प्यारसे भी जरुरी कई काम है

“एक राधा एक मीरा ,
दोनो ने कृष्ण को चाहा
अंतर क्या दोनो की चाहमे बोलो
एक प्रेम दिवानी , एक दरस दिवानी”
याप्रमाणे कृष्णावर प्रेम करणा-या राधा व मीरा. असे प्रेमाबाबतचे कितीतरी दाखले या देशात मिळतात. दुष्यंत-शकुंतला, सोहनी-महिवाल, हिर–रांझा या प्रेमी युगलांच्या अजरामर प्रेमाच्या कथा सुद्धा आहेतच. परंतू या उदात्त, निसिम्म प्रेमाची, प्रेमातील त्यागाची संस्कृती असलेल्या या भारत देशात हल्ली मात्र प्रेम तेवढे पवित्र आहे की नाही हे सांगता येणे कठीण आहे. मुलींवर होणारे हल्ले, प्रेमविवाह करूनही अल्पावधीत होणारे घटस्फोट हे काय दर्शवतात. जीच्यावर प्रेम आहे तिच्यावरच तो हल्ला करतो. तर ज्याच्यावर प्रेम आहे त्याचे आप्तस्वकीय तिला नकोसे वाटतात.
प्रेमाच्या बाबतीत बोलायचे, लिहायचे म्हटले तर तो अनंत असा विषय आहे. जगात प्रेमच सर्व काही आहे काय ? हा सुद्धा एक प्रश्न आहे. "मै तो भूल चली बाबूल का देस", " चंदनसा बदन" अशी एकापेक्षा एक सरस गीते असणा-या सरस्वतीचंद्र या जुन्या चित्रपटात “छोड दे सारी दुनिया किसीके लिये” हे सुद्धा जीवनात केवळ प्रेम हेच काही जरूरी नाही असे सांगणारे एक सुंदर गीत आहे. हे गीत हाच प्रश्न अधोरेखित करते. आजच्या पिढीला, त्यातही विकृत मानसिकता असलेल्या तरुणांना प्रेम हेच सर्वात जास्त जरुरी वाटत आहे आणि त्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ पहात आहेत. परंतू या जगात प्रेमापेक्षाही खूप जरुरीची अशी कार्ये असतात. सरस्वतीचंद्र चित्रपटातील नायिकेला, नुतनला तिच्या इच्छित तरूणासह विवाह करता येत नाही आणि म्हणून तो तरुण व्यथीत होऊन हे जग सोडून जाण्याचे ठरवतो या पार्श्वभूमीवर “छोड दे सारी दुनिया किसी के लिये, ये मुनासिब नही आदमीके लिये” हे सुंदर, श्रवणीय, एखाद्याला मरणाच्या वाटेपासून दूर नेण्यास प्रवृत्त करणारे गीत लताच्या आवाजात अभिनेत्री नुतन गाते आणि रसिकांना प्रेमाचा नवीन अर्थ, प्रेम कसे असावे हे अधिक चांगल्याप्रकारे कळते.
“कहां चला ऐ मेरे जोगी, जीवनसे तू भागके ,
किसी एक दिलके कारण ये दुनिया त्यागके
या गीताच्या आरंभीच गीताचा आशय कळतो. प्रेमाचे तत्वज्ञान प्रकट करतांना गीतकार इंदिवरने खूप सुंदर शब्दांची गुंफण केली आहे.
खुशबू आती रही दूरहीसे तो क्या, सामने हो चमन कोई कम तो नही
एक दुनिया उजडही गयी है तो क्या , दुसरा तुम जहां क्यूं बसाते नही
या ओळींतून प्रेमभंग झाल्यावरही नायिका आपल्या नायकास जीवन जगण्याची प्रेरणा देऊन जाते. “तनसे तनका मिलन हो ना पाया तो क्या मनसे मन का मिलन कोई कम तो नही” यातून निर्मळ, उदात्त प्रेमाची भावना गीतकार व्यक्त करतो. परंतू आता असे प्रेम आहे का ? खरोखरच्या जीवनातील त्यातही हल्लीच्या पिढीतील नायक, नायिका यांची प्रेम भावना अशीच असते का ? आता प्रेमप्राप्ती झाली नाही तर अतिशय टोकाची भूमिका घेऊन स्वत:चे व दुस-याचे जीवन उध्वस्त करणा-या तरुण पीढीने व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर प्रेम निट समजून घ्यावे , वाचन करावे, जुनी आशयघन अशी गाणी , कविता वाचाव्यात . जीवनात प्रेम हेच काही फक्त एकमेव कार्य नाही तर "प्यारसे भी जरुरी कई काम है" याबाबत जरूर विचार करावा.
गाणे नक्की ऐका ->
https://www.youtube.com/watch?v=FFW6dBHPcTo&list=RDFFW6dBHPcTo&start_radio=1
गाणे नक्की ऐका ->
https://www.youtube.com/watch?v=FFW6dBHPcTo&list=RDFFW6dBHPcTo&start_radio=1
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा