हर एक पल का शायर
कल आयेंगे नगमो की
खिलती
कलियां चुननेवाले
मुझसे बेहतर कहनेवाले
तुमसे
बेहतर सुननेवाले
कल कोई मुझको याद करे,
क्युं कोई मुझको याद
करे ?
मसरुफ जमाना मेरे लिये
क्युं वक्त अपना बरबाद
करे |
साहिर लुधियानवी या गीतकाराच्या या ओळी परवा
आठवल्या जेंव्हा वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. बातमी संगीत आणि साहित्य रसिकांचे
हृदय हेलावून टाकणारी होती. जुहूच्या एका भंगार विक्रेत्याने जुनी वर्तमानपत्रे , मासिके
विक्रीस काढली. फिल्म हेरीटेज फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने हे सर्व जुने
साहित्य विकत घेतले. अवघ्या तीन हजार रुपयात. त्यांच्या या खरेदीत मात्र त्यांना केवळ
तीन हजाराच्या मोबदल्यात अमुल्य असा ठेवा प्राप्त झाला. कारण या जुन्या
वर्तमानपत्र आणि मासिकांत त्यांना अब्दुल हयी अर्थात प्रख्यात गीतकार साहिर
लुधियानवी यांच्या स्वहस्तलिखित कविता,शायरी,रोजनिशी इ. सापडले. काही छायाचित्रे सुद्धा सापडली. रोजनिशीत कधी व कुठे
रेकॉर्डिंग आहे , दैनंदीन कार्यक्रम आहे याच्या नोंदी आहेत.
संगीतकार रवी आणि कवी हरबन्स यांना लिहिलेली पत्रे सुद्धा या साहित्यात आहे. “तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा” ,”अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम” , “अभी ना जाओ छोडकर”, “साथी हात बढाना” , “ऐ मेरी जोहराजबी “, दाग चित्रपटातील गीते , “मै पल दो पल का शायर हूं”
अशी एकापेक्षा एक सरस गीते रसिकांना देणा-या साहिरचे साहित्य अशाप्रकारे धुळखात, भंगारात सापडणे ही कलाविश्वासाठी,रसिकांसाठी
धक्कादायक तसेच शोकप्रद घटना आहे. डाक विभागाने 2013 या वर्षी ज्याच्या स्मरणार्थ तिकिट
प्रकाशित केले होते,ज्याला विविध पुरस्कारांसह पद्मश्री ने
गौरवले गेले होते, ज्याची गीते आजही रसिकांना रीझवतात
त्याच्या हस्तलिखित कविता इतक्या दुर्लक्षित?लाहोरला
आपल्या कारकीर्दची
सुरुवात करणा-या साहीरवर डाव्या विचारसरणीच्या प्रसाराचा आरोप केला गेला व पाकीस्तान सरकारने साहिरच्या अटकेचे
आदेश जारी केले.त्या नंतर साहिर भारतात आला व मुंबईला दाखल झाला.थोर साहित्यिक अमृता
प्रीतम व साहिर यांच्यात हळुवार,संवेदनशील असे मैत्रीपूर्ण संबंध
होते.आपल्या चित्रपटसृष्टीला सुद्धा उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची रीत आहे. एकदा
का एखादा कलाकार मागे पडला,दिवंगत झाला तर चित्रपट सुष्टीला त्या
कलावंताचे त्वरीत विस्मरण होते. साहिरचे हस्तलिखित अशाप्रकारे भंगारात सापडणे याने
आपलाच वारसा न जपण्यात चित्रपटसृष्टी किती निष्काळजी आहे हे स्पष्ट दिसून येते. म्हणूनच
साहिर म्हणाला होता “ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है ?
परंतू साहिरने जरी “मै पल दो पल का शायर हूं” या गीतात “क्युं कोई मुझको याद करे” असे
म्हटले असले तरी या मसरुफ अर्थात आपल्याच कार्यात व्यस्त असणा-या जगात फिल्म
हेरीटेज फाऊंडेशन या संस्थेने साहिरचे साहित्य प्राप्त करून ते जतन करण्याचे,त्याचे प्रदर्शन भरवण्याचे योजून “मै हर एक पल का शायर हूं” असे सुद्धा म्हणणा-या
साहिरला तो खरोखर “हर एक पल का शायर” असल्याचे सिद्ध केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा