Click "Follow" Button below To Follow this Blog

१९/०६/२०२५

Article about Hindi language.

 इंग्रजी चालते मग हिंदी का नाही ?

हिंदी ही भारतातील अनेक राज्यात बोलली जाणारी भाषा आहे तसेच तिला मराठीची "मौसेरी बहन" असे सुद्धा म्हटले जाते. भाषेचा द्वेष करण्यापेक्षा भाषेवर प्रेम करून त्यावर प्रभुत्व मिळून आपले व्यक्तिमत्व बहुआयामी असे बनवावे तसेच आपल्या पाल्यांना सुद्धा शिकवावे.

महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीची करण्याचे ठरले आणि हिंदी विरोधी सूर आवळले जाऊ लागले. हिंदी ही भारतातील अनेक राज्यात बोलली जाणारी भाषा आहे तसेच तिला मराठीची "मौसेरी बहन" असे सुद्धा म्हटले जाते. हिंदी आणि मराठी खूपच समान अशा भाषा आहे. त्यामुळे मराठी बोलणाऱ्याला हिंदी बोलणे सहज जमते आणि हिंदी भाषिक लोक सुद्धा मराठी  अस्खलितपणे बोलतात. हिंदी ही आपल्याच देशाची भाषा आहे मग ती उत्तरे कडील राज्यात बोलली जाते म्हणून आपल्याकडे तिची सक्ती नको हा तर्क काही योग्य वाटत नाही. तुम्हाला विदेशातली भाषा चालते मग उत्तरेकडील राज्यातील भाषा का चालत नाही ? आज संपूर्ण भारतात इंग्रजी शाळांचा सुळसुळाट झालेला आहे. दगड उचलला की संपुर्ण इंग्रजी माध्यमाच्या शाळा आढळतात पालक सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मोठ्या प्रमाणात पसंती देत आहे. या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे मराठी शाळांना गळती लागलेली आहे परंतु त्या विरोधात एकही नेता ब्र सुद्धा काढत नाही पण हिंदी सक्तीची झाल्यावर मात्र सर्रास विरोध होताना दिसतो आहे. हिंदी सक्तीची होते आहे पण मराठी भाषा कुठे बंद होते आहे हा सुद्धा विचार केला पाहिजे ना ! अनेक थोर पुरुषांचे तर असे म्हणणे आहे की मनुष्य हा बहुभाषिक असावा त्याला एक नव्हे तर अनेक भाषा अवगत असाव्या. आपण संभाजी महाराज यांचे नावे घेतो, त्यांचा आपल्याला अभिमान आहे, आणि असायलाचं पाहिजे.  पण त्या काळात काळात संभाजी महाराजांनी संस्कृत, इंग्रजी पारशी आदी अशा भाषांचा अभ्यास करून त्या भाषा ते शिकले होते त्यांनी इतर भाषांत ग्रंथ सुद्धा लिहिले होते. मग पाचशे वर्षांपूर्वी भाषेबद्दल द्वेष नव्हता आणि ज्यांना आपण आपले आदर्श मानतो ज्यांची नावे सतत घेतो ते लोक जर कोणत्या भाषेला विरोध करत नव्हते, परकीयांच्या भाषेला सुद्धा विरोध करत नव्हते तर मग आपण आपल्याच देशातील भाषेला विरोध का करावा ? आपल्या पाल्याला जर एकापेक्षा अनेक भाषा येत असेल येत असतील तर ते चांगलेच आहे ना !. आपल्या देशाचे माजी पंतप्रधान उच्चविद्याविभूषित पी. व्ही. नरसिंहराव यांचा येथे उल्लेख करावासा वाटतो. पी. व्ही. नरसिंहराव हे दक्षिणात्य होते परंतु ते राजकारणामुळे विविध राज्यात फिरस्ती करायचे त्याच कालावधीत त्यांनी त्या-त्या प्रदेशातील भाषा अवगत करून घेतल्या. पी.व्ही. नरसिंहराव अकरा भाषांमध्ये लिहू, वाचू, आणि बोलू शकत होते.

     इथे एकच म्हणावेसे वाटते की, आपल्या देशातील लोकांनी आणि नेत्यांनी भाषेचा द्वेष करण्यापेक्षा भाषेवर प्रेम करून त्यावर प्रभुत्व मिळून आपले व्यक्तिमत्व बहुआयामी असे बनवावे तसेच आपल्या पाल्यांना सुद्धा शिकवावे.  लोकप्रतिनिधींनी तर उगाचच भाषा प्रांत यांचे मुद्दे उपस्थित करून राजकारण करू नये उलट विकासाचे मुद्दे काढून त्यावर बोलावे. भाषेचा द्वेष केल्यामुळे आपण आपल्याच देशातील बांधवांमध्ये द्वेष भावना पसरवत आहोत याचे सुद्धा भान ठेवले पाहिजे. उद्या जर आपल्या मराठी भाषेला इतर राज्यात विरोध केला तर आपल्याला कसे वाटेल याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आपले पंतप्रधान क्रोएशिया या देशात गेले होते याप्रसंगी त्या देशातील अनेक नागरिक  माध्यमांना मुलाखती देतांना हिंदीमध्ये बोलले. आणि आम्हाला हिंदी आवडते असेही म्हणाले. विदेशी माणसे जर हिंदी बोलत आहेत त्यांना हिंदी भाषा आवडते आहे तर मग आपण हिंदी भाषेचा द्वेष का करावा ? ती तर आपल्याच देशाची भाषा आहे. शेवटी एकच म्हणावेसे वाटते की, 

हिंद देश के निवासी सभी जन एक है,

रंग, रूप,वेष, भाषा चाहे अनेक है |

त्यामुळे सर्वांनी हा विचार करायला पाहिजे की आपल्याला विदेशी भाषा इंग्रजी चालते तर मग हिंदी का चालायला नको ? असे वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा