Click "Follow" Button below To Follow this Blog

३०/०९/२०२१

PART - 8, MAD

वेडयांच्या विश्वात - भाग 8 

थैलीवाली बाई  


एक दिवस मात्र मला धक्काच बसला, मी माझे काम संपवून कोर्टा समोरून घरी येत होतो पाहतो तर काय जी बाई कोर्टात केसच्या कामाने येत असे ती चक्क एका हातात एक कागदपत्रांची थैली घेऊन व दुस-या हातात वर्तमानपत्राची गुंडाळी घेऊन मोठमोठ्याने एकटीच बोलत होती. ज्या बाईला मी चांगल्या मानसिक अवस्थेत पाहिले होते तीला या अशा अवस्थेत पाहून मला मोठी खंत वाटली.

मागील भागापासून पुढे...

हक्का-बक्का,MIDC,सुमा,बावरी व महादू हे सर्व मी बालवयात असतांना पाहिलेले वेडे. नंतर कोर्टाच्या बाजुला राहायला आलो. बाजूला म्हणजे इतके की कोर्टाची आणि आमची कुंपणाची एकच भिंत आहे. म्हणजे कोर्टाची पायरी चढायला जराही वेळ लागणार नाही इतके कोर्टाला लागून. वडील म्हणतात बेटा इथपर्यंतच ठीक आहे "याच्या पुढे जावे लागेल असे काही करू नको” अर्थात शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये हा त्यांचा सांगण्याचा उद्देश. तरी बरेच वर्षे पर्यंत आम्हाला कोर्टात जायचे काम पडायचेच अर्थात दावे वगैरेसाठी म्हणून नव्हे तर तेंव्हा कोर्टाच्या आवारातून लोक ये-जा करू शकत होते म्हणून. 

     कोर्टाजवळ राहायला आल्यावर सुद्धा काही वेडे पाहण्यात आले. कपड्यांचे एक मोठ गाठोडे सोबत असलेली एक बाई नेहमी आमच्या गल्लीत येऊन शहरातील मोठ्या-मोठ्या लोकांना तसेच कोर्टाच्या दिशेने पाहून खुप काहीबाही बोलत असे. शहरातील अनेक प्रतिष्ठित लोकांच्या नावाचा ती बाई उद्धार करीत असे. कोर्टाकडे पाहून या लोकांना असे का बोलता ? असे विचारल्यावर मात्र ती हसून "दिसते तसं नसते भाऊ" असे म्हणून आपली बडबड सुरू ठेवत असे. पण आज ज्या बाईबद्दल मी लिहीत आहे ती बाई ही नव्हे. ही कहाणी तर ज्या बाईची मानसिक अवस्था चांगली असतांना मी पाहिले आहे अशा एका दुस-या बाईची आहे. संध्याकाळची वेळ होती उन्हाळ्याचे दिवस होते , 1990 च्या दशकात मोबाईल नव्हते , वाहिन्यांचा सुळसुळाट व त्यावर भरमसाट मालिकांचा व बाष्कळ विनोदी कार्यक्रमांचा मारा सुरू झालेला नव्हता, त्यामुळे आम्ही संध्याकाळी सहकुटुंब अंगणात बसत असू. इथे मग निरनिराळ्या विषयांवर चर्चा , हास्य विनोद होत असत. अशाच एका सायंकाळी जेंव्हा कार्यालयीन वेळ संपलेली होती , कर्मचारी , अभ्यागत घरी परतत होते तेंव्हा आमच्या फाटकात एक बाई आली बाहेरूनच “पाणी मिळेल का प्यायला” ती म्हणाली. चष्मा घातलेली , उंचशी , चांगली साडी नेसलेली ती महिला ग्रामीण भागातील परंतू सुशिक्षित अशी वाटत होती. तिला अंगणात बसायला खुर्ची दिली व पाणी दिले. “कोर्टात केस सुरु आहे म्हणून यावे लागते” असे तिने सांगितले दोन चार वाक्ये बोलून ती बाई निघून गेली. त्यानंतर खुप काळ लोटला, शैक्षणिक , प्रापंचिक कार्यात गुंतलो , संध्याकाळचे ते अंगणात बसुन गप्पा मारणे सुद्धा कमी झाले पण क्वचित वेळा ती बाई मात्र कोर्टात येतांना किंवा जातांना दिसत असे. पण एक दिवस मात्र मला धक्काच बसला, मी माझे काम संपवून कोर्टा समोरून घरी येत होतो पाहतो तर काय जी बाई कोर्टात केसच्या कामाने येत असे ती चक्क एका हातात एक कागदपत्रांची थैली घेऊन व दुस-या हातात वर्तमानपत्राची गुंडाळी घेऊन मोठमोठ्याने एकटीच बोलत होती. ज्या बाईला मी चांगल्या मानसिक अवस्थेत पाहिले होते तीला या अशा अवस्थेत पाहून मला मोठी खंत वाटली, मोठा धक्काच मला बसला. "अरेरे ! , ही बाई आता काही दिवस अगोदर पर्यंत चांगली होती आणि आता अशी एकटीच का बडबड करीत आहे ?" मी मनातल्या मनात बोललो. आणि पुढे निघालो. मग ही बाई मला याच परीसरात रोजच दिसू लागली. 

ती कोर्टाच्याच आजूबाजूला कुठल्यातरी आडोशाने राहात असावी. पुढे तिच्या हातात एक ऐवजी दोन थैल्या आल्या. दोन्ही थैल्या कुठल्यातरी कागदपत्रांनी भरलेल्या असत व वजनदार असत. त्याचे वजन सुद्धा त्या बाईला पेलवत नसे. आता ती बाई पुर्वीपेक्षाही अधिक कृश दिसू लागली होती. कुण्या तरी व्यक्तीने तिला फसवल्यामुळे तिची अवस्था तशी झाली अशी काही लोकांकडून माहिती मिळाली. कुणी फसवल्यामुळे अथवा खटला हरल्यामुळे तीची मानसिक अवस्था ढासळली असावी. 

आपल्या देशात न्यायालयीन प्रक्रिया ही एक दीर्घ अशी प्रक्रिया आहे. निष्पाप व्यक्ती दोषी ठरू नये हे जरी खरे असले तरी न्यायाला विलंब सुद्धा नको. या विलंब व दीर्घ प्रक्रियेमुळे कित्येक व्यक्ती मेटाकुटीला येतात, मनुष्य ताण-तणावाने ग्रस्त होतो , खंगतो , आर्थिक व मानसिक झळ पोहचत असते. कित्येकदा मनसिक स्वास्थ्य सुद्धा बिघडते. या बाईचे सुद्धा असेच काहीसे झाले असावे का ? मला प्रश्न पडला पण त्याचे उत्तर मात्र मला मिळणार नव्हते. ही बाई नंतर कुठे गेली काही ठाऊक नाही पण कुठल्यातरी खटल्याच्या निमित्ताने ती कोर्टात येत होती असे तिनेच सांगितले होते. या संबंधीत बाबीमुळेच तिचा मानसिक तोल गेला असावा हे अगदीच खात्रीने म्हणू शकत नाही परंतू तसे वाटत मात्र होते. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये ही म्हण कशी काय जन्मली कुणास ठाऊक परंतू या म्हणीच्या रचयित्याने सुद्धा कधी काळी उपरोक्त बाईसारखे उदाहरण अनुभवले असावे असे मला वाटले.

                                                    क्रमश:

👉 या मालिकेतील लेखात आलेल्या व्यक्तींच्या मूळ नावाचा उल्लेख टाळलेला आहे. काल्पनिक नांवे वापरली आहेत. तरीही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे. 

     या मालिकेतील लेख हे केवळ माहितीस्तव आहे यातून कुणाच्या अथवा कुणाच्याही परिवाराच्या मानसिक स्वास्थ्याची अवहेलना करण्याचा हेतू नाही. कुणाचा अपमान करण्याचा किंवा कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही हे नम्र निवेदन. 

२३/०९/२०२१

PART - 7, MAD, Hakka-Bakka

 वेडयांच्या विश्वात - भाग 7 

हक्का-बक्का

कुत्र्यांच्या मधोमध हक्क-बक्का बसलेला होता थैलीतून भाकरीचा एक-एक तुकडा काढून कुत्र्यांना भरवत होता. तुकडा काढणे व कुत्र्याला देणे यात तो मश्गुल होता. बालवयातील मला त्याची ही कृती खुप भावली होती. नाथ महाराजांनी गाढवाला गंगेचे पाणी पाजले होते, गजानन महाराजांनी कावळ्यांना यथेच्छ भोजन करू दिले होते. या गोष्टी मी आजी कडून ऐकल्या होत्या त्यामुळे मला हक्का-बक्काचे ते मुक्या प्राण्यांना खाऊ घालणे भावले होते

 👉 वेड्यांच्या विश्वात लेखमालिकेतील हा 7 वा लेख तसा तयार होता पण इतर काही न सोडता येतील असे विषय मध्ये आल्याने त्यावर लिहिले. आज हा 7 वा भाग प्रकाशित करीत आहे. पुर्वीचे 6 भाग ज्यांनी वाचले आहेत त्यांचा मालिकेत खंड पडल्याने भ्रमनिराश झाला असल्यास दिलगिर आहे.

मागील भागापासून पुढे... 

कुणी चिडवल्यावर अर्वाच्य भाषा बोलणा-या स्त्रीबाबत मागच्या म्हणजे या मालिकेच्या 6 व्या भागात सांगितले पण आजचा हा मनुष्य वेगळाच होता. एक दिवस घराच्या मागच्या बाजूस सकाळीच काही विचित्र आवाज ऐकू आला. आमच्या परसाच्या कुंपणाची भिंत चांगली उंच होती पण त्या भिंतीवरून पलीकडे डोकाऊन पाहण्यासाठी काही ठिकाणी जागा होती. मी भिंती वरून डोकाऊन पाहू लागलो. एक फक्त चड्डी घातलेला व्यक्ती काहीबाही निरर्थक बरळत होता त्याच्या बोलण्यातील काही शब्द कळत होते परंतू ते शब्द सुद्धा निरर्थक होते. लहान बाळ जसे काही शब्द उच्चारते तसे. त्याच्या बोलण्यातले दोनच शब्द स्पष्ट समजत होते ते म्हणजे “हक्का बक्का” मी त्याला पाहत होतो. आमच्या घराच्या मागे सुद्धा 3-4 कुटुंब राहत ते सुद्धा त्याच्याकडे पाहत होते. तो कोलांट्या उड्या मारत होता, काहीतरी कसरती करून दाखवत होता. कुणीतरी त्याला खायला दिले ते खाल्यावर त्याने पुन्हा “हक्का बक्का” म्हटले व निघून गेला. बाराही महिने त्याच्या अंगात फक्त चड्डीच असे. तो अगदीच वेडा मात्र नसावा. त्याच्या चेह-यावर हास्य असे. त्याच्या अशा निरथर्क बडबडीतून सुध्दा लोक मनोरंजन करून घेत असत . “ए हक्का-बक्का म्हण रे तुला भाकर देईल “ तो मग “हक्का बक्का” अथवा असे त्याचे काही ठराविक शब्द उच्चारत असे व लोक हसत व त्याच्या त्या वेडगळ कृतीतूनही शहाणे लोक स्वत:चा आनंद प्राप्तीचा स्वार्थ साधत असत. पण हक्का-बक्काला यातले काय कळणार ? तो त्याच्या जवळील थैलीत भाकर टाकून त्याच्याच विचारात मग्न होऊन पुढे जात असे. पुढच्या गल्लीत पुन्हा तेच. हक्का-बक्का वेडा होता, की त्याची वाचा चांगली नव्हती कधी काही कळले नाही कारण हक्का-बक्का सारख्या लोकांची चौकशी करण्यास कुणाला फुरसत असणार. हक्का-बक्का हेच शब्द तो वारंवार का उच्चारत असावा ? आश्चर्यचकित होणे यास हिंदीत "हक्का-बक्का होना" असे म्हणतात. हा वेडसर हक्का-बक्का हिंदी भाषिक तर नसावा ? कुणी तरी त्याची फसवणूक केल्यामुळे त्याला मोठे आश्चर्य होऊन तर तो हक्का-बक्का झाला असावा काय ? त्यामुळे तो आजीवन केवळ हक्का-बक्का हेच शब्द उच्चारत  होता काय असे प्रश्न मला पुढे कधीतरी पडले होते. पण हे प्रश्न अनुत्तरीतच राहिले.     

    हक्का-बक्का ची कायम राहील अशी एक आठवण मला आहे. एक दिवस मी शाळेतून घरी येत होतो एका झाडाखाली खुप कुत्रे गोलाकार जमलेले दिसले काय झाले म्हणून वेग वाढवला व त्या दिशेने गेलो तर कुत्र्यांच्या मधोमध हक्का-बक्का बसलेला होता थैलीतून भाकरीचा एक-एक तुकडा काढून कुत्र्यांना भरवत होता. त्याचे माझ्याकडे लक्ष नव्हते तुकडा काढणे व कुत्र्याला देणे यात तो मश्गुल होता. बालवयातील मला त्याची ही कृती खुप भावली होती. बालवयातही काही गोष्टींची समज ही निसर्गत:च येत असते. नाथ महाराजांनी गाढवाला गंगेचे पाणी पाजले होते, गजानन महाराजांनी कावळ्यांना यथेच्छ भोजन करू दिले होते. या गोष्टी मी आजी कडून ऐकल्या होत्या त्यामुळे मला हक्का-बक्काचे ते मुक्या प्राण्यांना खाऊ घालणे भावले होते. मी मोठ्याने हक्का-बक्का म्हटले त्याने हळूच मान वर करून माझ्याकडे पाहिले व स्मितहास्य केले. हक्का-बक्काची भीती वाटत असलेल्या मला यावेळी मात्र त्याचे भय वाटले नव्हते मी पण त्याच्याकडे पाहून हसलो व पुढे चालू लागलो. त्या दिवशी नंतर हक्का-बक्का परत कधीच दिसला नाही.                                                 क्रमश:

👉 या मालिकेतील लेखात आलेल्या व्यक्तींच्या मूळ नावाचा उल्लेख टाळलेला आहे. काल्पनिक नांवे वापरली आहेत. तरीही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे. 

     या मालिकेतील लेख हे केवळ माहितीस्तव आहे यातून कुणाच्या अथवा कुणाच्याही परिवाराच्या मानसिक स्वास्थ्याची अवहेलना करण्याचा हेतू नाही. कुणाचा अपमान करण्याचा किंवा कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही हे नम्र निवेदन. 

१२/०९/२०२१

Article about rape in sakinaka mumbai

 इंसाफ का तराजू

अशा घटनांमुळे भारतासारख्या सांस्कृतिक परंपरा असलेल्या, स्त्री शक्तिचे अर्थात  देवीचे नवरात्र साजरे करणा-या  देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की होते म्हणून बलात्कारासारखे कृत्य करणाऱ्यांना अशी शिक्षा व्हावी की तसे कृत्य  करण्याची  पुन्हा दुसरा कुणी हिम्मत करणार नाही. तेव्हाच या भारतीय न्याय प्रणालीचा इंसाफ का तराजू हा खरंच न्यायदानाचे एक उत्कृष्ट प्रतीक असल्याचे या देशातील जनतेला वाटेल.

साकीनाका येथे अंगावर शहारे येतील अशाप्रकारे एका स्त्रीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर व त्यापूर्वी घडलेल्या पुण्यातील एका अशाच घटनेनंतर तसेच निर्भया दिल्ली व कोपर्डी येथे पुर्वी घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर समाज, देश हेलावलेला आहे. कायदा व सुव्यवस्था आहेत की नाही ? का त्या फक्त वसुली साठी आहेत ? असा प्रश्न जनतेला पडलेला आहे. साकीनाका, मुंबईच्या बलात्काराच्या घटनेनंतर तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया जनमानसात, समाज माध्यमांवर प्रकट होत आहेत. मुख्यमंत्री व इतर राजकीय नेते कठोरात कठोर कारवाई आरोपीवर केली जाईल असे म्हणतात. परंतु प्रत्यक्षात मात्र दिर्घकाळ चाललेल्या खटल्यांंमुळे ही कठोरात कठोर म्हटली जाणारी कारवाई होण्यास मोठा विलंब  होत असतो. आजच्या काळातील कठोरात कठोर कारवाई म्हणजे काय हा सुद्धा एक प्रश्नच आहे. फाशीची शिक्षा ही एक शिक्षा आहे खरी परंतु तीची सुद्धा अंमलबजावणी होण्यास मोठा वेळ खर्च होत असतो, शिवाय  दयेचा अर्ज हि एक सुविधा आहेच. पुर्वी जसे हात पाय कलम करणे, कडेलोट अशाप्रकारच्या कठोर शिक्षा असत तशा तर आता नाहीत मग सांप्रत कायद्यान्वये नेते मंडळी कोणते कठोर शासन करण्याचे म्हणतात देव जाणे. तसेच तारीख पे तारीख या प्रकारच्या खटल्यांंमुळे हे आरोपी कायद्याच्याच आधारे आपला बचाव करण्यासाठी नाना प्रकारचे आटोकाट प्रयत्न करत असतात. अनेक लोकांनी साकीनाकाच्या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुर्वी मुलींना व महिलांना पुण्या-मुंबईसारख्या शहरात एकटीने फिरताना भीती वाटत नव्हती आज मात्र तशी परिस्थिती राहिली नाही. बलात्कार, स्त्री अत्याचार थांबविण्यासाठी सर्वात प्रथम करायची जी गोष्ट असेल तर ती म्हणजे कायद्याचा वचक प्रस्थापित करण्याची. देशात अनेक गैरकायदेशीर कृत्ये होत आहेत याला कारण कायद्याचा वचक नाही हेच आहे. याच पार्श्वभूमीवर 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या इंसाफ का तराजू या चित्रपटाचे स्मरण झाले. प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांचा हा चित्रपट. हा चित्रपट काळाच्या पुढे असणारा होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या चित्रपटावर ऐंशीच्या दशकात बरीच टीका झाली होती. या चित्रपटात मॉडेल म्हणून काम करणाऱ्या एका मुलीवर बलात्कार होतो पुढे न्यायालयीन प्रक्रिया होते परंतु आरोपी निर्दोष सुटतो व राजरोसपणे व्यवसाय करू लागतो काही काळाने या बलात्कारित मुलीची लहान बहीण त्याच आरोपीच्या कार्यालयात मुलाखतीसाठी जाते तेव्हा हाच आरोपी तिच्यावर सुद्धा बलात्कार करतो. यावेळी मात्र ती मॉडेल मुलगी तिच्यावर झालेल्या अन्यायाची पुनरावृत्ती तिच्या बहिणीबाबत सुद्धा होऊ नये म्हणून पुर्वानुभवाने न्यायाची प्रतिक्षा न करता आरोपीची हत्या करते. असे कथानक या चित्रपटाचे होते. अर्थात हा चित्रपट होता ,प्रत्यक्षात असे कायदा हाती घेऊन आरोपीस मारणे हे शक्य करणे दुरापास्त आहे व योग्य सुद्धा नाही. बलात्काराच्या घटना, वाढते स्त्री अत्याचार रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्यात पुुढिल काहि उपाय करता येतील का याचा अशा घटनांचा अभ्यास करणा-या संघटना, तज्ञांंनी जरूर विचार करावा.

1. कायद्याचा असा वचक निर्माण व्हावा की  आरोपी गुन्हा करण्यास धजावणारच नाही. 

2. बाल्यावस्थे पासून पालकांनी व शिक्षकांनी मुलांना आदर्श मुल्ये, आदर्श वागणूक, स्त्रियांचा सन्मान करणे याचे धडे वारंवार देत राहणे. 

3.बिकट प्रसंग आला तर मुलींनी किंवा महिलांनी त्या प्रसंगात कसा बचाव करता येईल तात्काळ मदत कशी मिळवता येईल याचे प्रशिक्षण सुद्धा त्यांना देणे. 

4.मानवाधिकाराचा आदर्श उपयोग कसा करता येईल याबाबत सुद्धा संबंधित संघटनांनी विचार मंथन करणे.

5.राजेशाही मध्ये काही गुन्ह्यांना जसे कठोर शासन असे, तसे बलात्कार, पाशवी अत्याचार यासारख्या गुन्ह्यांना लोकशाहीमध्ये सुद्धा कसे करता येईल यावरसुद्धा विचार व्हावा किंबहुना स्त्री संघटनांनी तशी मागणीच करावी.

5. माध्यमांनी सुद्धा या अशा घटनांची वृत्ते संवेदनशीलतेनी द्यावीत,  टी आर पी वाढवण्याच्या हेतूने नव्हे. 

     यासारख्या उपाय योजना शासनाने प्राथमिकतेने व मनावर घेऊन करणे आवश्यक आहे. 

   या अशा घटनांमुळे भारतासारख्या सांस्कृतिक परंपरा असलेल्या, स्त्री शक्तिचे अर्थात  देवीचे नवरात्र साजरे करणा-या  देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की होते म्हणून शासनाने व कायदा व सुव्यवस्था यंत्रणेने वरील उपाय योजना विचारात घ्याव्यात. इंसाफ का तराजू सिनेमात बलात्कार झाल्यावर न्याय न मिळाल्याने नायिकेला जसा कायदा हातात घ्यावा लागला व आरोपीला शासन करावे लागले तसे प्रत्यक्षात होऊ नये. पिडित महिलांना असा न्याय मिळावा की त्या सन्मानाने पुन्हा उभ्या राहतील व बलात्कारासारखे कृत्य करणाऱ्यांना अशी शिक्षा व्हावी की तसे कृत्य  करण्याची  पुन्हा दुसरा कुणी हिम्मत करणार नाही. तेव्हाच या भारतीय न्याय प्रणालीचा इंसाफ का तराजू हा खरंच न्यायदानाचे एक उत्कृष्ट प्रतीक असल्याचे या देशातील जनतेला वाटेल.

०९/०९/२०२१

Controversy after Javed Akhtars statement about RSS, VHP ...

 रूठ ना जाना तुमसे कहूं तो ...  


    पिछ्ले दिनो जब सचिन तेंडुलकरने 

कुछ राजकीय वक्तव्य किया था तब शरद 

पवारजीने उन्हे "अपने क्षेत्र से 

अलग विषय पर बोलने में बरतें 

सावधानी' ऐसी नसीहत दी थी |

आपको उनसे ऐसी नसीहत मिलनेकी 

उम्मीद बहोत ही कम है | लेकीन 

आज भी अगर आपने आपके 

क्षेत्र की 

तरफ ध्यान दिया तो फिल्मोके इस बुरे 

दौरमे कुछ अच्छी कहानीवाली फिल्मे 

दर्शकोको 

देखने के लिये मिल सकती है | 

इसलिए जनाब जावेद सहाब आपभी 

आर.एस.एस. की 

तुलना तालिबान जैसी 

संघटनाओंसे करने की बजाय 

आपके क्षेत्र मे ध्यान देना बेहतर है |

मा. जावेद अख्तरजी 

      नमस्ते

      आपका उस दिन का बयान सुनकर यह खत आपको लिख रहा हुं | 1993 मे एक फिल्म आई थी "1942 अ लव्ह स्टोरी" | जिस वर्ष मे भारत की आजादी का बड़ा आंदोलन हुवा था उसी वर्ष 1942 के आगे  "लव्ह स्टोरी" लिखकर जो प्रमुख घटना है उसे भुला देने की कोशिश करना ये आप फिल्मवाले लोग बड़ी खूबी से करते है | खैर वह फिल्म अब बहुत पुरानी हो चुकी है | लेकिन इस फिल्म के गीत आपने लिखे थे जिनमेसे एक था "रूठ ना जाना तुमसे कहूं तो" यह बड़ाही प्यारा , संजीदा, प्यार का इझहार करनेवाला गीत है | इस गीतमे नायक अनिल कपूर नायिका मनीषा कोईराला उनके दिल की बात सुनकर वह कहीं रूठ ना जाये इसलिए "रूठ ना जाना तुमसे कहूं तो" ऐसा कहते है |  आज आपको खत लिखते वक्त ऐसा लगा की इस खत को पढकर आप भी कंही रूठ ना जाये , बुरा ना मान जाये इसलिए शुरुमे , खत के शीर्षक मे ही "रूठ ना जाना तुमसे कहूं तो" ऐसा मैने लिखा है | आपने जैसे आपके विचार प्रकट किये है  तो मै भी अपने विचार इस खत के जरीये प्रकट कर रहा हूं , क्यों की विचार प्रकट करनेकी हम सभी को आजादी अपने देश ने दि है | यह स्पष्ट कर देता हूँ की यह खत मै एक हिंदुस्थानी होने के नाते लिख रहा हूं ना कि किसी संघटना के नुमाईंदे के नातेसे | हिंदुस्थान मे पले-बढे आप जैसे प्रख्यात लेखक की तरह मै भी थोडी बहुत कलम घसीट लेता हूं | आपने आपकी कलम की जादू से यंही इसी भारत वर्ष मे बडी इज्जत , शौहरत, रुतबा हासिल किया है | इसी हिंदुस्थान की लोकशाही के कारण कोई भी व्यक्ती, डॉ बाबासाहब आंबेडकर ने लिखे संविधान ने दिये हुये व्यक्तिस्वतंत्रता अर्थात बोलने की आझादी के कारण जो चाहे वो बोल सकता है | दुनियाभरमे केवल अपना ही मुल्क ऐसा है की जहां इस तरह की आजादी है लेकीन बहुत बार इसका गलत इस्तेमाल भी हुवा है और आज भी होते आ रहा है | 

     आपने उस रोज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की तालिबान संघटना के साथ जो तुलना की वह भी ईसी आझादी के कारण | लेकीन यह तुलना किसी भी सच्चे हिंदुस्थानी को रास नही आयी | आपने फर्माया था की, 

"जो लोग आर.एस.एस. , व्ही.एच.पी. तथा बजरंग दल इनको सपोर्ट करने की मानसिकता रखते है वो तालिबानी जैसे ही है | जिस तरह तालिबान मुस्लीम राष्ट्र बनाना चाहता है उसी प्रकार इन सभी संघटनाओंकी भी हिंदुराष्ट्र बनाने की मानसिकता है | तालिबानी हिंसक है लेकिन भारत की इन संघटनाओंको सपोर्ट करनेवालो की मानसिकता भी वही है |"            आपका ऐसा बयान देनेका मकसद दुनियामे आर.एस.एस. के बारेमे भ्रम पैदा करनेके सिवा और क्या हो सकता है ? जावेद अख्तर साब आप ऐसी बात सिर्फ भारतमेहि कर सकते हो क्युं की यहा की सहिष्णुता से पूरी दुनिया वाकिफ है | पिछले दिनो आपने देखा होगा, या नही देखा होगा तो आपको यह बताना मुनासिब लगता है की किस तरह आर.एस.एस. ने और उसको सपोर्ट करनेवालोंने कोरोना आपदा मे मदत की है और जिसे दुनिया ने भी माना है | केवल कोरोना पॅनडेमीकमे ही नही तो इससे पहले भी आयी हुई सैंकडो विपदाओंमे आर.एस.एस. और उसके समर्थकोने इस देश मे मदत की है | जिस तरह आर.एस.एस. और उसके समर्थक अपनी कई अन्य साथी संघटनाओं के साथ शिक्षा, कृषी, सेवा, समरसता, आदीवासी विकास इन क्षेत्रोमे कार्य करता है , वैसा कोई उदाहरण अगर तालिबान जैसी संघटनाओं का हो तो आप जरूर बताये | लेकिन ऐसा हो ही नही सकता की तालिबान जैसी हिंसक संघटना ऐसे कुछ सेवा कार्य करती हो | फिर भी तालिबान अगर आर.एस.एस. जैसी हो तो उन्होने अफगाणिस्थान की सत्ता हासिल की तब वंहा के नागरिकोने उनसे डरकर देश क्यूँ छोडा ? जनाब आप फिल्मी दुनिया के एक जानेमाने लेखक, गीतकार हो | आपके कई चाहनेवाले है | 1970 के दशक की कई यादगार , आपहीकी लिखी हुई कई फिल्मे मैने भी देखी है, आपने लिखे हुए कही गाने सुने है और सुनता हूं | आपका पुरानी फिल्मो तथा कलाकारोंके बारे मे एक बहुत अच्छा कार्यक्रम हुवा करता था, वह भी मै देखता था | आप उस कार्यक्रम का अँकरिंग बहुत ही अनोखे अंदाज मे करते थे जिसमे उर्दू भाषा के कई मीठे शब्दोका इस्तेमाल भी आप किया करते थे , और दर्शक उस का लुफ्त उठाते थे | आप आपके सिनेमा क्षेत्र मे मिली हुयी सफलताके कारण राज्यसभाके सांसद भी रह चुके है | यह भी आपकी एक मिसाल है और भारतने आपको दिया हुवा सन्मान भी है | आपका तालिबान और आर.एस.एस. की तुलना का जो बयान है वह तमाम देशवासियों को ठीक नही लगा | क्यूँकी वैसी ढेर सारी प्रतिक्रिया कई लोगोने दी है | आर.एस.एस. क्या है ये जानने के लिये आपको उसे नजदीकसे देखना होगा ना की किसी चश्मेसे | पिछ्ले दिनो जब सचिन तेंडुलकरने कुछ राजकीय वक्तव्य किया था तब शरद पवारजी ने उन्हे "अपने क्षेत्र से अलग विषय पर बोलने में बरतें सावधानी' ऐसी नसीहत दी थी | अब आपको शरद पवारजी से ऐसी नसीहत मिलनेकी उम्मीद नही | लेकीन आज भी अगर आपने आपके क्षेत्र की तरफ ध्यान दिया तो फिल्मोके इस बुरे दौरमे कुछ अच्छी कहानीवाली फिल्मे दर्शकोंको देखने के लिये मिल सकती है | इसलिए आपने भी आर.एस.एस. की तुलना तालिबान जैसी संघटनाओंसे करने की बजाय आपके क्षेत्र मे ध्यान देना बेहतर है |  यह सब आपको लिखा , इसलिए फिरसे एकबार "रूठ ना जाना तुमसे कहूं तो" इस आपहीके गीत की पंक्ती  का आधार लेकर  खत पूरा करता हूं |

व्हिडीओ देखे 👉

*Subscribe channel 👇*

https://youtu.be/7u7susWjlNY

०२/०९/२०२१

Article about huge plantation at Januna Lake , Khamgaon by Social Works Society Shambho Shambho Group

 हिरवा निसर्ग हा संगतीने...जनुना तलाव

शंभो शंभो गृपच्या या वृक्षारोपणा बद्दल कळल्यावर तिथे जाऊन आलो, ती वृक्षराजी पाहून मनाला अत्यंत प्रसन्नता वाटली , नुकतेच कोरोनाच्या दुस-या लाटेत प्राणवायूचे महत्व काय आहे हे सर्वानांच चांगले कळून चुकले. शंभो शंभो ग्रुपने तर या वृक्ष लागवडीच्या व संगोपनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्राणवायूची उधळणच खामगांवकरांसाठी करून दिली आहे व ती सुद्धा मोफत.   

जनुना तलावाबाबत यापुर्वी अनेकदा लिहिले आहे खरे पण ते खिन्न व उद्विग्न भावाने. आजचा लेख लिहितांना मात्र आनंदाचा भाव आहे. जनुना तलाव व बाग , दोन्ही बाजूंनी महाकाय वटवृक्ष असलेला या बागेकडे जाणारा मार्ग , तलावातील जलसाठा , कलाचार्य पंधे गुरुजी यांच्या राष्ट्रीय शाळेत बनवलेली उद्यानाच्या प्रवेशव्दारावरील व उद्यानात असलेली आकर्षक शिल्पे , छत्र्या , कारंजे , झाडे, फुले अशा या नयनरम्य , आल्हाददायक , पशु पक्षांच्या मंजूळ आवाजा व्यतिरिक्त इतर कुठलाही ध्वनी गोंगाट नसलेल्या नीरव शांत ठिकाणी मानवी मनाला अपरिमित अशा आनंदाची अनुभूती प्राप्त होत असे. शहरातील गर्दी , धावपळ सोडून या भागात आलेले लोक सुखावून जात. भगवंतानी गीतेत सर्वत्र मी व्यापलेला आहे , सर्वदूर केवळ मीच आहे असे जे सांगितले आहे त्याची प्रचीती, त्याची उपस्थिती येथील वनराई व निसर्ग सुबत्ता पाहून अध्यात्मिक जाण असलेल्या कित्येकांना जाणवली सुद्धा असेल. पण कालांतराने मात्र या निसर्ग समृद्ध भागास उतरती कळा लागली , कुणाची दृष्ट लागली कोण जाणे कदाचित येथील एकांतच याला कारणीभूत झाला असावा. येथे कुणी पाहरेकरी नसल्याने हळू हळू येथील वैभव संपुष्टात येत गेले. येथील प्राणी गतप्राण झाले , त्यानंतर त्यांचे पिंजरे मोडकळीस आले , नंतर तर त्या पिंज-यांच्या जाळ्या सुद्धा गायब झाल्या , शिल्पे भग्न झाली , तलावाच्या संरक्षक भिंतीवरील कठडे लुप्त झाले हळू-हळू होत गेलेली ही दुर्दशा खामगांवकर याची देही याची डोळा पहात होते व दु:खी होत होते. परंतू “सब दिन ना होत एक समान” या उक्ती प्रमाणे येथे काही सुज्ञ नागरीकांनी ‘फिटनेस’ साठी म्हणून पोहणे सुरु केले व तो त्यांचा नित्यक्रमच झाला , रोज इथे आल्याने व या लोकांनी बालपणी या स्थळाचे वैभव पाहिले असल्याने त्यांना ही तलाव व उद्यानाची दुर्दशा पहावली जाणे कसे शक्य आहे ? इथे आल्यावर एकमेकांना शंकराचे नांव घेऊन अभिवादन करणा-या या लोकांनी मग आपल्या गटाला त्याच नटराजाचे , निळकंठाचे, भोळ्या शंकराचे, कैलासपतीचे , बाबा बर्फानीचे असे शंभो शंभो गृप नांव दिले. याच लोकांनी मग देवी, गणपती विसर्जनानंतर तलाव स्वच्छता , वृक्षारोपण , येथील प्राणीमात्रांना व पक्षांना खाद्य घालण्याचे कार्य सुरु केले , यांमुळे या भागात आज अनेक पक्षांचे आगमन झाले आहे. 

“सामर्थ्य आहे चळवळीचे , जो जे करील तयाचे ,परंतू तेथे ईश्वराचे अधिष्ठान पाहीजे"

 या रामदास स्वामींच्या उक्तीनुसार आधी ईश्वराचे अधिष्ठान असावे म्हणून उद्यानातील हनुमंताच्या जुन्या , छोट्या मंदिराचा जिर्णोद्धार या गृप ने केला. सामाजिक भान , निसर्गामुळे आपण आहोत ही जाणीव या गृपला असल्याने यांनी मग याच परिसरात नगर परिषदेच्या 8 एकर ओसाड भूमीत 2600 वृक्ष लावले. पुढे 750 वृक्ष आणखी लावण्यात आले या वृक्षांचा अनुक्रमे प्रथम व व्दितीय वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला. आता इथे विपुल वृक्षारोपण झाले असले तरी जनुना तलाव उद्यानास पुर्वीसारखे वैभव कधी प्राप्त होईल या प्रतीक्षेत नागरिक आहेत.

      जनुना तलाव व त्याची दुर्दशा या बद्दल यापुर्वी अनेकदा लिहिले आहे. तलाव आटला तेंव्हा तर अनेक लोक भावविभोर झाले होते. परंतू शंभो शंभो गृपच्या या वृक्षारोपणा बद्दल कळल्यावर तिथे जाऊन आलो , ती वृक्षराजी पाहून मनाला अत्यंत प्रसन्नता वाटली , नुकतेच कोरोनाच्या दुस-या लाटेत प्राणवायूचे महत्व काय आहे हे सर्वांनाच चांगलेच कळून चुकले. शंभो शंभो गृपनेे तर या वृक्ष लागवडीच्या व संगोपनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्राणवायूची जणू उधळणच खामगांवकरांसाठी करून दिली आहे व ती सुद्धा मोफत. इतके चांगले कार्य करणा-या या गृपवर कोरोना काळात गंडांतर सुद्धा आले होते परंतू ते क्षणिक होते , ते विसरून गृप पुन्हा सक्रीय झाला हे विशेष. या देशात एकट्याने पहाड फोडून रस्ता बनवणारा  दशरथ मांजी , हजारो एकरचे जंगल निर्माण करणारा जादव पायेंग , बीजमाता राहीबाई पोपरे असे आणखी कितीतरी लोक आहेत की जे स्वत:साठी नव्हे तर इतरांसाठी जगून एक वेगळा आनंद प्राप्त करीत आहेत शंभो शंभो गृपचे वृक्ष लागवड व संगोपनाचे कार्य याच पंक्तीत बसणारे आहे असे  म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. शंभो शंभो गृपच्या या अभियानामुळे , निसर्गप्रेमामुळे , शहरावरील प्रेमामुळे , उन्हाळा, हिवाळा, पावसाळा अशा बाराही महिन्यात चाललेल्या पोहण्याच्या व्यायामामुळे इतरांना सुद्धा नक्कीच प्रेरणा मिळेल. निसर्गप्रेमी , सामाजिक भान असलेला, आरोग्याप्रति जागरूक असलेला हा गृप असाच अग्रेसर होवो. या गृपचे अध्यक्ष तसेच सर्व सभासद गृपला सहाय्य करणारे उसयोगपती  यांचे खामगांवकर नागरिकांच्या वतीने आभार व अभिनंदन.