सोते हुये शेर को जगाया नही करते

सुद्धा झोपमोड केल्या गेली.दुपारची वामकुक्षी सर्वांना प्रिय असते. काही लोक भ्रमणध्वनी बंद करून निद्रानंद घेतात. तर काहींंनी 4 वाजेपर्यन्त उठवू नका असे सेवकाला सांगून ठेवलेले असते. पुणेकरांची याबाबतीत नेहमीच खिल्ली उडवली जाते. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत पुण्यात 40 टक्केच मतदान झाले. याचेही कारण कदाचित दुपारची ही वामकुक्षी हेच असावे. आता मानवाचा निद्राभंग झाला तर तो काही तरी करू शकतो. परंतू जंगली हिंस्त्र पशूचे काय ? त्याची निद्रा जवळ जाऊन भंग करण्याची हिम्मत कोण करेल ? समझा कुणी केलीच तर त्याचा दंड तो काय वसूल करेल हे स्पष्ट्च आहे. त्याची निद्रा भंग केल्याचा दंड तो त्या निद्राभंग करणा-याला चिरनिद्रा देऊनच वसूल करेल. तसाच राष्ट्रीय उद्यानातील छान झोपलेल्या या वाघाचा निद्रा भंग करण्याचा दंड गाईड व पर्यटक यांना सुद्धा चांगलाच महागात पडला. निद्रा भंग केलेला हा वाघ दूर अंतरावर होता व त्या गाईडने जिप्सीतून खाली उतरून दगड मारून त्याला उठवले होते. आता त्या वाघाने तर त्याला काही दंड केला नाही. परंतू दगड मारण्याची ही कृती थर्मल इमेज कॅमे-यात कैद झाली. वाघाला झोपेतून उठवण्याचा दंड त्या गाईडला व पर्यटकास झाला. दंड थोडा-थोडका नव्हे तर तब्बल 51000 रुपयाचा दंड त्यांना ठोठावण्यात आला शिवाय तातडीने उद्यान सोडण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. दिवसभाराचे त्यांचे बुकींग सुद्धा रद्द झाले. गाईडच्या प्रवेशावर सुद्धा बंदी घालण्यात आली. कोणत्याही प्राण्याला विनाकारण त्रास देऊच नये. त्यातल्या त्यात हिंस्त्र पशूस तर मुळीच देऊ नये. परंतू आजकाल हुल्लडबाजी , गोंधळ करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. जंगले , अभयारण्ये येथे सुद्धा धिंगाणा घालण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले.“सोते हुये शेर को जगाया नही करते” ही म्हण वाघ व सिंहाच्या हिंस्त्रपणामुळेच पडली आहे परंतू आता थर्मल इमेज कॅमेरे , सी सी टीव्ही कॅमेरे असे तंत्रज्ञान सुद्धा आले आहे यांमुळे सुद्धा तुमची कोणतीही कृती उघड होऊ शकते आणि म्हणूनच “सोते हुये शेर को जगाया नही करते” अन्यथा तो नाहीतर सरकार दोनपैकी कुणी ना कुणी निश्चितच दंड करेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा