मै निकली गड्डी लेके....महिला दिन विशेष
आजच्या महिला दिनी महाराष्ट्रातील तमाम महिला,शेतकरी आणि
इतर बांधवांनी योगिता रघुवंशी यांचा आदर्श उरी बालागणे जरुरी वाटत आहे. क्षुल्लक कारणामुळे
लोक आत्महत्या करीत आहेत. विद्यार्थी पेपर खराब गेला कि,शेतकरी कर्जाने किंवा
नापिकीमुळे आत्महत्या करीत आहेत. तसेच इतरही लोक अल्पशा अपयशामुळे, परिस्थितीमुळे
आत्महत्या करीत आहेत आजच्या जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने सर्वांनी योगिता
रघुवंशी यांचा आदर्श ठेवून परिस्थितीशी लढा देण्यास शिकणे जरुरी आहे ‘ जान है ते जहां
है ‘. आज अनेकांना योगिता रघुवंशी माहित सुद्धा नसतील परंतु त्यांनी एक महिला
सुद्धा पुरुषी व्यवसाय अंगीकारून यशस्वी होऊ शकते हे सिद्ध करून दाखवले आहे.भोपाल
मध्ये राहून अस्खलित मराठी बोलणा-या
योगिता यांना पाहून त्यांचा आत्मविश्वास पाहून असे वाटत होते कि त्या सुद्धा
वैमानिक किंवा रेल्वे इंजिन चालक, शिक्षिका किंवा हवाई सुंदरी यांच्या इतक्याच
योग्यतेच्या आहेत. योगिता यांनी त्यांची योग्यता सिद्ध करून दाखवली त्यांचे माता
पिता व मुले यांना त्यांच्या बद्दल अभिमान आहे.भारतातील महिलांमध्ये आजही राणी
लक्ष्मीबाई, हिरकणी, आनंदीबाई गोखले, सावित्रीबाई फुले यांचे गुण आहेत हे योगिता
यांनी दाखवून दिले आहे. जगातील इतर महिलापेक्षा आम्ही सुद्धा कमी नाही आहोत हे
सुद्धा त्यांनी सिद्ध केले आहे. कोणी काहीही म्हणो योगिता त्यांचे कार्य सुरूच
ठेवीत आहे जगाची पर्वा न करता त्या दररोज ‘मै निकली गड्डी लेके’ म्हणत त्यांचे
कार्य करण्यात मग्न आहेत. जागतिक महिला दिनी योगिता यांना व त्यांच्या कार्याला अभिवादन
ईश्वर त्यांना त्यांच्या व्यवसायात यश देवो व त्यांच्या पासून इतरांना प्रेरणा मिळो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा