हृदयद्रावक घटनेची 100 वर्षे

गोळीबार सुद्धा होत होता. काही मार्ग बंद होते. जीवाच्या आकांताने सर्व सैरभैर पळू लागले. बागेतलीच एका विहिरीत कित्येकांनी उड्या टाकल्या. इंग्रज सरकारने 379 लोक मृत्यूमुखी पडल्याचे सांगितले तर काँग्रेसने 1000 लोक शहीद झाल्याचा आकडा दिला होता. कित्येक लोक जख्मी झाले होते. तसेच गोळीबारातून बचाव व्हावा म्हणून विहिरीत उड्या मारल्यामुळे 120 लोक मृत्यूमुखी पडले होते. जालान येथील हिम्मत सिंग कुटुंबियांची ही बाग. जालान येथील असल्यामुळे त्यांना जालानवाले असे नांव पडले. व त्यामुळेच हे स्थान जालियानवाला बाग म्हणून ओळखल्या जाऊ लागले. इंग्रज सरकारच्या एका सनकी अधिका-यामुळे निरपराध, निशस्त्र भारतीयांचे येथे हकनाक बळी गेले. पुढे या ठिकाणाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. इंग्रजाने केलेल्या या जुलमाच्या खुणा आजही येथील भिंतींवर दिसतात. ब्रिटनच्या संसदेत पंतप्रधान थेरेसा मे यांनी जालियानवाला बाग हत्याकांडा बाबत खेद व्यक्त केला आहे. यापूर्वीही 2013 मध्ये तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅॅमरून यांनी या घटनेला लज्जास्पद म्हटले होते. वरील दोहोंनीही माफी मात्र मागितली नाही. तेथील मजूर पक्ष मात्र ब्रिटीश सरकारने भारताची माफी मागावी अशी मागणी लावून धरली आही. या घटनेला 100 वर्षे पूर्ण होत आहे. आपण सर्वानी देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्यांचे नेहमीच ऋणी असले पाहिजे. आज दुर्दैवाने भारतात पुनश्च जातीवाद, प्रांतवाद, धर्मभेद वाढीस लागला आहे. कुणी राजकीय पोळी शेकण्यासाठी आपल्या मनात काही भरले की आपण आपल्या सदसदविवेकबुद्धीने विचार न करता तसेच वागू लागतो. डायरच्या गोळीबार करणा-या सैनिकांत राजपूत , शिख तुकड्या होत्या. परंतू त्या तुकड्या इंग्रजांच्या अधीन होत्या. उद्या चालून कुणी आपल्या मनात जालियनवाला बाग येथे राजपूत व शिख सैनिकांनी गोळ्या झाडल्या म्हणून खूळ घालायला नको. जर घातलेच तर आपण त्यास थारा द्यायला नको. महाराष्ट्रात असे जातीय विष हेतूपुरस्सर पेरल्या गेले आहे. त्याचे भीषण परिणाम आपण नुकतेच पहिले आहेत. आपल्या इतिहासातून चांगले तेवढे घेणे जरुरी आहे. आजच्या पिढीला ऐतिहासिक घटना क्वचितच ठाऊक असतात. नवीन पिढीला परकीयांनी आपल्या राष्ट्रात कसे अत्याचार केले होते याची आठवण, जाणीव करून देणे जरुरी आहे. जनरल डायरला लेफ्टनंट गव्हर्नर मायकेल ओडवायर याने पाठवले होते. जालियानवाला बाग नरसंहाराचा प्रतिशोध उधमसिंगने 20 वर्षानंतर घेतला. मोजकेच स्वतंत्रता सेनानी, क्रांतिकारक यांची माहिती नवीन पिढीला आहे त्यामुळे उधमसिंग विषयी पुन्हा कधीतरी. जालियानवाला बागेतील नरसंहारात बळी पडलेल्या भारतीय बंधू भगीनींना विनम्र श्रद्धांजली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा