पुलवामा हल्ल्याला चोख
प्रत्युत्तर व सावरकर विचार
“लेखण्या मोडा व बंदुका हाती घ्या” असे
म्हणणा-या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी याच दिवशी म्हणजे आज सकाळी 3.30
वाजता भारतीय वायूसेनेतर्फे पाकव्याप्त काश्मीर मधील जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेकी
तळांवर हवाई हल्ले केले.1000 किलोचे बॉम्ब टाकले.यासाठी पाकिस्तानातील थेट
मुझफराबाद, बालकोट पर्यंत भारतीय मिरज विमाने घुसली आणि हे हल्ले केले गेले. या
हल्ल्याचे वृत्त झळकताच सारे भारतवासी सुखावले. पुलवामा हल्ला झाल्यावर संपूर्ण भारतात
पाकिस्तान व ऐत्रेक्यान विरुद्ध तीव्र रोष, संताप होता. या हल्ल्यामुळे या संतापाचे
शमन झाले आहे. ज्या जैशच्या अतिरेक्यांनी आपल्या CRPF च्या 40 पेक्षा जास्त
जवानांना मारले होते त्या जैशचे अल्फा-3 व इतर सर्व अतिरेकी संघटनांच्या अतिरेकी
तळांवर हल्ले करण्यात यश मिळवले. सुमारे अर्धा तास हे हल्ले सुरु होते. भारताच्या
या हल्ल्याने पाकडे व त्यांच्या अतिरेकी संघटनांना चांगलाच हादरा बसला. भारताने
आता कात टाकली आहे. हा दुसरा “सर्जिकल स्ट्राईक” पाहून पाकडे व जगला आता भारत
बदलला असल्याची जाणीव आता झाली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनातील गोष्ट घडल्याने
भारतवासी सुखावले टर आहेतच परंतू आपला
भारत आता मजबूत देश असल्याची भावना सुध्दा जनमानसात दृढावली आहे. मा.
पंतप्रधानांनी पुलवामा हल्ल्यानंतर भारत हे सहन करणार नाही असे म्हटले होते व
लष्काराला सुट दिली होती. “पुलवामा के गुनाहगारोंको सजा कहॉं दी जायेगी ,कब दी
जायेगी ये हमारी सेना तह करेंगी” असे पंतप्रधान मोदि यांनी तेंव्हा विधान केले
होते. व त्याप्रमाणेच ते घडले. त्यानंतर भारताने पाकिस्तानचा MFN दर्जा सुद्धा
काढला.युनोच्या सुरक्षा परिषदेत सुद्धा पाकिस्तानला चांगली चपराक मिळाली. पुलवामा
हल्यानंतर अनेक देश भारताच्या पाठीशी उभे राहिले. मा. पंतप्रधानांच्या विदेश
दौ-याचे हे फलित होते. सुमारे दोनशे ते तीनशे अतिरेकी या हल्यात यमसदनी धाडल्या
गेल्याचा तूर्तास अंदाज आहे. अद्याप अधिकृत आकडेवारी येणे बाकी आहे. परंतू हे
हल्ले झाल्याची पुष्टी मात्र मिळाली आहे. तरीही आपल्या देशातील तथाकथित बुद्धिवंत,
विचारवंत आता काही ना काही बरळतीलच परंतू त्यांच्या त्या बरळण्याचा काही एक परिणाम
आता जनतेवर होत नाही. या हल्यामुळे आपल्याच देशातील काही पाकडेप्रेमी , मानवाधिकारवाले
, बुरसटलेल्या विचारांचे परंतू पुरोगामी म्हणवणारे काही महाभाग, सतत 56 इंच छातीचा
उल्लेख करून हिणवणारे काही जाणते नेते यांना चांगलीच चपराक बसली आहे. या
ह्ल्ल्यांपुर्वी युद्धाभ्यास सुद्धा झाला होता. “हमको छेडना नही, छेडेंगे तो हम
छोडेंगे नही” असे सुद्धा आपले पंतप्रधान म्हणाले होते. तसे त्यांनी करून दाखवले.
संपूर्ण देशात आता हाय अलर्ट जारी झाला आहे. नागरीकांनी आता जागृत राहणे जरुरी
आहे. राष्ट्रीय सुरक्षा समितीची आता बैठक होत आहे. पाकिस्तान सुद्धा प्रत्युत्तर
सुद्धा देऊ शकतो.अतिरेकी हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपले सैनिक
आपल्या सुरक्षा यंत्रणा नक्कीच सज्ज आहेत. परंतू काहीही झाले तरी जनता मात्र
भारतीय लष्कर व सरकारच्या पाठीशी आहे. योगायोगाने आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची
पुण्यतिथी आहे व आजच्या दिनीच हे हल्ले केले गेले. सावरकर जहाल देशभक्त होते “शत्रूच्या
भूमीत घुसून युद्ध चालवणे हा युद्ध जिंकण्याचा प्रभावी मार्ग आहे” असे सावरकरांचे
मत होते. या त्यांच्या विचारांनुसार भारताने हा दुसरा “सर्जिकल स्ट्राईक” केला
आहे. पाकड्यांचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत आली आल्यावर ज्या थोर भारतीय
स्वतंत्रतासेनानीस नेहरू सरकारने अटक केली
होती त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मा सुद्धा आज सुखावला असेल. भारत सरकार व भारतीय
वाय्द्ल यांचे त्रिवार अभिनंदन. जय हिंद !