छोडो कल की बाते ...
काल पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी दुपारी 11.45 ते 12.15 या वेळेत एक म्हत्वपूर्ण घोषणा करणार असे व्टीट
केले. जनतेला पुनश्च आश्चर्य वाटले की आता कोणती घोषणा होणार ?
नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक , एअर
स्ट्राईक असे नाना विषय जनतेच्या मनात घोळू लागले. लोक एकमेकांना फोन , संदेश करू लागले. वृत्तवाहिन्यांचे एकापेक्षा एक कयास करणे सुरू झाले.
शेवटी नरेंद्र मोदी यांनी “भारताने लो अर्थ ऑर्बिटला अॅन्टी सॅटेलाईटने पाडले व भारत उच्च अंतरक्ष
शक्ती असलेल्या तीन देशांच्या नंतर जागातील चौथ्या क्रमांकाचा देश झाला” अशी घोषणा केली निवडणुकांच्या
पार्श्वभूमीवर ही घोषणा झाल्याने विरोधक हा विषय निवडणूक आयोगाकडे नेतील यात
आश्चर्य नव्हते. विरोधकांनी #MissionShakti नंतर ही क्षमता
पूर्वीपासून भारताकडे होती असा कांगावा सुरू केला. ही क्षमता भारताकडे पूर्वीपासून
होती हे अमान्य करण्याचे काही कारण नाही. परंतू अशी क्षमता होती तर मग तीला दाबून
का ठेवण्यात आले? सरकार कोणत्याही पक्षाचे असो देशाला मजबूत
देश म्हणून जगाच्या पुढे आणणे, वैज्ञानिकांना प्रोत्साहन
देणे, या गोष्टी व्हायलाच हव्यात. केवळ क्षमता होती, आम्ही हे केले होते हे आता सांगण्यात काही अर्थ नाही. पूर्वी अमेरिका
भारतीय सावकाश संशोधन मोहीमेची खिल्ली उडवीत होती. इंग्लंडला भारत अप्रगत राहील
असेच वाटत होते.परंतू सायकलवर, बैलगाडीवर अवकाश सामुग्री
वाहून नेणारा भारत लवकरच अवकाश प्रक्षेपण, उपग्रह या
क्षेत्रात एक सफल, सक्षम देश म्हणून उभा राहीला.आज अनेक
देशांचे उपग्रह भारतातून प्रक्षेपीत केले जातात. भारताततून प्रक्षेपण करण्याचा
खर्च सुद्धा कमी आहे.कालच्या या भारताच्या #MissionShakti अभियानामुळे भारत आता लो अर्थ ऑर्बिटला मधील
उपग्रह नष्ट करू शकणारा अमेरीका, रशिया ,चीन यांनंतर जगातील चौथा देश झाला. लो अर्थ ऑर्बिट मध्ये हेरगिरी करणारे
उपग्रह असतात. त्यांना जर पाडायचे असेल तर अंतराळ क्षेपणास्त्र असावे लागते.त्याच
संपूर्ण स्वदेशी क्षेपणास्त्राचा यशस्वी प्रयोग भारताने केला ही संपूर्ण
भारतवासीयांसाठी निश्चित्च अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. यासाठी #DRDO,भारतीय वैज्ञानिक यांचे सर्वातर्फे अभिनंदन होणे अपेक्षित आहे.
विरोधकांच्या म्हणण्यानुसार हे तंत्रज्ञान जरी पूर्वीपासून भारताजवळ आहे तरी
तंत्रज्ञानाचा वापर करून ते जगासमोर आणून आपल्या देशाला एक विकसित देश,सफल देश,सक्षम देश म्हणून समोर
आणणे सुद्धा आवश्यक असते. तसेच पक्षभेद सोडून समस्त भारतीयांनी निदान देशहीतासाठी, सुरक्षेसाठी
, तंत्रज्ञान समृद्धीसाठी तरी एकत्र येणे व जागाला आम्ही एक आहोत
हे दाखवणे सुद्धा गरजेचे आहे कारण
छोडो कल की
बाते, कल की बात पुरानी
नये दौरमे लिखेंगे
मिलकर नयी कहानी
हम हिंदुस्तानी