इथे एक आहे समाधी जुनी...
प्रयागराज हे हिंदूंचे
पवित्रस्थान, ब्रह्मदेवाचे सुद्धा स्थान मानल्या जाणा-या या शहरात आनंद भवन
ही वास्तू सुद्धा आहे.होय आनंद भवन, नेहरू कुटुंबियांचे
निवासस्थान. नंतर ही इमारत भारत सरकारला सोपवण्यात आली. नेहरूंच्या याच इमारती
पासून थोड्या अंतरावर पारशी समुदायाचे कब्रस्तान आहे. याच कब्रस्तानात नेहरूंचे
जावाई व माजी खासदार फिरोज गांधी यांची कबर अर्थात समाधी आहे. हे सर्व आठवण्याचे
कारण हे की प्रियंका गांधी यांना महासचिवपदी नियुक्ती देऊन त्यांना पूर्व
उत्तरप्रदेशच्या 40 मतदारसंघांची धुरा सोपवण्यात आली. त्यांचे उत्तरप्रदेश दौरे
सुरू झाले. विविध मंदिरे, गंगा पुजन,
जलमार्गाने प्रवास असे हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचे सोपस्कार पार पाडले व पार
पाडणे सुरू आहे. याच दरम्यान त्या प्रयागराज येथे सुद्धा गेल्या परंतू आपल्या
आजोबांच्या समाधीचे दर्शन घेण्यास मात्र त्या गेल्या नाही. तसे यापूर्वी सुद्धा
गांधी परीवारातील कुणी सदस्य फिरोज गांधी यांच्या समाधी स्थळी गेल्याचे ऐकिवात
नाही. इंदिरा गांधी यांचे पती फिरोज यांचा नामोल्लेख हेतुपुरस्सर टाळण्यात येतो.
प्रियंका यांच चेहरा आजीशी मिळता जुळता आहे हे समजते परंतू फिरोज गांधी यांच्या चेह-याशी साधर्म्य मात्र कुणी शोधत नाही.
आपल्याच सास-याच्या सरकार मधील जीप घोटाळा उघडकीस आणणा-या फिरोज यांना कदाचित
त्यामुळेच उपेक्षित ठेवण्यात आले असावे? की यातही पारशी समुदायाच्या
मतांच्या मूल्यांचा विचार केला गेला असावा ? इंदिरा गांधी,राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनी,जयंती दिनी त्यांना
अभिवादन करण्यासाठी गांधी कुटुंबिय जात असतात परंतू फिरोज गांधी यांना मात्र कधीही
कुणी अभिवादन करण्यास जात नाही. या बाबीकडे अनेकांनी अनेकदा लिहिले आहे लक्ष वेधले
आहे.याच विषयावर काल तरुण भारत मध्ये चारुद्त्त कहू यांचा सुद्धा लेख प्रकाशित
झाला. तो लेख वाचून कवी ना. घ. देशपांडे यांच्या कवितेच्या ओळींची आठवण झाली.
फिरोज गांधी हे काही फार मोठे नेते होते किंवा भारताच्या विकासात त्यांची योगदान
होते असे काही नाही परंतू माजी पंतप्रधान जामात, माजी पंतप्रधान
पती, माजी पंतप्रधान पिता असूनही त्यांच्या जयंती किंवा
पुण्यतिथी दिनी त्यांना अभिवादन करण्यास त्यांच्याच परीवारातील कुणीही त्यांच्या
समाधीकडे फिरकत नाही. त्यांच्या उपेक्षित समाधीला कवी ना.घ. देशपांडे यांच्या कवितेच्या
ओळी अगदी तंतोतंत जुळतात.
या दूरच्या दूर ओसाड जागी
किडे पाखरावीण नाही कुणी
हा भूमीचा भाग आहे अभागी
इथे एक आहे समाधी जुनी
विध्वंसली काल हस्तांमुळे
हिला या पहा जागोजागी फटा
माती खडे आणि आहेत काही
हिच्या भोवती भंगलेल्या विटा
आहे जरी लेख हा छेद गेला
जुन्या अक्षरातील रेघांमधुन
दुर्वांकुरे अन तरु
खुंटलेला निघाला थरांतील भेगांमधुन
कोठून ताजी फुले बाभळीनी
हिला वाहिले फक्त काटे कुटे
ही भंगलेली शलाका पुराणी
कुणाचे तरी नांव आहे इथे
रानातला ऊन मंदावलेले
उदासीन वारा इथे वाहतो
फांदीतला कावळा कावलेला
भुकेलाच इथे तिथे पाहतो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा