हिरवा निसर्ग हा संगतीने...जनुना तलाव
शंभो शंभो गृपच्या या वृक्षारोपणा बद्दल कळल्यावर तिथे जाऊन आलो, ती वृक्षराजी पाहून मनाला अत्यंत प्रसन्नता वाटली , नुकतेच कोरोनाच्या दुस-या लाटेत प्राणवायूचे महत्व काय आहे हे सर्वानांच चांगले कळून चुकले. शंभो शंभो ग्रुपने तर या वृक्ष लागवडीच्या व संगोपनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्राणवायूची उधळणच खामगांवकरांसाठी करून दिली आहे व ती सुद्धा मोफत.
जनुना तलावाबाबत यापुर्वी अनेकदा लिहिले आहे खरे पण ते खिन्न व उद्विग्न भावाने. आजचा लेख लिहितांना मात्र आनंदाचा भाव आहे. जनुना तलाव व बाग , दोन्ही बाजूंनी महाकाय वटवृक्ष असलेला या बागेकडे जाणारा मार्ग , तलावातील जलसाठा , कलाचार्य पंधे गुरुजी यांच्या राष्ट्रीय शाळेत बनवलेली उद्यानाच्या प्रवेशव्दारावरील व उद्यानात असलेली आकर्षक शिल्पे , छत्र्या , कारंजे , झाडे, फुले अशा या नयनरम्य , आल्हाददायक , पशु पक्षांच्या मंजूळ आवाजा व्यतिरिक्त इतर कुठलाही ध्वनी गोंगाट नसलेल्या नीरव शांत ठिकाणी मानवी मनाला अपरिमित अशा आनंदाची अनुभूती प्राप्त होत असे. शहरातील गर्दी , धावपळ सोडून या भागात आलेले लोक सुखावून जात. भगवंतानी गीतेत सर्वत्र मी व्यापलेला आहे , सर्वदूर केवळ मीच आहे असे जे सांगितले आहे त्याची प्रचीती, त्याची उपस्थिती येथील वनराई व निसर्ग सुबत्ता पाहून अध्यात्मिक जाण असलेल्या कित्येकांना जाणवली सुद्धा असेल. पण कालांतराने मात्र या निसर्ग समृद्ध भागास उतरती कळा लागली , कुणाची दृष्ट लागली कोण जाणे कदाचित येथील एकांतच याला कारणीभूत झाला असावा. येथे कुणी पाहरेकरी नसल्याने हळू हळू येथील वैभव संपुष्टात येत गेले. येथील प्राणी गतप्राण झाले , त्यानंतर त्यांचे पिंजरे मोडकळीस आले , नंतर तर त्या पिंज-यांच्या जाळ्या सुद्धा गायब झाल्या , शिल्पे भग्न झाली , तलावाच्या संरक्षक भिंतीवरील कठडे लुप्त झाले हळू-हळू होत गेलेली ही दुर्दशा खामगांवकर याची देही याची डोळा पहात होते व दु:खी होत होते. परंतू “सब दिन ना होत एक समान” या उक्ती प्रमाणे येथे काही सुज्ञ नागरीकांनी ‘फिटनेस’ साठी म्हणून पोहणे सुरु केले व तो त्यांचा नित्यक्रमच झाला , रोज इथे आल्याने व या लोकांनी बालपणी या स्थळाचे वैभव पाहिले असल्याने त्यांना ही तलाव व उद्यानाची दुर्दशा पहावली जाणे कसे शक्य आहे ? इथे आल्यावर एकमेकांना शंकराचे नांव घेऊन अभिवादन करणा-या या लोकांनी मग आपल्या गटाला त्याच नटराजाचे , निळकंठाचे, भोळ्या शंकराचे, कैलासपतीचे , बाबा बर्फानीचे असे शंभो शंभो गृप नांव दिले. याच लोकांनी मग देवी, गणपती विसर्जनानंतर तलाव स्वच्छता , वृक्षारोपण , येथील प्राणीमात्रांना व पक्षांना खाद्य घालण्याचे कार्य सुरु केले , यांमुळे या भागात आज अनेक पक्षांचे आगमन झाले आहे.
“सामर्थ्य आहे चळवळीचे , जो जे करील तयाचे ,परंतू तेथे ईश्वराचे अधिष्ठान पाहीजे"
या रामदास स्वामींच्या उक्तीनुसार आधी ईश्वराचे अधिष्ठान असावे म्हणून उद्यानातील हनुमंताच्या जुन्या , छोट्या मंदिराचा जिर्णोद्धार या गृप ने केला. सामाजिक भान , निसर्गामुळे आपण आहोत ही जाणीव या गृपला असल्याने यांनी मग याच परिसरात नगर परिषदेच्या 8 एकर ओसाड भूमीत 2600 वृक्ष लावले. पुढे 750 वृक्ष आणखी लावण्यात आले या वृक्षांचा अनुक्रमे प्रथम व व्दितीय वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला. आता इथे विपुल वृक्षारोपण झाले असले तरी जनुना तलाव उद्यानास पुर्वीसारखे वैभव कधी प्राप्त होईल या प्रतीक्षेत नागरिक आहेत.
जनुना तलाव व त्याची दुर्दशा या बद्दल यापुर्वी अनेकदा लिहिले आहे. तलाव आटला तेंव्हा तर अनेक लोक भावविभोर झाले होते. परंतू शंभो शंभो गृपच्या या वृक्षारोपणा बद्दल कळल्यावर तिथे जाऊन आलो , ती वृक्षराजी पाहून मनाला अत्यंत प्रसन्नता वाटली , नुकतेच कोरोनाच्या दुस-या लाटेत प्राणवायूचे महत्व काय आहे हे सर्वांनाच चांगलेच कळून चुकले. शंभो शंभो गृपनेे तर या वृक्ष लागवडीच्या व संगोपनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्राणवायूची जणू उधळणच खामगांवकरांसाठी करून दिली आहे व ती सुद्धा मोफत. इतके चांगले कार्य करणा-या या गृपवर कोरोना काळात गंडांतर सुद्धा आले होते परंतू ते क्षणिक होते , ते विसरून गृप पुन्हा सक्रीय झाला हे विशेष. या देशात एकट्याने पहाड फोडून रस्ता बनवणारा दशरथ मांजी , हजारो एकरचे जंगल निर्माण करणारा जादव पायेंग , बीजमाता राहीबाई पोपरे असे आणखी कितीतरी लोक आहेत की जे स्वत:साठी नव्हे तर इतरांसाठी जगून एक वेगळा आनंद प्राप्त करीत आहेत शंभो शंभो गृपचे वृक्ष लागवड व संगोपनाचे कार्य याच पंक्तीत बसणारे आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. शंभो शंभो गृपच्या या अभियानामुळे , निसर्गप्रेमामुळे , शहरावरील प्रेमामुळे , उन्हाळा, हिवाळा, पावसाळा अशा बाराही महिन्यात चाललेल्या पोहण्याच्या व्यायामामुळे इतरांना सुद्धा नक्कीच प्रेरणा मिळेल. निसर्गप्रेमी , सामाजिक भान असलेला, आरोग्याप्रति जागरूक असलेला हा गृप असाच अग्रेसर होवो. या गृपचे अध्यक्ष तसेच सर्व सभासद गृपला सहाय्य करणारे उसयोगपती यांचे खामगांवकर नागरिकांच्या वतीने आभार व अभिनंदन.
खूप सुंदर
उत्तर द्याहटवा🙏
हटवाशंभो शंभो समूहाचे अभिनंदन ! सामाजिक चळवळीत प्रत्येकाने अंश रूपाने का होईना योगदान दिल्यास भारत हिरवागार होईल .
हटवाKhup chhan lihale
उत्तर द्याहटवा🙏
हटवाआपण नेहमीच खूब छान लिहता । आज आपण पर्यवरनाशी जोड़ असलेल्या शम्भू ग्रुप बद्दल लिहले ते योग्यच आहे । ह्या सर्वानी मिळून चांगला हिरवेगार करुण टाकलय । सर्वाना शुभेच्छा
उत्तर द्याहटवा