ट्रॅजेडी किंगचा अंत
आज आपण पाहतो दोन-दोन घटस्फोट देणारे अभिनेते याच चित्रपटसृष्टीत आहे. त्या घटस्फोटाचे ते समर्थन पण मोठ्या खुबीने करतात. चित्रपटातील हे अभिनेते, छोट्या छोट्या मुद्द्यां वरून वेगळे होणारे समाजातील कित्येक नवविवाहीत यांनी दिलीपकुमार-सायरा यांच्या प्रेमाचा, इतकी वर्षे प्रेमाने एकत्र राहण्याचा , संसार करण्याचा आदर्श जरूर घ्यावा.
त्याचे कृष्ण धवल चित्रपट पाहणारे अनेक लोक सुद्धा आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. परंतू 1980- 90 च्या दशकात आलेल्या त्याच्या शक्ती, कर्मा, मशाल , विधाता , इज्जतदार, कानून अपना अपना अशा चित्रपटांमुळे आता चाळीसी-पन्नाशीत असणा-यांना मात्र तो नक्कीच आठवतो. नवीन पिढीला मात्र कदाचित तो तितकासा माहित नसावा. त्याच्या प्रकृती बाबतच्या वृत्तांमुळे एक जुना अभिनेता एवढीच काय ती नवीन पिढीशी त्याची ओळख असू शकते. आजच्या चाळीसी-पन्नाशीतील अनेकांनी त्याचे जुने चित्रपट सुद्धा पाहिलेच असतील कारण या लोकांनी केवळ एकच वाहिनी असलेला दूरदर्शनचा जमाना तसेच टॉकीजमध्ये जुने चित्रपट पुनर्प्रदर्शित होण्याचा जमाना पाहिला आहे. बालपणी मी एके वर्षी 15 ऑगष्ट ला दूरदर्शनवर “ ये देश है वीर जवानो का” ही गाणे जेंव्हा पाहिले तेंव्हा दिलीपकुमार हे नांव माहित झाले. पुढे त्याचे काही चित्रपट सुद्धा पाहिले. “अपनी आजादी को हम हरगीज मिटा सकते नही” , “साथी हाथ बढाना , एक अकेला थक जायेगा” अशी रफीच्या आवाजातील त्याची देशभक्तीपर गीते ऐकल्यावर , पुढे शोलेतील ठाकूर प्रमाणे दुर्जनांचा नाश करण्यासाठी तरुणांना हाताशी घेऊन लढा पुकारणारा कर्मा तील त्याचा ठाकूर विश्वप्रतापसिंग , मशाल मधील अन्यायाविरुद्ध लढा पुकारणारा पत्रकार, आपल्या गुन्हेगार मुलाला वठणीवर आणण्यासाठी प्रयत्नशील असा शक्ती मध्ये अमिताभच्या पित्याची भूमिका करणारा पोलीस अधिकारी अशा नानाविध भूमिका साकारणारा दिलीपकुमार त्याचा अभिनय पाहिल्यावर आवडू लागला होता. सुरुवातीला हॉटेलच्या व्यवसायात वडीलांना मदत करणा-या मो. युसुफ खान यांस बॉम्बे टॉकीजच्या देविकाराणी या जुन्या अभिनेत्रीने अभिनेता बनण्यास प्रेरणा दिली व दिलीपकुमार हे नांव दिले. कृष्ण धवल जमान्यात त्याने अनेक हिट चित्रपट दिले. सतत दु:खी भूमिका साकारल्यामुळे तो काही काळ नैराश्याने ग्रासला होता. म्हणून पुढे त्याने मानसिक रोग तज्ञांंच्या सल्ल्यानुसार कोहिनूर, राम और श्याम सारख्या काही चित्रपटात विनोदी भूमिका केल्या.
90 च्या दशकात त्याला पाकीस्तानने “निशान- ए – इम्तीयाज” हा पुरस्कार दिल्यावर व त्याने पाकीस्तानातील इस्पितळास मदत केल्याची चर्चा यांमुळे त्याला बरीच टीका सहन करावी लागली होती. त्याने पुरस्कार परत करण्याचे सुद्धा ठरवले होते. परंतू भारत-पाक संबंधासाठी त्याला काही राजकीय मंडळीनी तसे करण्यापासून रोखले होते. मुंबई मधील बांद्रा येथील अनेक सुधारणा या दिलीपकुमारच्या पाठपुराव्यामुळे झाल्या आहेत. दिलीपकुमारमुळे धर्मेंद्र , मनोजकुमार सारख्या अभिनेत्यांना चित्रपटात येण्याची प्रेरणा मिळाली होती. अभिनयाचा बादशहा असलेल्या दिलीपकुमारची सरळ-सरळ नक्कल करून आज अनेक नट किंग, बादशहा अशी बिरुदावली मिरवतात.
दिलीपकुमारचे चित्रपट , त्याचा अभिनय , दादासाहेब फाळके पुरस्कार , त्याचा सुरुवातीच्या काळातील संघर्ष या सर्व बाबी व त्याची चर्चा तर होईलच परंतू नवीन पिढीने दिलीपकुमार व सायराबानू या दाम्पत्यामध्ये असलेल्या प्रेमाचा आदर्श मात्र घेणे रास्त होईल. दिलीपकुमार व त्याची काळजी घेणारी त्याची पत्नी ही दृश्ये सर्वानी पाहिली आहेत. सायराबानूच्या सेवेमुळे दिलीपकुमारने नव्वदी पार केली होती. आज आपण पाहतो दोन-दोन घटस्फोट देणारे अभिनेते याच चित्रपटसृष्टीत आहे. त्या घटस्फोटाचे ते समर्थन पण मोठ्या खुबीने करतात. चित्रपटातील हे अभिनेते, छोट्या-छोट्या मुद्द्यांवरून वेगळे होणारे समाजातील कित्येक नवविवाहीत यांनी दिलीपकुमार-सायरा यांच्या प्रेमाचा, इतकी वर्षे प्रेमाने एकत्र राहण्याचा , संसार करण्याचा आदर्श जरूर घ्यावा.
आज या ट्रॅजेडी किंगचा अंत झाला, त्याला सुपूर्द ए खाक केले जाईल. "राजा हो या रंक सभी का अंत एकसा होयी" (👈 click to listen song) ही त्याच्याच गाण्यातील ओळ अंताचे भान ठेवून जीवन व्यतीत करायला हवे असे सांगून जाते.
#ट्रॅजेडी_किंगचा_अंत
अप्रतिम लिखाण
उत्तर द्याहटवासुरेख
उत्तर द्याहटवा🙏
हटवाKhup Sundar
उत्तर द्याहटवा🙏
हटवा