इनको देश की क्या पडेली है ?
मी त्याच विचारात मार्गक्रमण करत होतो बाजूला रस्त्यावर विक्रीसाठी स्टडी टेबल , लाकडी खेळणे विक्रीस आलेले लोक होते, त्यांची उघडी नागडी बालके खेळत होती , रस्त्यावरच चूल पेटली होती, पोटाची खळगी भरण्यासाठी ते पर राज्यातून आले होते. अल्पसा का होईना देशाच्या अर्थव्यवस्थेत हातभार लावत होते. त्यांना, त्यांच्या लहानग्या मुलांना पाहून, त्यांची हलाखीची स्थिती पाहून त्या चौथ्या तरुणानी म्हटलेले, "राजनीतीवाले ये लोग अपने स्वार्थ के लिये राजनीती मे आते है, इनको देश की क्या पडेली है ?" हे वाक्य मला पुन्हा-पुन्हा आठवत होते.
एक दिवस मी पायी फिरण्यासाठी म्हणून निघालो. माझ्यासमोर काही महाविद्यालयीन तरुण चालत होते. त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. त्या गप्पांमध्ये युक्रेन , महाराष्ट्र सरकार , केंद्र सरकार या विषयी चर्चा सुरू होत्या. एक म्हणाला अबे वो एडिटर था, कौन है बे वो ? , दुसरा त्वरीत उत्तरला वो दिल्ली मे है उस की बात कर रहा न तू , अरे हां न यार दिन निकला की शुरू हो जाता न बे वो , उसको चुनके दिया तो विधायक लोगो के जो काम है वो करता होगा की नाही कुछ ? त्यावर तिसरा तरुण म्हणाला अबे सभी पार्टी के लोग पिछले महीनेसे बस एक के पिछे एक प्रेस कॉन्फरन्स ले रहे है, और बस एक दुसरे पे इल्जाम लगाना शुरू है | लोग इनको जिस काम के लिये चुनके देते वो ये भूल जाते और देश का काम करने की बजाय ये आपना ज्यादा समय तो एक दुसरे के घोटाले निकालने मे और प्रेस कॉन्फरन्स लेनेमे ही बिताते बटे ! त्यावर चौथा म्हणाला अबे छोडो न बे इन लोगो की बाते, ये तो चुनके आने के बाद खुद का और खुद के परीवार का फायदा कर लेते है, जनता गयी .....| राजनीती वाले ये लोग अपने स्वार्थ के लिये राजनीती मे आते है, इनको देश की क्या पडेली है ?
या संवादानंतर ते तरुण वेगळ्या दिशेने पुढे गेले. पण त्यांच्या राजकारणाबाबतच्या निराशापुर्ण व वास्तववादी गप्पा मात्र मला विचारात पाडून गेल्या. सध्याचे राजकारण, लोकप्रतिनिधी यांच्याविषयीचे जनतेचे मत हे आता खरेच अतिशय खराब झाले आहे. स्वार्थासाठी काहीही करणे, निवडून आल्यावर विधानसभेत खोटी कागदपत्रे सादर करणे, कर्मचा-यांना मारहाण करणे, सत्ता हाती आल्यावर कायद्याच्या रक्षकांना हाताशी धरून गैर कायदेशीर कृत्ये करणे, देशद्रोहयांशी हातमिळवणी करणे, दोन/तीन लग्ने करणे, तरुणींना त्यांना आत्महत्येस भाग पडावे असे फसवणे, देश कार्य, विकास सोडून एकमेकांना कसे अडकवता येईल या बाबत नाना क्लृप्त्या शोधणे त्यासाठी सरकारी यंत्रणा दावणीस बांधणे असे सांप्रत कालीन व पुर्वीचे आणखी कितीतरी दाखले देता येतील. अर्थात सर्वच राजकारणी लोक सारखेच असतील असेही नाही काही अपवाद नक्कीच आहे. पण ती संख्या अगदीच नगण्य. भारतीय लोकप्रतिनिधींना सकारात्मक, विकास केंद्रीत असे राजकारण करताच येत नाही का ? करायचेच नाही का ? त्यांना याबाबत कुणी सल्ला वगैरे देते की नाही ? त्यांच्यावर होणारे आरोप, त्यांचे घोटाळे हे पाहून त्यांच्या कुटुंबीयांना काय वाटते ? अशा प्रश्नांची उत्तरे जनतेला कधी मिळू शकतात का ? सतत पुर्वी होऊन गेलेले राजे , महापुरुष यांची निव्वळ नांवे घेऊन, जनतेला त्यांच्या आदर्श गोष्टी सांगून जनतेची दिशाभूल करणे, जनतेतील जातीभेदास खतपाणी घालणे व ज्या महापुरुषांची नांवे हे घेतात त्या महापुरुषांनी घालून दिलेल्या आदर्शाच्या अगदी विरुद्ध असे आचरण करणे, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांची पायमल्ली करणे अशी या लोकप्रतिनिधींची त-हा असते. कालच्या राज ठाकरे यांच्या 2 एप्रिल 2022 च्या भाषणाचा ट्रेलर असलेल्या भाषणात त्यांनी जे सध्याच्या राजकारणा बाबत भाष्य केले त्यात खरोखर तथ्य आहे. त्यांनी, "आताच्या मुलांना हल्लीचे राजकारण हे सध्या सुरू आहे असेच असेल असे वाटत असावे" असे जे म्हटले त्याचीच प्रचिती मला त्या दिवशी त्या तरुण मुलांच्या ऐकलेल्या गप्पांमधून पुर्वीच आली होती. निव्वळ उचलली जिभ लावली टाळूला सारखी नसता वाद निर्माण करणारी भाष्ये करायची व नवीन वाद निर्माण करायचा, व मिडीया तेच-तेच दाखवून लोकांचे डोके खराब करतो. सभागृहात विकास, नवीन ठराव आदींवर चर्चा होण्याऐवजी भलत्याच गोष्टींवर खडाजंगी होत राहते. याला कधी आळा बसणार ? कसा बसणार ? सत्तेसाठी विचारसरणी सोडून एकत्र यायचे आणि सत्तेव्दारे मग स्वत:चा , कुटुंबियाचा कसा लाभ होईल हेच बघत राहायचे. सध्याच्या राजकारणातून राष्ट्र केन्द्रित राजनीती हद्दपार झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. नेत्यांना त्यांनी घेतलेल्या प्रतिज्ञेचा ताबडतोब विसर पडतो , माझे राष्ट्र विकसित करण्यासाठी मला लोकांनी निवडून दिले आहे याचे भान तो सत्ताप्राप्ती नंतर विसरतो, सत्ता मग राष्ट्राऐवजी स्व केंद्रित होते व स्वत:चा फायदा तेवढा पाहिला जातो , देशाचे कुणाला काय पडले आहे ? त्या तरुणांचे राजकारणाविषयीचे, सध्याच्या लोकप्रतिनिधींबाबतचे ते संभाषण उद्विग्नतेचे होते, तरुण पिढी सांप्रत राजकारण व लोकप्रतिनिधी यांचे बाबत किती निराश आहे हे व्यक्त करणारे होते. मी त्याच विचारात मार्गक्रमण करत होतो. बाजूला रस्त्यावर विक्रीसाठी स्टडी टेबल, लाकडी खेळणी विक्री करण्यास आलेले लोक होते, त्यांची उघडी नागडी बालके खेळत होती, रस्त्यावरच त्यांची चूल पेटली होती, पोटाची खळगी भरण्यासाठी ते पर राज्यातून आले होते. अल्पसा का होईना देशाच्या अर्थव्यवस्थेत हातभार लावत होते. त्यांना, त्यांच्या लहानग्या मुलांना पाहून, त्यांची हलाखीची स्थिती पाहून त्या चौथ्या तरुणानी म्हटलेले, "राजनीतीवाले ये लोग अपने स्वार्थ के लिये राजनीती मे आते है, इनको देश की क्या पडेली है ?" हे वाक्य मला पुन्हा-पुन्हा आठवत होते,
खरेच आहे.गरिबांच्या मतांवरच तर हे निवडून येतात आणि त्या गरीब लोकांना मात्र विसरल्या जाते
उत्तर द्याहटवा👍
हटवा