वासू - सपना

एका वर्षात प्रेम वगैरे सारं विसरून जातील हा हेतू असतो. अशा अटी वगैरै आताची शिघ्रकोपी पिढी स्विकारून प्रेमासाठी त्या पुर्ण करू शकतील का ? चित्रपटात वासू-सपना काही अपरीहार्य परीस्थितीत आत्महत्या करतात. त्यांच्या आत्महत्येचे कारण ते दोघेही अत्याचारामुळे मरणासन्न झालेले असतात हे असते, प्रेमातील अपयश नव्हे. हे येथे नमूद करणे जरूरी आहे कारण सद्यस्थितीत प्रेमात अपयश आल्याने काही विकृत कोणत्या थराला जात आहेत हे आपण पहातच आहोत.
वासू-सपनाच्या एक दुजे के लिये या सुपरहिट चित्रपटाची प्रेमकथा ही अशी होती. “जिसने हमे मिलाया, जिसने जुदा किया उस वक्त, उस घडी, उस डगर को सलाम“ अशी लता व एस.पी बालसुब्रमण्यमच्या आवाजातील सुमधुर गीते आणि संगीत अद्याप रसिकांच्या स्मरणात आहे. उद्या "व्हॅलेंटाईन डे" वासू-सपनाचे स्मरण झाले. प्रत्येक पिढीत वासू-सपना असतातच. परंतू आता किती बदल झाला आहे. प्रेमासाठी, प्रेम सिद्ध करण्यासाठी परीक्षा देणारे वासू-सपना या पिढीत आहेत का ? प्रेमाला नकार दिला तर अॅसिड हल्ला करणारे, हिंगणघाटच्या विकेश नगराळे सारखे पेट्रोल टाकून जाळणारे विकृत तरूण, चाकू हल्ला करणारे यांचे प्रेम खरेच प्रेम आहे का ? जिच्याप्रती तुमच्या मनात हळुवार अनुरागाची भावना आहे तीच्यावर अॅसिड, पेट्रोल टाकले तरी कसे जाते ? “हमे प्यार निभाना आता है” अशा भारतासारख्या देशात प्रेम दिवस साजरा करण्यासाठी एखाद्या विशिष्ट दिवसाची गरज आहे का ? मीरा, राधाच्या देशातील आपल्या तरुणांना प्रेम काय हे कळलेच नाही का? आज मुलांना सुद्धा धडे देण्याची, संस्कारांची गरज आहे. प्रेम यशस्वी होत नसेल तर त्या प्रेमाला
वो अफसाना जिसे अंजाम तक
लाना ना हो मुमकिन , उसे एक
खुबसुरत मोड देकर छोडना अच्छा
या वरील ओळींसारखी उदात्त प्रेमाची भावना आता जणू लोपच पावली. अॅसिड हल्ले करणा-या या तरुणांना त्यांच्या प्रेमाला “तू मेरी नही हो सकती तो किसी और की भी नही“ अशा शाहरुख टाईप प्रेमाला एक चांगला “खुबसुरत मोड” नाही का देता येणार का ? व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर तरुणांनी प्रेमाबाबत चिंतन करणे जरुरी आहे. प्रेम काय आहे तर “एक अहसास है ये रूह से मह्सुस करो” हे ध्यानात घ्यावे. प्रेमाच्या या जाणीवेला रूह अर्थात आत्म्यापासून जाणायला नको का ? प्रेमप्राप्ती करीता, ते ओरबाडून, हिसकावून घेण्याच्या विकृतीतून हल्ले करण्याऐवजी. प्रेमासाठी वासू-सपना सारखी परीक्षा द्यावी. जर प्रेमाला “अंजाम तक” नेणे शक्य नसेल तर निदान त्याला “खुबसुरत मोड” तरी तरुणांनी द्यावा. हीच व्हॅलेंटाईन डे अनुषंगाने सदिच्छा.


Khar aahe jyavar aapan prem karato tyana dukhi kase karata hech kalat nahi aani khamgaon madhe vasu sapana kon hote he mala pan mahiti nahi sundar lekh
उत्तर द्याहटवा