खेळ कुणाला दैवाचा कळला
उंचापुरा, देखणा असा रविंद्र महाजनी नजरेत भरला होता, तो मला आवडत असल्याने एक दिवस मी त्याला Friend Request पाठवली होती. त्याने ती स्विकारली सुद्धा होती आणि मग आम्ही खुप वेळा बोललो पण होतो.
काल वृत्तवाहिन्यांवर रवींद्र महाजनी या गतकाळातील हँडसम अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी आली आणि समस्त जनतेला शोक झाला. नुकत्याच झळकलेल्या पानिपत चित्रपटात रवींद्र महाजनीने मल्हारराव होळकरांची भूमिका वठवली होती. रवींद्र महाजनीच्या निधनानंतर अनेक जणांनी दुःखद प्रतिक्रिया आणि लेख लिहिले. मला आठवते मी लहान असताना दूरदर्शनवर मराठी चित्रपट दाखवत असत आणि छायागीत नावाचा मराठी गीतांचा एक कार्यक्रम सुद्धा सादर होत असे. या चित्रपट व गीतांच्या कार्यक्रमांमध्ये मधून रवींद्र महाजनीची ओळख झाली. "हा सागरी किनारा" ,"सहजीवनात आली ही" , "मधु इथे अन चंद्र तिथे" अशी त्याची गीते तेंव्हा पाहण्यात यायची. उंचापुरा, देखणा असा तो नजरेत भरला, त्याचा अभिनयही आवडू लागला. मुंबईचा फौजदार, झुंज, देवता इ. त्याचे चित्रपट तिकीटबारीवर यशस्वी ठरले. त्याचे अडनाव सुद्धा मी पहिल्यांदाच ऐकले होते. ते मला वेगळे असे वाटले होते. आपण महाजन हे आडनाव बरेचदा ऐकलेले आहे परंतु महाजनी हे आडनाव तेव्हा मी तरी पहिल्यांदाच ऐकले होते. पुढे समाज माध्यमे आल्यावर तो मला आवडत असल्याने एक दिवस मी त्याला Friend Request पाठवली होती. त्याने ती स्वीकारली होती आणि मग आम्ही खुप वेळा बोललो पण होतो. रवींद्र महाजनीचे वडील, परिवारसंबंधीचे लोक काही चित्रपटक्षेत्राशी संबंधित नव्हते पण तरीही रवींद्र महाजनीने सुरुवातीस नाटक आणि मग सिनेमा क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्याच्यातील गुण किरण शांताराम यांनी हेरले. आणि त्याला झुंज सिनेमात घेतले. त्या काळात मराठीमध्ये ग्रामीण कथानके असलेले चित्रपट मोठ्या प्रमाणात झळकायचे अशा काळामध्ये रवींद्र महाजनी शहरी भूमिका साकारत असे. पुढे त्याने हिंदी चित्रपटात सुद्धा भूमिका करण्याचा प्रयत्न केला परंतु तो तितकासा यशस्वी ठरला नाही. हळूहळू रवींद्र महाजनीकडे भूमिका येणे कमी झाले मग त्यानी बांधकाम क्षेत्राकडे लक्ष वळवले. तदनंतर रवींद्र महाजनीचा मुलगा गश्मीर याने सुद्धा चित्रपट क्षेत्रात शिरकाव केला. आज तो अभिनेता म्हणून स्थिरावला आहे. रविंद्र महाजनी जरी चांगला अभिनेता होता, देखणा होता तरीही चित्रपटसृष्टी म्हणजे उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी अशी एक सृष्टी आहे अभिनय कारकीर्दीचा अस्त होऊ लागल्यावर त्याच्याकडे ही सृष्टी पाठ फिरवते. तसेच रवींद्र महाजनी यांचे सुद्धा झाले. पुण्यातील तळेगाव जवळील आंबी गावात पुर्वी प्रकाशझोतात वावरणारा हा कलाकार आता एकाकी जीवन व्यतीत करू लागला होता. असे एकाकी जीवन त्याच्या नशिबी का आले असावे? मुलगा इतर कुटुंबीय संपर्कात का नसतील? असे प्रश्न आता मागे उरले आहे. त्याच्या फ्लॅटमध्ये काळाने त्याच्यावर झेप घेतली. कोणत्यातरी कारणाने त्यांचे दुःखद निधन झाले. ते कोणालाही कळले नाही. काही दिवसांनी दुर्गंधी येऊ लागल्यावर फ्लॅटमध्ये रवींद्र महाजन यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. रवींद्र महाजनी यांच्या दुःखद निधनानंतर सिनेरसिकांमध्ये शोककळा पसरली. रवींद्र महाजनी याच्यावर खेळ कुणाला दैवाचा कळला असे एक गीत चित्रित झालेले होते आणि खरंच एकेकाळी प्रसिद्धीच्या झोतात असणारा रवींद्र महाजनी एकाएकी जीवन व्यतीत करीत जग सोडून गेला. त्याच्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही आणि खरंच त्याच्याबाबतीत "खेळ कुणाला दैवाचा कळला या त्याच्यावरच चित्रित झालेल्या गीताच्या ओळीची प्रचिती आली.
लेख छान आहे
उत्तर द्याहटवाShevati manasala kay vichar suchtil kahi sangta yet nahi
उत्तर द्याहटवाचांगले लिहिले आहे
उत्तर द्याहटवा