खलनिग्रहणाची वेळ आली आहे

पहिले कारण म्हणजे लोकप्रतिनिधींनी
सरकारी कर्मचा-यांवर केलेले हल्ले याच्यातून हे हल्ले वाढले.आपले नेते कर्मचारी, पोलीस
यांना अगदी कस्पटासमान मानतात तर मग आपण सुद्धा काही केले तर काय बिघडणार?असा कार्यकर्त्यांचा
भ्रम झाला त्यांच्या अंगात सुद्धा “जोश” आला आणि मग सरकारी कर्मचारी आणि आता पोलिसांवर
सुद्धा हल्ले होण्यास सुरवात झाली.
दुसरे कारण म्हणजे “सदरक्षणाय खलनिग्रहणाय”
या आपल्या बोधवाक्याचा खुद्द पोलिसांनाच पडलेला विसर.सामान्य पांढरपेशा नागरिकांशी
पोलीस सुयोग्य वर्तन करतांना दिसत नाही असे बरेचदा घडते.पांढरपेशा वर्ग त्यांच्या
पाल्यांना लहानपणापासूनच पोलिसांचा धाक, भीती दाखवत असतो.त्यामुळे पांढरपेशा वर्ग
काही न करता सुद्धा पोलीस म्हटले की घाबरतोच आणि मग पोलिस त्यांनाच अधिकच धाक दाखवतात.अशातच
मग एखादा आपली सहनशक्ती गमावतो आणि हल्ला करतो.
तिसरे कारण म्हणजे आपली हिंदी चित्रपटसृष्टी.हिंदी
चित्रपटातून पोलिसांचा जेवढा अपमान करतात तेवढा इतर कुणाचा अपमान होतांना
चित्रपटातून दिसून येत नाही.त्यामुळे पोलीस म्हटला की तो भ्रष्टच असा समज आता नागरीकांचा
झाला आहे.तसेच या चित्रपटांचा प्रभाव समाजातील खल प्रवृत्ती असेलेल्या लोकांवर
सुद्धा पडतो आणि मग ते चित्रपटा प्रमाणेच प्रत्यक्षात सुद्धा करण्याचा प्रयत्न
करतात.तरीही पोलीस विभाग याच चित्रपटसृष्टीतील नट-नट्यांना किंबहुना विविध
गुन्ह्यात आरोपी असलेल्या नट-नट्यांना नाचवण्याचे कार्यक्रम घेतोच.
अशी काही कारणे आहेत इतरही अनेक
करणे असू शकतात, असतीलही. असे हल्ले होणे हे कायद्याचा धाक राहेला नाही हे सूचित
करणारे आहेत.यावर सरकार, गृह मंत्रालय, पोलीस विभाग त्वरने उपाय शोधतील कारण आता
त्यांच्यावरच हल्ले होत असल्यामुळे सामान्य नागरिकांवर हल्ला झाल्याने काय शारीरिक
आणि मानसिक यातना होत असतील याची त्यांना कल्पना आली असेल. तेंव्हा पोलिसांनी आता
आत्मपरीक्षण करून समाजात पुनश्च आपला आदरयुक्त दरारा निर्माण करावा आता खरेच खलनिग्रहणाची
वेळ आलेली आहे.
भ्रष्ट पोलीस हेच पदोपदी दृष्टीस येते.पोलिसाची नोकरी किती कष्ट प्रद, कमी पगाराची...तरीही पोलीस भरतीला प्रचंड संख्या...असं का? कारण जनसामान्यात हे अर्धसत्य पोहोचले आहे की पोलिसात पगार महत्वाचा नाही...पोस्टिंग आणि लाच हीच खरी कमाई....मी ह्या अशा अनुभवाने पोळलो आहे...आणि अटकेत ६८ दिवस काढल्या नंतर गेली १७ वर्षे कोर्टाच्या नुसत्या कोर्टाचा फे-या खातो आहे...पोलिसांना लाच दिली नाही,म्हणून तद्दन खोटी नाटक रंगवून अटक केली...आणि आता कोर्टात माझा व माझ्या सहका-यांवर गुन्हा सिद्ध करता येत नाही...म्हणून साक्षीदारच आणले जात नाहीयेत.....ह्याला काय म्हणावं?ह्या अशा भ्रष्ट पोलीस खात्याचा प्रत्येकाला अनुभव आलेला असल्यानेच असे प्रकार घडत आहेत.आणि राजकारणीच ह्या भ्रशाचाराला खत-पाणी घालत असतात....पण पोलीस खरे पणाने कधी कारवाई करू लागले की मारहाण...त्यालाही कारण हा पोलीस साला, पैसे खाऊनही माझ्यावर उलटतो? हा राजकीय माज आहे.
उत्तर द्याहटवा