विरघळणा-या कॅरीबॅग !
दिवसेंदिवस काही ना काही नवीन शोध लागत आहेत. आज जे “गॅजेट” आहे
ते महिना सहा महिन्यात जुने होत आहे. नवीन भ्रमणध्वनी, नवीन संगणक उपकरणे आणि इतर
इलेक्ट्रॉनिक उपकरणे यात तर क्रांती झाली आहे. गंमत अशी की आजचे उपकरण हे जुने
झाल्याने त्याला काही किंमत राहत नाही आणि मग अशा वस्तूंचा होतो “ई कचरा”.
पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक असा हा कचरा होय. पर्यावरणास भेडसावणारी आणखी
एक मोठी समस्या ती म्हणजे प्लास्टिक कॅरीबॅगची. कॅरीबॅग म्हणा अथवा प्लास्टिकच्या इतर काही वस्तू .प्लास्टिक हे कधीही नष्ट होत नाही आणि त्यामुळे ते जमिनीस फार
हानिकारक ठरत आहे. आपल्याकडे तर आणखी एक समस्या आहे. ती म्हणजे गायींची. आपल्याकडे
मालकांनी गायी केवळ नावापुरता पाळल्या असतात आणि त्या मोकाट सोडून दिलेल्या असतात.या
मोकाट गायी बहुतांश हमरस्त्यांवर रहदारीस अडथळा करतांना किंवा उकीरड्यावर आढळून
येतात. उकीरड्यांवर या गायींच्या पोटात मग प्लास्टिक कॅरीबॅग जातात. गायींचे आरोग्य खराब होते. गोहत्याबंदी योग्य
आहे परंतू गोपालन सुद्धा व्यवस्थितरीत्या केले पाहिजे. प्लास्टिक कॅरीबॅगवर जरी बंदी असली तरी विशिष्ट जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग सुरूच
आहेत. जाड असो वा बारीक प्लास्टिक कॅरीबॅग ही घातकच आहे. दररोज जगभरात कोट्यवधी टन प्लास्टिक जमा होते. या
प्लास्टिकची विल्हेवाट लावणे अशक्य आहे. कारण, तो अविघटनशील पदार्थ आहे. पर्यावरण बचावासाठी आता अनेक लोक,उद्योग,सामाजिक
संस्था तसेच सरकार सुद्धा पुढे सरसावले आहेत. शाळा- महाविद्यालयात आता पर्यावरण हा
विषय असल्याने विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा पर्यावरण रक्षणाची जागृती झाली आहे. आणि आता
आणखी एक चांगली बातमी म्हणजे भारतीय वंशाच्या एका उद्योजकाने आता पाण्यात विरघळणारे इको फ्रेंडली प्लास्टिक शोधून काढले आहे. विशेष
म्हणजे हे प्लास्टिक जनावरांनी खाल्ले तरी त्यांना याचा अपाय होत नाही.मूळच्या
मंगलोरच्या परंतू आता कतार येथे स्थित असलेल्या अश्वथ हेगडे यांच्या ‘एन्वीग्रीन’ या कंपनीने बायोडिग्रेडेबल अशा प्लास्टिकच्या पिशव्या बनवल्या आहेत. स्टार्च आणि
वनस्पतीचे तेल वापरून त्यांनी या पिशव्या तयार केल्या आहेत. हा अभिनव शोध लावणा-या हेगडे यांच्या कंपनीने बटाटे, मका, स्टार्च, केळी आणि फुलांचे
आणि वनस्पतीचे तेल वापरून या पिशव्या बनवल्या आहे. या पिशव्या लवकरच भारतात
विक्रीसाठी आणण्याची त्यांची मनीषा आहे. यावर्षांच्या अखेरपर्यंत या पिशव्या भारतात विक्रीसाठी
आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहे.या पिशव्या जवळपास ३ रुपयांच्या दरात बाजारात उपलब्ध
होतील. या पिशव्या २४
तासांतच पाण्यात विरघळतील किंवा गरम पाण्यात काही सेंकदात विरघळणा-या असतील. प्लास्टिक ही
गंभीर समस्या बनलेली आहे. एका संशोधनानुसार गेल्या पंन्नास वर्षांत प्लास्टिकचा
वापर ५० लाख टनांवरून १० कोटी टन इतका पोहचला आहे. भारतात दरदिवशी १५ हजार टन
प्लास्टिक कचरा तयार होतो. त्याची विल्हेवाट लावणे ही सगळ्यात मोठी समस्या बनली
आहे.आपण सर्वानी पर्यावरण
बचावासाठी आपापल्यापरीने प्रयत्नशील रहायला हवे. हेगडेंसारख्या उद्योजकाचे
मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार की ज्यांनी स्वत:च्या व्यवसायातून पर्यावरण बचावाचे कार्य
सुरु केले आहे.“विरघळणा-या कॅरीबॅग” सारख्या अभिनव
कल्पना प्रत्यक्षात आणल्यास भारत प्लास्टिकमुक्त होवू शकेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा