Click "Follow" Button below To Follow this Blog

०६/०८/२०१६

Everywhere is Flood.....such situation occurs when Lord Shiva start dance "Tandao"....story of Indian Mythology ....articlee related to flood, nature and human tendency about nature

हा तर तांडवच      
             
     आताच काही वर्षांपूर्वी केदारनाथ येथे मोठा जलप्रपात होऊन मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्तहानी झाली होती.एवढ्या मोठ्या प्रमाणात येथे निसर्गाचा कोप झाला होता की केदारनाथ बंद झाले होते.आता कुठे तेथील परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोच परवा पुन्हा जोशी मठ येथे रस्त्यावर पर्वत कोसळला परंतू सुदैवाने त्यात प्राणहानी झाली नाही. परवा आपल्या महाबळेश्वरला १६ इंच पाउस पडला आणि त्यामुळे सावित्री नदीला मोठा पूर आला आणि महाड जवळील ब्रिटीशकालीन पूल वाहून गेला.रात्रीची वेळ असल्याने काही बसेस आणि लहान वहानांनी नेहमी प्रमाणे आपले वाहन हाकले परंतू पूल वाहून गेला असल्याने काही कळायच्या आतच त्यांचे वाहन थेट नदीच्या महाप्रवाहात वाहून गेले.पावसामुळे बस आणि वाहनांच्या खिडक्या प्रवासी आपसूकच बंद ठेवतात.त्या खिडक्या बंद ठेवल्याने आणखीनच प्राणहानी झाल्याची शक्यता आहे.इंग्रजांच्या काळात बांधलेल्या या पुलांचे दस्त आजसुद्धा त्यांच्याकडे सुस्थितीत असल्याने ज्या पुलांचे वय  शंभर वर्षांच्यावर झाले आहे त्या पुलांच्या बाबत इंग्रजांकडून आजही आपल्या प्रशासनास पत्रे येत असतात. परंतू आपले “प्रशासन सुस्त आणी खाऊन पिऊन मस्त” इंग्रज पुलांच्या दुरुस्तीचे पत्र पाठवतात आणि आपले प्रशासन शंभर वेळा जरी सांगितले तरी त्यावर काहीही कार्यवाही करणार नाही. काही घटना घडली की जबाबदारीचा चेंडू टेबल टेनिसच्या चेंडू प्रमाणे एकमेकांकडे टोलवायचा एवढेच त्यांना येते.असो! गेल्या चार पाच वर्षांपासून निसर्ग कोपतो आहे, मोठी हानी होत आहे. हे का घडते? तर निसर्गावर मानवाचे वाटेल तसे आक्रमण, अतिक्रमण होत आहे. पर्यटन आणि दर्शन या निमित्ताने आजकाल लोक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे तीर्थस्थाने, पर्यटन स्थळे या ठिकाणी होणा-या प्रचंड गर्दीमुळे अनेक व्यवसाय येथे निर्माण झाले आहेत. या व्यवसायीकानी येथे नदीपात्रे, पर्वत यांवर अतिक्रमण करून त्यांची दुकाने, घरे इ. तेथे उभारली आहेत. निसर्गावर मोठे आक्रमण होत आहे, तरुण येथे मद्य प्राशन काय करतात,गोंगाट काय करतात, मोठ्या प्रमाणात कचरा काय टाकतात या सर्वांमुळे या स्थळांचे पावित्र्य भंग होत आहे.आपण निसर्गाचा आदर करणारी माणसे आहोत आता त्याचा अनादर होत आहे.देव आहे किंवा नाही हा मुद्दा आणि विषय वेगळा परंतू पौराणिक कथांतून सांगितले जाते की शंकराने जर तांडव केले तर प्रलय होतो. सतत मोठ्या प्रमाणात पाउस होतो आहे हा प्रलयच तर आहे.निसर्गाचा अनादर,निसर्गावर मात करण्याची प्रवृती यांमुळे भारतात जवळपास सर्वच राज्यात पाणीच पाणी आहे.निसर्गाच्या अनादारामुळे निसर्गातच रमणा-या भगवान शंकराने तांडव सुरु केले आहे.केदारनाथ,महाबळेश्वर,त्र्यंब्केश्वर ही सर्व भगवान शिवाचीच तर निवासस्थाने येथूनच हा जल प्रलय सुरु झाला आहे.आपण सर्वानीच सावध होण्याची नितांत गरज आहे.आपण जर निसर्गाला कस्पटासमान मानत असू तर ते त्वरीत थांबवणे आवश्यकच आहे.निसर्गापुढे कुणाचेच काही एक चालत नाही.आज शंकराने तांडव सुरु केलेच आहे आपण जर निसर्गाला भविष्यात मान दिला नाही तर तांडव करणारा हा नटराज त्याचे तिसरे नेत्र उघडेल त्यामुळे आज प्रलय होत आहे उद्या महाप्रलय होईल आणि मग शोक करणारा सुद्धा कुणी राहणार नाही.

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा