मुलायम तरीही कठोर
रविना टंडनने पुरस्कार समितीला अशी कोणती "अंखियोसे गोली मारली" कुणास ठाऊक परंतू तिची पद्मश्रीसाठी वर्णी लागली. रविना टंडन एक व्यवसायिक नटी आहे. कला क्षेत्रातून तीचे नांव आले असेल. एकवेळ रविना टंडनला पुरस्कार देण्यास काही हरकत नाही परंतू मुलायमसिंग यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्याने मात्र जनतेत रोष व नाराजीच आहे.
मोदी सरकार 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर ज्या व्यक्तींना पद्म पुरस्कार दिले गेले त्यांची निवड अतिशय योग्य होती. जादव पाएंग - 2015 , बीजमाता राहीबाई पोपरे – पद्मश्री 2020, 125 वर्षे वयाचे स्वामी शिवानंद – पद्मश्री 2022 , रघुनाथ माशेलकर – पद्मविभूषण 2014, बी. के. एस. अयंगार- पद्मविभूषण 2014, रामभद्राचार्य- पद्मविभूषण 2015. पद्मश्री व पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेल्यांपैकी अशी ही काही नांवे पाहून देशात आनंद व्यक्त झाला होता. दरवर्षी 1 मे ते 15 सप्टेंबरच्या या काळात पद्म पुरस्कारासाठी नामांकने केली जातात. या नांवातून पद्म पुरस्कार समिती अंतिम नावांची निवड करते. पंतप्रधान हे कॅबिनेट सचिव, गृह सचिव, राष्ट्रपतींचे सचिव आणि 4 ते 6 नामवंत असे मिळून पद्म पुरस्कार समितीची स्थापना दरवर्षी करीत असतात. ही समिती पुरस्कारांसाठीची नावं सुचवते. ही समिती काही नावं पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे सुपूर्द करते आणि अंतिम मंजुरी या दोघांकडून मिळते. या पद्धतीने हे पद्म पुरस्कार दिले जातात. परंतू यंदाची दोन नांवे पाहून मात्र समस्त भारतवासियांना झटकाच बसला. यातील पहिले नांव रविना टंडन व दुसरे पद्मविभूषण पुरस्कार मरणोपरांत मिळालेले मुलायमसिंग यादव हे नांव. एकवेळ रविना टंडनला पद्मश्री पुरस्कार भेटला तर त्यात तरी निदान काही वावगे वाटणार नाही. परंतू केंद्रातील भाजपा सरकारने अयोध्येत कारसेवकांचे रक्त सांडणाऱ्या मुलायमसिंग यादव यांचे नांव पद्मविभूषण पुरस्कारासाठी घोषित केल्यावर तर रविना टंडनच्या नावाच्या झटक्यापेक्षाही कित्येक पटीने अधिक जोरो का असा झटका मुलायमसिंग यांच्या नावाने देशवासीयांना लागला. मोदी व शहा हे आपल्या निर्णयांनी तसे झटके देण्याबाबत प्रसिद्ध आहेतच. 1990 मध्ये अनेक कारसेवकांवर निर्घुणपणे गोळ्या चालवण्याचे आदेश देणा-या मुलायमसिंग यादव यांना पद्मविभूषण पुरस्काराने सरकारने सन्मानित करणे म्हणजे एक मोठे आश्चर्य नव्हे तर त्या कारसेवकांच्या वंशजांवर व नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखेच झाले. नावात मुलायम असूनही शेकडो वर्षांच्या आक्रमकांच्या गुलामीच्या प्रतिकाच्या स्थानी आपल्या आराध्या करीता जाणा-या आपल्याच देशवासीयांवर गोळ्या घालण्याचा कठोर निर्णय मुलायम यांनी घेतला होता. त्या मुलायम यांना सन्मानित करण्याचा निर्णय हा सर्वांसाठीच मोठा धक्कादायक ठरला. राजकारणात एखादा निर्णय घेण्यामागे काय हेतू दडलेले असू शकतात याचा थांगपत्ता लागणे मोठे कठीण असते. काय दडले आहे याचा फक्त अंदाजच विश्लेषक लाऊ शकतात. काश्मीर मध्ये भाजपाने पीडीपी सोबत युती करणे हा सुद्धा एक असाच निर्णय होता पण पुढे हाच निर्णय 370 कलम हटवण्यास सहाय्यकारी झाला. नंतर भाजपाने पीडीपी युतीचा निर्णय कशासाठी घेतला गेला होता हे सर्वश्रुत झाले. आपल्या मनाचा थांगपत्ता सहसा लागू न देणा-या मोदींचा मुलायमसिंग यादव यांना भारतरत्न नंतर दुस-या क्रमांकाचा पद्मविभूषण हा पुरस्कार देण्याच्या निर्णयामागे काय राजकारण, काय हेतू असावा याचे अंदाज बांधण्यात सर्व गुंतले गेले. अनेकांचे असे म्हणणे आहे की भाजपा कडून अशा राजकारणाची अपेक्षा नाही. परंतू सर्वच पक्षात अशाच प्रकारचे राजकारण होत असते व अनेक राजकीय पक्षांचे त्यांच्या विचारसरणी विरोधी निर्णय घेतांना बरेचदा दिसून आले आहे. मुलायमसिंग यादव यांना मोदी सरकारने पद्मविभूषण दिल्यानंतर अनेकांनी विविध मते मतांतरे व्यक्त केली. सरकारच्या या निर्णयाचे आश्चर्य वाटणा-यांना रामनाम घेण्याचा अधिकार नाही असेही मत काहींनी नोंदवले. पण सरकारने एखादा निर्णय घेतला व त्यावर समान्यजनास आश्चर्य वाटले तर त्याच्या रामनाम घेण्यावर कुणी कसा काय आक्षेप घेऊ शकतो? ते तर प्रभूचे नांव आहे व ते सज्जन, दुर्जन कुणीही घेऊ शकतो. शिवाय सरकारच्या या मुलायमसिंग यादव यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करणा-या कृतीसारख्या कृतीवर कोट्यवधी लोक त्यांना ही कृती न आवडून ते काही जाहीर वाच्यताही करणार नाही तेंव्हा मग ते सुद्धा रामनाम घेण्याचे अधिकारी राहणार नाहीत का ? असो. काहींनी शिवाजी महाराजांचे सुद्धा दाखले दिले परंतू राजेशाहीतील राजाचे निर्णय घेणे व लोकशाहीतील महत्वाच्या नेत्यांनी निर्णय घेणे यात मोठा फरक आहे. सरकारचा हा निर्णय विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष, सरकार समर्थक यांच्यातील अनेकांच्या भूमिका उंचवणारा असाच आहे. "या टोपीखाली दडलंय काय, या मुकुटाखाली दडलंय काय ?" या ओळींप्रमाणे राजकीय निर्णयांचा अंदाज लावणे तितकेसे सोपे नसते. मुलायम यांनी सोनिया नांवास विरोध केल्याने अटलजींचा सत्तामार्ग सुकर झाला होता असेही सांगितले जाते, शिवाय आगामी काळात निवडणुका सुद्धा आहेत. इथे सरकारच्या या निर्णयाचे समर्थन मुळीच नाही. हा सन्मान प्राप्त व्हावा अशी अनेक नांवे आपल्या देशात आहे हे ही तितकेच खरे आहे. तत्कालीन राजकीय परिस्थितीत नावात मुलायम असूनही कारसेवकांवर गोळीबार करवण्याची मुलायमसिंग यांची कठोर कृती ही प्रभू रामचंद्रांच्या सेनेवर रावणाच्या राक्षसांनी शस्त्रे चालवण्याच्या कृतीसारखीच होती. जनता मुलायमसिंग यांची ही कृती अद्याप विसरली नसतांना त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवणे हे कुणालाच अजिबात आवडलेले नाही. मुलायमसिंग यांच्या ऐवजी बाळासाहेब ठाकरे यांना पद्मविभूषण देता आले असते असेही अनेकांनी म्हटले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार देण्याची जनतेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मनीषा आहे. लोककार्य या निकषातून पुरस्कार देण्यास अनेक नांवे असतांना मुलायमसिंग यांचे नांव येणे हे या सरकार कडून कुणालाच अपेक्षित नव्हते व बहुतांश जनांना ते रुचले सुद्धा नाही. रविना टंडन हिला सुद्धा कला क्षेत्रातून पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. परंतू जरी रविनाचे काही व्यावसायिक सिनेमे गाजले असले तरी कसदार अभिनय प्रकट होईल अशा दमदार भूमिका मात्र तिला साकारायला मिळाल्या नाहीत. रविना टंडन हिने पुरस्कार समितीला अशी कोणती "अंखियोसे गोली मारली" कुणास ठाऊक परंतू तिची सुद्धा पद्मश्रीसाठी वर्णी लागली. रविना टंडन व्यावसायिक सिनेमातून काम करणारी नटी आहे. तीचे काही सामाजिक कार्य असलेही परंतू ते म्हणावे तितके व्यापकही नाही. तरीही एकवेळ रविना टंडनला पुरस्कार देण्यास सुद्धा हरकत नाही परंतू मुलायमसिंग यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्याने मात्र जनतेत रोष व नाराजीच आहे. "मुलायम"सिंग यादव यांना जरी सरकारने हा पुरस्कार दिला असला व सरकारला त्याबाबतीत जे काही वाटले असेल ते असो पण अनेक दिवंगत कारसेवक, त्यांचे वशंज व नातेवाईक तसेच या देशातील बहुतांश जनतेला मात्र ही कृती कठोरच वाटली आहे.
रामाचा आश्रय घेतला म्हणून लोक यांच्या मागे गेले. रामाला सोडले तर लोक यांना उभेही करणार नाहीत. मुलायमसिंग ने सोनियाला पंतप्रधान होऊ दिले नाही हे स्पष्टीकरण देण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते कोणत्या तोंडाने लोकांना मार्गदर्शन करतात हे मला कळत नाही. स्पष्ट करतायेण्याजोगी प्रत्येक गोष्ट सत्य नसते. रामद्रोह करणार्या सरकारला रामनाम घेण्याचा अधिकार कदापि नाही. संघ व भाजप रामापेक्षा मोठे नाहीत. एरवी शहाजोगपणे प्रत्येक विषयावर ज्ञानामृत पाजणारे संघाचे दुद्ढाचार्य अजून मूग गिळून गप्प का?
उत्तर द्याहटवाजितकी डोकी तितकी मते
उत्तर द्याहटवाजितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल
कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढीले कोणी घट्ट;
कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!
गोड गोड जुन्या थापा
(तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग
जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार?
आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे
पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के
सब घोडे बारा टक्के!
जिकडे सत्ता तिकडे पोळी
जिकडे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी)
ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता;
पुन्हा पुन्हा जुनाच वार
मंद घोडा जुना स्वार;
याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!
सब घोडे! चंदी कमी;
कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी;
कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा
मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा;
कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्ऱ्या कोणी छक्के;
सब घोडे बारा टक्के!
विंदा करंदीकर