विष्णूचे नांव आणि देव अडनांव
मला का कोण जाणे देव आनंद व रमेश देव यांच्यात साम्य वाटत असे.काळ्या कोटातील देव आनंद प्रमाणेच आमचा मराठमोळा रमेश देव सुद्धा काळ्या कोटात मोठा कातिल दिसे. कित्येक तरुणींच्या गळ्यातील तो ताईत होता.
माझ्या पक्के स्मरणात आहे की रमेश देव हे नांव मी सर्वप्रथम माझ्या ज्येष्ठ बहिणीच्या तोंडून ऐकले होते. मी शाळकरी विद्यार्थी होतो तर माझ्या बहिणी महाविद्यालयीन. ब-हाणपूर केंद्र कॅच करणा-या आमच्या बुलडाण्याच्या काकांच्या EC TV वर रमेश देव व सिमा देव या मराठी सुपरहिट romantic couple , made for each other अशा हसतमुख जोडगोळीचा कुठलातरी मराठी सिनेमा दाखवणार होते. मी तो पाहिला होता पण कोणता सिनेमा ते मात्र आता स्मरत नाही. पण तो हसरा चेह-याचा , फुग्याचा भांग असलेला राजबिंडा, काळ्या कोटातील रमेश देव माझ्या मनात कायमचा घुसला. तसे त्याचे मी फार काही चित्रपट पाहिलेले नाही , मराठी गाणी सुद्धा मला हिंदीच्या तुलनेत अल्पशीच माहीत आहे पण "सूर तेच छेडता गीत उमगले नवे, आज लाभले सखी सौख्य जे मला हवे" हे रमेश देव प्रमाणे त्याचे गीत सुद्धा लक्षात राहीले. तरुण वयात सिमा देव व रमेश देव यांची जोडी पडद्यावर पाहतांना पती पत्नी असावे तर असे , असे वाटायचे. एकदा कधी तरी आनंद हा ऋषिकेश मुखर्जी यांचा सर्वांग सुंदर सिनेमा पाहिला त्यात मराठी जोडप्याची ऋषिकेश मुखर्जी यांची रमेश देव सीमा देव यांची निवड किती सुयोग्य होती. आनंद ची भूमिका करणा-या राजेश खन्नाच्या मित्राची डॉ प्रकाश कुळकर्णीची भूमिका किती सुंदर वठवली होती. डॉ कुळकर्णी यांची पत्नी सिमा आनंदला भाऊ मानते त्याला कर्करोग झाल्यावर देवा जवळ प्रार्थना करते. किती नैसर्गिक अभिनय देव दाम्पत्याने केला होता. सरस्वतीचंद्र हा सिनेमा अभिनेत्री नूतनचा सिनेमा म्हणून ओळखला जातो परंतु तिच्या मद्यपी पतीची रमेश देेव यांनी साकारलेली नकारात्मक भुमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहून गेली. मराठी कलाकारांना प्रेक्षक ओळखत नाही म्हणून अनेक हिंदी सिनेमात या अभिनयाच्या राजकुमाराने भुमिका साकारल्या , खलनायकी भूमिका सुद्धा ताकदीने साकारल्या. मला का कोण जाणे देव आनंद व रमेश देव यांच्यात साम्य वाटत असे. मराठीतील सदाबहार , चिरतरुण, कार्यप्रवण असा देव आनंदच म्हणावा असा तो होता. काळ्या कोटातील देव आनंद प्रमाणेच आमचा मराठमोळा रमेश देव सुद्धा काळ्या कोटात मोठा handsome दिसे. कित्येक तरुणींच्या गळ्यातील तो ताईत होता. नुकताच 30 जाने ला 93 वा वाढदिवस साजरा करणारा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता सर्जा, वासुदेव बळवंत फडके असे चित्रपट निर्माण करणारा राजबिंडा रमेश हे रमेचा अर्थात लक्ष्मीचा ईश म्हणजे पती असलेल्या भगवान विष्णूचे नांव धारण करणारा व आडनांवात सुद्धा देव असणारा अभिनयाचा देव जरी काळाच्या पडद्याआड गेला असला तरी त्याच्या अभिनय क्षेत्रातील योगदानामुळे तो आचंद्रसूर्य रसिकांच्या स्मरणात राहील. रमेश देव यांना भावपूर्ण श्रध्दांजली
Chhan lihile bhavpurn shraddhanjali
उत्तर द्याहटवासुंदर लेख माझा पण आवडता हिरो भावपूर्ण श्रद्धांजली
उत्तर द्याहटवा