Click "Follow" Button below To Follow this Blog

१४/१२/२०१९

People blamed another on their failure or defeat in election.


अपयशाचे खापर दुस-याच्याच माथी फुटते
   मानवी स्वभावाला अनेक कंगोरे असतात. यश मिळाले तर ते मी कसे मिळवले , कसा “संघर्ष” केला , काय-काय यातना भोगल्या हे गवगवा करून सांगितले जाते. त्याउलट जर अपयश मिळाले तर त्यासाठी मात्र स्वत:चे आत्मपरीक्षण करण्याऐवजी निरनिराळी “एक्सक्यूजेस” शोधली जातात. कमी-अधिक प्रमाणात अनेकांत स्वभावाचा हा कंगोरा असु शकतो. मग याला राजकारणी कसे अपवाद ठरतील ? याची प्रचीती नुकतीच आली. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपातील काहींचा पराभव झालाकाहींच्या आप्तांचा पराभव झाला पराभव पचवण्याचे बळ मात्र फार क्वचितच लोकांच्या अंगी असते. पराभव झाला की मग जात-पात, “मूठभर लोक” वगैरे आठवायला लागते. यत्कदाचीत सत्तेची समीकरणे जुळली असती तर मग पराभूत लोकांची काय प्रतिक्रिया असती ? परंतू आता पराभूत तर झालेच आहे शिवाय सत्तेची चाबी सुद्धा स्वपक्षाजवळ नाही. मग स्वत:चे राजकीय अस्तीत्व शाबूत राहण्यासाठी काही मुद्दा तर लागेल ना ! राजकारणात कधी हार कधी जीत होतच असते परंतू जे राजकारणी पराभवातही आपला संयम राखतात , तोल ढळू देत नाही ते राजकारणात जास्त लोकप्रिय झालेले दिसतात. किंबहुना ते जनतेच्या मनात आपली जागा बनवतात. 2019 विधानसभा निवडणूकीत अनेक ठिकाणी दलबदलूंना पराभव पत्करावा लागला आहे. पराभूत झाल्यावर मग आपल्या समर्थक, स्वजातीय, स्ववर्गवारीच्या लोकांची सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्न करणे, मुठभर लोकांचा व्देश प्रकट करणे. वास्तविक पाहता मुठभर लोक जे कुणी असतील , ज्या कोणत्या पक्षात असतील त्यांना किंवा त्या मुठभर लोकांच्या बांधवाचा असा कोणता मोठा फायदा झाला आहे याचे सुद्धा अवलोकन करावे. पराभव झाला असेल, अंतर्गत विरोधही असेलही किंवा पाडा-पाडी झाली असेल तरी याप्रसंगी हारून मनोबल न खचू देऊ नये हे अटलजींनी ज्या शब्दात सांगितले त्या ओळी आठवतात.

क्या हार में, क्या जीत में किंचित नहीं भयभीत मैं कर्तव्य पथ पर जो मिला यह भी 
सही वो भी सही वरदान नहीं मांगूंगा हो कुछ, पर हार नहीं मानूँगा।

त्यामुळे आपला पराभव स्विकारून कर्तव्यपथावर मार्गक्रमण करीत राहावे व हार मानू नये 
तसेच ज्या पक्षाने आपल्याला मोठे केले ते विसरून पराभवाचे खापर इतरांच्या माथी फोडणे 
न फोडता “हार नहीं मानूंगा” प्रमाणे यशपथावर अगेसर होत आणखी मोठे होत जावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा