Click "Follow" Button below To Follow this Blog

२८/०३/२०२२

Article about two different opinions about The Kashmir Files Movie

काश्मिर फाईल्स , मते मतांतरे  

विधानसभा , लोकसभा या सभागृहात झोपणारे काही महाभाग नेते सुद्धा आपल्याकडे आहेतच , आपले एक माजी पंतप्रधान सुद्धा कित्येकदा डुलक्या मारायचे. ज्यांच्या हाती देशाचा , राज्याचा कारभार जनतेने दिला असतो, असे असतांना त्यांना सुद्धा कशी काय झोप लागते ? मुळात पैसे खर्चून जो व्यक्ती चित्रपट पहायला जातो तो काय चित्रपटगृहात झोपण्यासाठी ? कश्मीरबाबतचे वास्तव चित्रण, काश्मिरी पंडीतांकडे तत्कालीन सत्ताधा-यांनी केलेले अक्षम्य दुर्लक्ष याचे वास्तव या चित्रपटात दाखवल्याने आपल्या देशातील वोट बँक सांभाळण्यासाठी लांगूलचालन करणा-या राजकारण्यांची झोप उडाली आहे हे मात्र निश्चित म्हणूनच ते अशी विधाने करीत आहेत.

काश्मिर फाईल्स हा वास्तववादी चित्रपट सध्या चर्चेत आहे. काश्मिर मध्ये 1990 मध्ये काश्मिरी पंडीतांवर झालेल्या अत्याचारास , त्यांच्यावर आलेल्या अनेक आपत्तींचे , अमानुष वागणूकीचे वास्तववादी चित्रण विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. या चित्रपटाबाबत अनेक लेख लिहिल्या गेले. अनेक विचार प्रकट होत आहेत. तमाम सच्च्या राष्ट्रप्रेमी जनतेच्या पसंतीस हा चित्रपट उतरला असतांना व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणे विविध लोक त्यांच्या-त्यांच्या सोयीनुसार,  वैयक्तिक, राजकीय भुमिकेमुळे  विविध स्वरूपाची मते व्यक्त करीत आहेत. तसेच हा चित्रपट, याला होणारी जनतेची गर्दी, चित्रपटाने आज पर्यन्त केलेली 200 कोटींपेक्षाही जास्त कमाई , हे सर्व अनेकांना का कोण जाणे खुपत आहे. अशाच वाचनात आलेल्या दोन मतांबाबत.  

मत क्र. 1 -  "काश्मीर  फाईल्स चित्रपट पाहतांना मध्यंतरानंतर माणूस झोपी जातो, फुकट शो ठेवले तरी तरुण हा चित्रपट पाहण्यास जात नाही." हे पहिले मत सत्ताधारी मविआच्या एका आमदार महोदयांनी व्यक्त केलेले मत  आहे. प्रथम या मताविषयी. या मतानुसार, "चित्रपट पाहतांना मध्यंतरानंतर माणूस झोपी जातो" असे जे म्हटले आहे त्यात काही तथ्य वाटत नाही. आता सिनेमागृहात कोण झोपी गेले आहे, व कोण चित्रपट पाहत आहे हे सिनेमागृहात प्रत्येकाच्या जवळ जाऊन पाहिल्यावरच लक्षात येईल, अशी पाहणी कुणी केली आहे का ?  मी स्वत: हा चित्रपट पाहण्यास गेलो असता माझ्या मागील,पुढील,शेजारील सिटवरील कुणीही मला झोपलेले आढळून आले नाही तर काश्मिरी पंडीतांवर होत असलेले अत्याचार पाहून हुंदके व उसासे मात्र ऐकू येत होते. हा चित्रपट पाहतांना कुणालाच झोप सुद्धा लागणे तर सोडा उलट झोप उडेल असे प्रसंग यात चितारले आहे,  पण चित्रपटागृहात कुणी झोपल्याचे जाऊ द्या, आपल्या विधानसभा, लोकसभा या सभागृहात झोपणारे काही महाभाग नेते सुद्धा आपल्याकडे आहेतच , आपले एक माजी पंतप्रधान सुद्धा कित्येकदा डुलक्या मारायचे. ज्यांच्या हाती देशाचा , राज्याचा कारभार जनतेने दिला असतो, असे असतांना त्यांना सभागृहात झोप लागते तरी कशी ? तसेच उपरोक्त विधानात "फुकट शो ठेवले तरी तरुण हा चित्रपट पाहण्यास जात नाही",  असे म्हटले आहे आता याची पडताळणी खरोखर फुकट शो  ठेऊनच करावी लागेल तेंव्हा विधानकर्त्यांने असा एखादा शो आयोजित करून पहावा तेंव्हाच हे विधान खरे आहे की नाही याची पडताळणी होईल असे वाटते. मुळात पैसे खर्चून जो व्यक्ती चित्रपट पहायला जातो तो काय चित्रपटगृहात झोपण्यासाठी ? वोट बँक केन्द्रित राजकारण जे करतात, त्यांना आपली वोट बँक नाराज न व्हावी यासाठी तसेच कश्मीरबाबतचे वास्तव चित्रण, काश्मिरी पंडीतांकडे तत्कालीन सत्ताधा-यांनी केलेले अक्षम्य दुर्लक्ष याचे वास्तव या चित्रपटात दाखवल्याने आपल्या देशातील वोट बँक सांभाळण्यासठी लांगूलचालन करणा-या राजकारण्यांची झोप उडाली आहे हे निश्चित म्हणूनच ते अशी विधाने करीत आहेत.

मत क्र. 2 -  या चित्रपटात पोलिस अधिका-याची भूमिका वठविणा-या पुनित इस्सर या कलाकाराचे हे दुसरे मत आहे. नागपूर मध्ये द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे खेळ माजी महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकाराने नि:शुल्क दाखवण्यात येत आहे व त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. म्हणजेच पहिल्या मताचे अर्थात "फुकट शो ठेवले तरी तरुण हा चित्रपट पाहण्यास जात नाही" याचे इथेच खंडन होते. नागपूर मध्ये  काश्मीर फाईल्स च्या नि:शुल्क शो ला भरभरून प्रतिसाद मिळत आहे त्यासाठी पुनित इस्सर नागपूरला आले होते. "काश्मीर मध्ये झालेल्या नरसंहाराचा कधी कुण्या चित्रपटातून साधा उल्लेखही झाला नाही, हृदयाला स्पर्श करणारे चित्रपट मोजके असतात, हा चित्रपट हृदयाला स्पर्श करणारा आहे, चित्रपट बनवण्यास 5 वर्षे लागली, 750 हून अधिक मुलाखती घेण्यात आल्या, चित्रपटात गाणी नाही, मसाला  नाही तरीही हा चित्रपट विक्रम प्रस्थापित करीत आहे " असे पुनित इस्सर यांचे मत आहे. उपरोक्त दोन मते ही परस्परविरोधी मते आहेत.

 दुस-या मताबाबत कुणी असेही म्हणेल की पुनित इस्सर यांनी चित्रपटात भूमिका केली आहे ते चित्रपटाच्या बाजूनेच बोलणारच. पण तरीही त्या बोलण्यातून वास्तवता प्रतीत होते.

 तर पहिल्या मतातून मात्र आपल्याच देशातील जनतेवर झालेल्या अत्याचारास प्रकट करणा-या चित्रपटास  स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी, राजकीय भुमिकेसाठी अयशस्वी चित्रपट असल्याचे दाखवणे यातून काश्मिरी हिंदुंबाबतची अनास्थाच दिसून आली आहे. 

अशी ही दोन्ही मते असली तरी कुणाचे काहीही मत असो , कुणी काहीही बरळत असो हा चित्रपट मात्र जनता जनार्दनाच्या पसंतीस  उतरल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

७ टिप्पण्या:

  1. Khup chhan lekh lihala aani satya pareshan hote pan parajit hot nahi te ej divashi purnrupane jagasamor yetech yete aani ha chitrapat tyachech pratik aahe

    उत्तर द्याहटवा
  2. रविवारी हा चित्रपट बघियला...मध्यंतरला माझ्या समोरच्या भागात बसलेल्या माणसाने शीतपेय आणले. मात्र मध्यंतरानंतर काश्मिरी हिंदूंचे जेवणाचे होणारे हाल आणि नंतर होणारे अत्याचार बघता बघता तो माणूस ते शीतपेय प्यायचे विसरला, चित्रपट संपल्यावर ते शीतपेय तिथेच सोडून निघाला...कदाचित त्याची खाण्यापिण्याची इच्छाच संपून गेली....ज्यांना हा चित्रपट बघतांना झोप येत असेल त्यांचा माणुसकी नावाचा अवयव कामातून गेला आहे हे समजायचे

    उत्तर द्याहटवा
  3. रविवारी हा चित्रपट बघियला...मध्यंतरला माझ्या समोरच्या भागात बसलेल्या माणसाने शीतपेय आणले. मात्र मध्यंतरानंतर काश्मिरी हिंदूंचे जेवणाचे होणारे हाल आणि नंतर होणारे अत्याचार बघता बघता तो माणूस ते शीतपेय प्यायचे विसरला, चित्रपट संपल्यावर ते शीतपेय तिथेच सोडून निघाला...कदाचित त्याची खाण्यापिण्याची इच्छाच संपून गेली....ज्यांना हा चित्रपट बघतांना झोप येत असेल त्यांचा माणुसकी नावाचा अवयव कामातून गेला आहे हे समजायचे

    उत्तर द्याहटवा