गाळमुक्त तलाव....रोटरीचा दिलासा
जनुना तलाव आटला,
खामगांवातील नागरिकांना दु:ख झाले. माध्यमांवर आटलेल्या जनुना तलावाची चित्रे आणि
चित्रफित झळकली. सर्व खामगांववासी हळहळले. परंतू अल्पावधीतच वृत्तपत्रात जनुना तलावातील गाळ रोटरी क्लब
काढणार या आशयाची बातमी झळकली व गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जनुना तलाव सफाई व
गाळ काढण्याच्या मोहिमेची सुरुवात
मा. जिल्हा संघचालक महादेवराव भोजने यांच्या हस्ते यंत्रांचे विधिवत पूजन करून तसेच स्थानिक आमदार आकाश फुंडकर, रोटरी क्लब सदस्य, जैन संघटना पदाधिकारी तसेच अनेक गणमान्य नागरीक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या गाळ उपस्यामुळे तलावाची साठवण क्षमता वाढेल शिवाय शेतक-यांना सुद्धा गाळ मोफत उपलब्ध होणार आहे. दिवसेंदिवस पाण्याची समस्या मोठी बिकट होत आहे. पाण्याची पातळी खालावत आहे. पाणी फाउंडेशनने या बाबत अभ्यासपूर्ण सर्वेक्षण केले आहे. त्यांचे कार्यकर्ते याबाबत जागरूकता निर्माण करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर खामगांव नगर परिषदेने रोटरी क्लबशी संपर्क साधून जनुना तलाव गाळमुक्त मोहीम सुरु केल्याचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी कळवले आहे. ही मोहीम यशस्वी व्हावी म्हणून अनेक लोक पुढे सरसावले आहेत. जैन संघटनेने 2 जेसीबी व 1 पोकलँड मशीन विनामूल्य दिले आहे. केमिस्ट असोशिएशन कडून 1 लाख 11 हजार रुपये मदत दिली आहे. तलाव गाळमुक्त करण्याचे वृत्त येताच खामगांवकर सुखावले आहेत. जलसंधारण ही आता आवश्यक बाब आहे अन्यथा पुढील काळ मोठा बिकट असेल. आफ्रिकेतील केपटाऊन येथे आता पाणीच शिल्लक नाही. महाराष्ट्रात गतकाळात लातूर शहराला रेल्वेने पाणी पाठवले गेले होते.नागरिक, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी सर्वानीच हे जाणणे अत्यावश्यक आहे. या बाबत कुणी काही सुचवत असल्यास त्याचा स्विकार होणे अपेक्षित आहे, जागरूकता निर्माण करीत असेल तर ती सकारात्मक पद्धतीने स्विकारणे आवश्यक आहे. आपले खेडे, आपले शहर यांच्या विकासाच्या प्रश्नावर सर्वानीच सुज्ञतेने, प्रगल्भतेने एकत्रित येऊन हा प्रश्न मार्गी लावणे जरुरी आहे. खामगांव शहरात सध्या काही तरुण स्वयंप्रेरित होऊन जनुना तलाव साफ सफाई मोहिमेत अग्रेसर झाले आहेत. या तरुणांचे हे कृत्य अनुकरणीय व प्रेरणादायी आहे. अजिंक्यतारा किल्ल्यावर याच पद्धतीने जलसंधारण, वृक्षारोपण केल्यावर किल्ल्याच्या पायथ्याच्या परीसरात पाण्याची पातळी वाढली आहे. जनुना तलाव गाळमुक्त करण्याची मोहीम दोन महिने चालणार असून दररोज 8 तास गाळ उपसा होणार आहे यासाठी अनेक मालवाहू गाड्या कार्यास लागल्या आहेत. संपूर्ण तलाव गाळमुक्त झाल्यावर तलावाची साठवण क्षमता दुपटीने वाढण्याचा कयास आहे. जनुना तलाव हा खामगांववासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. येथे दररोज जाणारे अनेक नागरिक आहेत.येथे वर्षभर जलविहार करण्यास जाणारे सुद्धा अनेक आहेत. देवी व गणपती विसर्जनानंतर हे जलतरण करणारे लोक हा तलाव स्वयंस्फुर्तीने साफ करीत असतात. म्हणूनच तलाव आटल्यावर दु:ख झाले परंतू रोटरीच्या मोहिमेने दिलासा दिला.आगामी पावसाळ्यात या तलावात भरपूर पाणीसाठा होवो, त्या पाण्याचे जतन होवो, त्या पाण्याचा शहरासाठी उपयोग होवो हीच सदिच्छा. मृच्छकटिक नाटकात नायक चारुदत्त एक भरतवाक्य म्हणतो त्यातील सुरुवातीच्या ओळी आहेत

क्षीरीण्य: सन्तु गावो भवतु वसुमती सर्वसंपन्नसस्या
पर्जन्य: कालवर्षी सकलजनमनोनन्दिनो वान्तु वाता:
अर्थात :- “गायी खूप दुध देणा-या असोत. पृथ्वी सर्व प्रकारच्या
धान्यांनी समृध्द असो. पाऊस वेळेवर पडो. सर्व लोकांच्या अंत:करणाला आनंदित करणारे वारे
वाहोत.
शेवटी सर्वांची हीच अपेक्षा असते. नाही का ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा