“मी” पणा नसलेला नेता
काल
एका वृत्तचित्रवाहिनीला सरकार स्थापने नंतर शरद पवार यांनी मुलाखत दिली या
मुलाखतीत त्यांनी म्हटले की , महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक
भाषणांमध्ये असं जाणवतं की, त्यांच्या तोंडी 'मी' पणाचा दर्प आहे. त्यामुळेच महाराष्ट्राने त्यांना
नाकारलं, पवार साहेब जनतेने युतीला स्पष्ट बहुमत दिले होते त्याअर्थी जनतेने नाकारले असे कसे
काय ? युती
नंतर तुटली त्यामुळे फडणवीस आज मुख्यमंत्री नाहीत. या मुलाखतीमध्ये पवारांनी राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात घडलेल्या अनेक गोष्टींवर भाष्य केले. तसेही माध्यमांनी सध्या पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळणे सुरु केले आहे. शरद पवार म्हणाले की, प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी पुन्हा येईन, यामध्ये फडणवीसांचा 'मी'पणा जाणवतो. पवार साहेब तुमची सुद्धा भाषणे आणि हातवारे जनतेने ऐकली आहेत आणि पाहिली आहेत. एका परिपक्व , धुरंधर , चाणक्य म्हणवल्या जाणा-या
नेत्याला असे हातवारे करणे कुठे शोभले होते ? चाणक्य हे बिरूद आपणास आपले तथाकथीत
स्तुतीपाठक लावत असतात. वास्तविक पाहता चाणक्याने जे काही केले ते राष्ट्रासाठी केले आपले सर्व जीवन त्याने केवळ देशाच्या
हितासाठी वाहिले. तुम्ही परीवारातील लोकांना
राजकारणात पुढे आणले. लोकांचा असा पाठिंबा
मिळाल्यानंतर आपण
पक्षवाढीसाठी काम करायचं
असतं. असे आपण फडणवीसांना म्हटले. परंतू आपल्या राष्ट्रीय
पक्ष असलेल्या पक्षाची महाराष्ट्र वगळता देशात काय अवस्था आहे ? फडणवीसांच्या भाषणांत त्यांनी केलेल्या
वक्तव्यांमध्ये तुम्हाला 'मी'पणाचा
दर्प जाणवतो. परंतू आपले पुतणे अजित
पवार यांचे एका आमदाराला उद्देशून “तू कसा निवडून येतो” असे म्हणणे ,
सुप्रिया सुळे
यांचे “ मी दस
नंबरी नागीण आहे” ही अशी
वक्तव्ये तुम्हाला काय वाटते जनता विसरली असेल? आणि या वाक्यात कोणता दर्प होता ? असा प्रश्न सुध्दा जनतेला पडला आहे. तुम्ही
म्हणता महाराष्ट्रातील जनतेला हे आवडत नाही, त्यांना 'मी'पणा
आवडत नाही. त्यांना
विनम्रता आवडते. पवार साहेब फडणवीसांची
विनम्रता जनतेला चांगली ठावूक आहे. फडणवीस कोणत्या विचारधारेतून आले आहे
तुम्हाला ठाऊक आहे. त्यांना तुम्ही विनम्रतेचे धडे देण्याची गरज नाही. तुम्ही
म्हणता फडणवीस
पाच वर्ष मुख्यमंत्री होते, परंतु राज्याच्या राजकारणात त्यांना मोठं स्थान
निर्माण करता आलं
नाही. ते अजून तिथेच आहेत. तुम्ही
इतकी वर्षे महाराष्ट्रात राजकारणाच्या केंद्रस्थानी
होता , केंद्र
सरकार मध्ये होता. बारामती वगळता तुम्ही
महाराष्ट्राला कुठे प्रगतीशील केले.
फडणवीस तर फक्त पाचच वर्षे होते. तरीही त्यांनी शेतात विद्युत पुरवठा मागितल्या बरोबर सुरू केला होता , जलयुक्त शिवार योजना राबवली होती तसेच इतरही विकासाभिमुख योजना
प्रभावीपणे ते राबवत होते. मराठा मोर्चा , भीमा कोरेगांव सारखे प्रश्न चांगल्या पद्धतीने
हाताळले. नवीन सिंचन प्रकल्प ,
रस्ते , महाराष्ट्रात
उद्योगधंदे आणण्यासाठी केलेले प्रयत्न ही सर्व कार्ये जनतेला चांगली ठावूक आहेत. तुम्ही
म्हणता फडणवीस यांच्यावर भाजपचे
राज्यातले दिल्लीतील नेते
नाराज आहेत. फडणवीस यांच्यावर कोण-कोण नाराज आहेत
हे पहाण्यापेक्षा तुम्ही अजित पवार नाराज आहेत की नाही? असल्यास का आहे हे पहा. जे नाराज आमदार अजित पवार
यांचेसह शपथविधीसाठी गेले होते ते का नाराज आहेत ते पहा. प्रत्यक्षात फडणवीस
यांच्यातील विकासाभिमुख, प्रामाणिक
, अभ्यासू
, निष्कलंक
, महाराष्ट्रासाठी
झटणारा राजकारणी हा महाविकास आघाडीच्या डोळ्यात खुपत होता आणि प्रामाणिक, सरळ माणसाला. दोष देण्यास
कुठेही जागा नसते आणि म्हणूनच त्यांच्यातील “जे आहे
ते आहे आणि जे नाही ते नाही”
अशा पद्धतीने कार्य करण्यात , “पुन्हा येईन” यातल्या आत्मविश्वासात
इतरांना मी पण दिसतो. परंतू फडणवीस हे मी पणाचा लवलेशही नसलेले नेते आहे हे
अभिनंदनाच्या भाषणांतून विशेषत: बच्चू कडू यांच्या भाषणातून महाराष्ट्रवासीयांना दिसून आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा