थरूर तुम्हाला भगतसिंग कळलाच नाही.
मनुष्य
केंव्हा काय बोलेल याचा नेम नाही.भल्या-भल्या लोकांची बोलताना जीभ घसरते आणि घसरलेली
आहे.त्यांच्या जीभ घसरण्याचा परिणाम सुद्धा त्यांना प्रसंगी भोगावा लागला आहे. तसे
आपल्या देशात काहीही बोलणा-यांची वानवा नाही.आपण कुणी तरी फार बुद्धिमान आपल्याला
सर्व समजते अशा गैरसमजात हे लोक वावरत असतात.शशी थरूर हे अशांपैकीच एक नेते.देखणे,उच्चविद्याविभूषित,
दिवंगत सुनंदा पुष्कर यांचे दुसरे का तिसरे पती,’फॉरेन रीटर्न’ आणि त्यामुळेच
स्वत:ला काहीतरी वेगळे समजणारे शशी थरूर सदैव चर्चेत राहण्याच्या प्रयत्नात असतात.विरोधी
पक्षात असूनही पंतप्रधानांवर स्तुती सुमने उधळण्यामुळे मागे ते चर्चेत आले होते.त्याआधी
त्यांची पत्नी सुनंदा पुष्कर या मृत अवस्थेत दिल्लीच्या एका हॉटेल मध्ये आढल्यामुळे
संशयाची सुई शशी थरूर यांच्याकडे फिरलेली आहे व त्यामुळे ते चर्चेत आले होते.होळीच्या
आणि भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहीद दिनाच्या पूर्वसंध्येला थरुर बरळले,“भगतसिंग
म्हणजे तत्कालीन कन्हैयाकुमार”.आता यांना कुणी विचारले कि भगतसिंग म्हणजे तत्कालीन
कोण?तसेहि त्यांना विचारणारे आता कुणी नाही.आता कुणी विचारत नसेल,जनसंपर्क कमी
झाला असेल तर ते नेत्यांसाठी फार मोठे दु:ख असते.मग आपल्याकडे जनतेचे,माध्यमांचे लक्ष
आकर्षित व्हावे म्हणून अशा दुर्लक्षित झालेल्या,अडगळीत पडलेल्या नेत्यांची धडपड
सुरु असते.त्यांच्या याच धडपडीतून आणि नैराश्यातून मग यांच्या मुखातून अशा
प्रकारची वक्तव्ये बाहेर पडत असतात.“भगतसिंग म्हणजे तत्कालीन कन्हैयाकुमार” असे
त्यांचे वक्तव्य त्यापैकीच एक.कुठे प्रखर देशाभिमानी,देशभक्त, तरुणाचा आदर्श आणि
कुठे हा देशात दुही निर्माण करणारा कन्हैयाकुमार.तसे पाहिले तर तत्कालीन क्रांतिकारी,जहाल
वा मवाळ स्वतंत्रता सेनानी असो यांची तुलना आजच्या आंदोलकांशी होऊच शकत नाही. कारण
ते सर्व इंग्रज या परकियांच्या भारतातील सरकार विरोधी होते आणि आजचे आंदोलक हे स्वकीयांनी
स्थापलेल्या सरकार विरोधी आहे.म्हणून आजच्या आंदोलकांच्या आंदोलनातून नेहमीच
राजकारणाचा गंध येतो.आजच्या आंदोलकांची आंदोलने,वक्तव्ये हि निव्वळ फार्स ठरतात.काही
तरी असे बोलायचे कि माध्यमे त्याची चर्चा करतील आणि मग त्यातून आपला राजकारणाचा
चंचू प्रवेश घडवायचा.भगतसिंग अथवा तत्कालीन कुणीही असो ते सर्व नि:स्वार्थ पणे
इंग्रजाविरुद्ध लढले.आजचे आंदोलक हे त्यांच्या इतके निस्वार्थ असूच शकत नाही.आजकाल
राजकारण असो आथवा सरकारी नोकरी हे सर्व वरकमाई साठीची साधने झाली आहेत.सरकारी
नोकरीसाठी इच्छुक उमेदवार किंवा राजकारणात प्रवेश करणारे इच्छुक यांना विचारले कि तुम्ही हे क्षेत्र का निवडता आहात?तर
हे तरुण निर्लज्जपणे स्पष्ट उत्तर देतात कि ‘वरकमाई’. मग असे तरुण आणि तत्कालीन क्रांतिकारी
वा स्वतंत्रता सेनानी यांची तुलना कशी करणार? ते सर्वस्व सोडून देशकार्यासाठी
उतरले होते आणि हे सर्व मिळवण्यासाठी देशकार्यात उडी घेत आहेत.नाही- नाही म्हणता
दिल्ली सरकारनी सर्व प्रथम आपल्याच पात्रात लोकप्रतिनिधींच्या वेतनवाढीचे तूप ओतून
घेतले.शशी थरूर यांच्या सारख्या नेत्यांनी उगीच आपली बुद्धी पाजळून काहीही हि बोलून
तरुणांची दिशाभूल करू नये.भगतसिंगाना तुम्ही तत्कालीन कन्हैयाकुमार
म्हणत असाल तर तुम्ही भगतसिंगांचा अपमान करीत आहात.इतरांची तुलना
करण्यापेक्षा तुम्ही स्वत: कोण आहात ते तपासा.ना धड भारतीय ना धड विदेशी.विदेशातच
तुमची जास्त हयात गेली त्यामुळे तुम्हाला भगतसिंग काय कळणार? तुम्ही प्रथम भगतसिंगचे
चरित्र समजून घ्या आणि मग त्याची तुलना नवख्या किंबहुना बालिश तसेच देशविघातक, देशद्रोही
वक्तव्ये करणाऱ्या,कुणाचे तरी बोलके बाहुले बनलेल्या कन्हैयाकुमार सारख्या तरुणाची
महान भगतसिंग सोबत तुलना करण्याची हिम्मत करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा