..पैसे मत ले मोमबत्ती
जवानोके लिये है
14 फेब्रुवारीला
पुलवामा येथे जैशे-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या
जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला 45 पेक्षाही अनेक जवान हुतात्मा झाले.
संपूर्ण जग हादरले,हृद्य द्रवले,संताप, राग,दु:ख सा-या भावना भारतीयांच्या मनात दाटून
आल्या होत्या.देशभर निषेध नोंदवला गेला. मोर्चे, शोकसभा झाल्या. पाकिस्तान विरोधी
नारे, पाकिस्तानचा ध्वज जाळणे, दहशतवादाचा प्रतीकात्मक पुतळा जाळणे या सारख्या निषेधाच्या कृती देशभर झाल्या. जनतेने त्या उत्स्फूर्तपणे केल्या . सरकारने तसेच विरोधी पक्ष
व इतर सर्व पक्षीयांनी याची अवश्य दखल घेण्याची आज नितांत गरज आहे. कारण अनेक जयचंद
आजही आहेतच किंबहुना त्यांची संख्या अधिक झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष किमान राष्ट्रीय
भावना व राष्ट्र प्रेम याबातीत तरी एकमताचे हवेत.इतर कार्यक्रम भलेही वेगळे असोत.परंतू आपल्या देशातील काही नेत्यांची त-हा मात्र राष्ट्रविरोधी असल्याची प्रचिती
वारंवार येत असते. मणिशंकर अय्यर पाकीस्तानात जाऊन काय बरळतात,राहुल गांधी मागे
चीनच्या आंतराराष्ट्रीय अधिका-याला जाऊन काय भेटतात, त्या सिद्धूला इम्रान व
पाकिस्तानचा काय पुळका आला आहे.अरे शीख पंथीयांचे बलिदान तू विसरला का? काल महेबुबा
मुफ्ती म्हणे इम्रान नवीन आहे त्याला थोडी संधी द्यायला हवी.या नेत्यांची ही
वक्तव्ये,अशी वागणूक काय दर्शवते ? जनतेने यांना त्यांची जागा दाखवणे व भविष्यात
असल्या नेत्यांना आपल्या मतदानाच्या ताकदीने राजकारणातून हद्दपार करण्याची देशाची
नितांत गरज झाली आहे.असल्या नेत्यांबद्दल सरकारने खाली ओळी जरूर ध्यानात घ्याव्यात
”कहनी होगी एक बात एस देश के पहेरेदारोसे
संभालके रहना अपनेही घरमे छुपे गद्दारोंसे“
पाकिस्तान प्रेमाची भाषा बोलणा-या या नेत्यांपेक्षा तर या
देशातील गरीब, सामान्य,मजूर कामगार वर्ग श्रेष्ठ की जवानांच्या या हल्ल्याबाबत हा
वर्ग प्रक्षुब्ध झाला,जवान आपले आहेत आपल्यासाठी आहेत, देशासाठी आहेत , ऐन तारुण्यात
हौतात्म्य पत्करत आहे हे हाच गरीब वर्ग जाणतो. याचे दाखले सुद्धा बिकट
परिस्थितीच्या वेळी अनेकदा दिसून आले आहेत.कामगार वर्गाने सुद्धा पुलवामा हल्ल्यातील
जवानांसाठी 17 लाख रुपये जमा केले. गरीब कष्टकरी,अल्प मेहनताना मिळत असूनही हा
वर्ग देशासाठी सदैव त्वरीत पुढे आला आहे. धनिकांनी तर मदत केलीच परंतू यावेळी अनेक अल्प उत्पन्न गटातील लोक सुद्धा मदतीच्या बाबतीत आघाडीवर होते.काही
राजकारणी मात्र पुलवामा हल्ल्याचे राजकारण करण्यात गुंतले आहेत. म्हणूनच आपल्या देशात जनतेची राजकारण्यांप्रतीची
भावना चांगली नाही. देशावर संकट आले तर सर्व मतभेद,पक्षभेद विसरून एकत्र राहून इतरांना
आपल्या ऐक्याची ताकद दर्शविली गेली पाहिजे.आज जनभावना तीव्र आहेत.देशातील सामान्यातील
सामान्य माणूस क्रुद्ध झाला आहे.लहानमुले सुद्धा आपल्या जवानांच्या प्रेमापोटी,देशावरील प्रेमापोटी, मोर्चे, कँडल मार्च शोकसभांमध्ये मोठ्या संख्येने दिसून येत
आहेत.काल खामगांव शहरात शिक्षण विभागाने कँडल
मार्च काढला होता.मोठ्या संख्याने जि.प.,खाजगी शाळा,इंग्रजी विनाअनुदानीत शाळांचा
समावेश या मार्चमध्ये होता.मोठ्या संख्येने शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी या मार्च मध्ये
आले होते.काही तर कुटुंबियांना सुद्धा घेऊन आले होते.याच प्रसंगी सामान्य जनतेची देशाप्रतीची,हुतात्मा
झालेल्या जवानांप्रतीची प्रेम भावना,आदर भावना पाहून डोळे पाणावले गेले.या मार्च निघाल्यावर
अनेक लोक समाविष्ट होत होते.एके ठिकाणी मेणबत्त्या कमी पडल्या म्हणून शेजारीच्या एका
छोट्याश्या टपरीवजा दुकानात मेणबत्त्या घेण्यासाठी म्हणून एक शिक्षक बांधव गेला. दुकानाच्या
शेजारी एक सायकल घेऊन एक सामान्य गृहस्थ मार्च पहात उभा होता. त्याने ते पाहिले व दुकानदाराकडे पाहून
तो म्हणाला “..पैसे मत ले मोमबत्ती जवानोके लिये जल रही” त्याचे ते बोल ऐकून अनेकांना
त्याच्याप्रती आदर,प्रेम वाटले. त्या दुकानदाराने सुद्धा पैसे घेतले नाही. गोष्ट लहान
आहे परंतू साध्या गोष्टीतूनही सामान्यांचे देशप्रेम, जवान व त्यांच्या प्रतीची भावना
दिसून येते. सरकारने व सर्वच पक्षांनी ही जन भावना ओळखावी व येन केन प्रकारेण त्या पाकड्यांचा
व त्यांच्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करावा ,निप्पात करावा.जनता काहीही प्रसंग सोसायला
तयार आहे.अगदी मरायला सुद्धा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा