व्देषाची शिदोरी
शिदोरी म्हटले
की एका स्वच्छ कपड्यात आपल्या धन्यासाठी त्याच्या कारभारीणने प्रेमाने बनवलेली रुचकर
अशी भाकरी , झुणका , ठेचा, व
सोबतीला कांदा असे दृश्य डोळ्यासमोर येते. शिदोरी हा शब्द जरी खाण्यासंबंधी असला
तरी मुंबईतील एका मासिकाने शिदोरी हा शब्द त्यांच्या मासिकातील तथाकथीत विचारांकरीता वापरला आहे. त्यांच्या वाचकांसाठी या मासिकाव्दारे वैचारीक शिदोरी मिळेल असे त्यांना अभिप्रेत असावे. म्हणून मासिक
प्रकाशित करणा-यांचे विचार हे
जनसामान्यांपर्यन्त पोहचावेत म्हणून “जनसामान्यांची शिदोरी” असे या मासिकाचे नामकरण त्यांनी केले आहे. राजकीय पक्षाशी संबंधीत असल्याने हे मासिक ज्या जनसामान्यांच्या
विचारांसाठी काढले त्यांना मात्र फारच कमी प्रमाणात ठाऊक आहे. मागील आठवड्यात
मात्र हे मासिक एका वृत्तामुळे जनसामान्यांना ज्ञात झाले. हे वृत्त होते त्यातील
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर प्रकाशित केलेल्या लेखांमुळे. 'स्वातंत्र्यवीर नव्हे, माफीवीर' व 'अंधारातील सावकर' असे ते दोन लेख आहेत. सावरकर माफीवीर
वगैरे असा काही आशय असलेले ते दोन लेख “द वीक” आणि इतर आणखी एक मासिक यांचा आधार घेऊन
छापलेले आहेत. सावरकरांवर या लेखांत काय लिहिलेले आहे याची पुनरोक्ती सुद्धा येथे कराववीसी सुद्धा वाटत नाही इतके ते खालच्या स्तरावरचे व निराधार असे विचार आहेत. हे
मासिक प्रकाशन करणारे व संपादक मंडळ हे सुज्ञच असतील ही अपेक्षा. परंतू त्यांची सुज्ञता ते व्देषमूलक विचार पसरविण्यात खर्ची घालत आहेत. हल्ली जो उठला तो सावरकर यांच्या
विरोधात गरळ ओकतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर वगैरे म्हणून त्यांची निर्भत्सना
करणा-या कंपूला जनता चांगलीच ओळखून आहे त्या कंपूची बौद्धिक कुवत सुद्धा चांगलीच ठाऊक
आहे व वेळोवेळी ती प्रकट सुद्धा होत असते. सावरकर हे कसे होते , त्यांची जाज्वल्य देशभक्ती , त्यांच्या कुटुंबीयांचा
त्याग, त्यांची साहित्य संपदा , चीनचा संभाव्य हल्ला ओळखण्यासारखी त्यांची दूरदृष्टी इ. गुण या कंपूच्या एकाही नेत्याकडे नव्हते आणि
यांच्या सद्यस्थितीतील नेत्यात तर नाहीच नाही. मग करणार
तरी काय ? तर दे सावरकरांना शिव्या ,कर त्यांचा अपमान , पूसा त्यांच्या काव्यपंक्ती , शाळा , कार्यालयातून काढ त्यांचे फोटो , पाठयक्रमात लिह त्यांच्या विरोधात काही. असे उपद्व्याप हा कंपू करीत असतो. यांच्या हे सुद्धा लक्षात येत नाही की हे असे केल्याने आपण आपल्याच पायावर कु-हाड मारून घेत आहोत. आज या कंपूची दयनीय परीस्थिती उभा भारत पाहत आहे तरीही यांना अद्यापही निव्वळ आणि निव्वळ सावरकरच दिसतात. ज्याप्रमाणे स्वराज्याच्या शत्रूच्या घोड्यांना पाण्यात संताजी , धनाजी दिसत त्याचप्रमाणे या कंपूला आजही जळी , स्थळी ,काष्ठी, पाषाणी स्वातंत्र्यवीर सावरकरच दिसतात. म्हणून हे अशी व्देष भावना ठेवतात व ती प्रसारीत करतात. वास्तविक पाहता वर्तमानपत्रे, मासिके यांनी सकारात्मक अशा बाबी छापणे अपेक्षित असते. हे जनसामान्यांची शिदोरी या मासिकाच्या ज्ञानी, अभ्यासू संपादकांना कळत नाही का? ते तरी काय करणार म्हणा त्यांच्या हाय कमांडची खप्पामर्जी कोण ओढवून घेणार ? या देशातील जनतेला इतिहास चांगला ठाऊक आहे तुम्ही जनसामान्यांची म्हणून जी द्वेषाची शिदोरी त्यांना देण्याचा प्रयत्न करीत आहात ती सावरकर द्वेषाची शिदोरी त्यांना नको. ती देण्याचा तुम्ही जेवढा प्रयत्न कराल तेवढे तुम्ही खोलात जाल शिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करणा-यांना व आता मूग गिळून बसणा-यांना सुद्धा आगामी काळात सावरकरांचा हा अपमान मूकपणे बघत बसल्याने चांगलेच महाग पडेल हे लक्षात घ्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा