर लिहिलेल्या त्यांच्याच
नावातील “भँवर” या शब्दामुळे तसेच
त्यांच्या आवाजामुळे खामगांवकर सिनेरसिकांच्या “परमनंट मेमरीत” मात्र कायम आहे.
विनय जी,
उत्तर द्याहटवासुंदर आठवण आणि लिखाण सुध्दा।।।
अभिनंदन💐!
संजय
धन्यवाद
उत्तर द्याहटवा