मेरी जान मेरी जान
‘प्लॅस्टिक’ के अंडे
कोलकाता येथील अनीता कुमारी
या महीलेस घरी आणलेल्या अंडयांचे
आम्लेट बनवताना अंड्याचे वरचे कवच जळाल्याने प्लॅस्टिक जळाल्यावर जसा वास येतो तसा वास आला आणि तीला संशय आला.त्यापुर्वीही तीच्या मुलीची प्रकृती तीने आणलेले अंडे खाल्ल्यानंतर खराब होत असे. तीला संशय आल्यावर तीने अंड्यांबाबत अधिक शहानिशा केली असता ते अंडे चक्क प्लॅस्टिकचे असल्याचे आढ़ळून आले.अनीता कुमारी यांनी तक्रार केली आणि अन्सारी नामक अंडे विक्रेत्यास अटक करण्यात आली. दीड लाखाचे नकली अंडे जप्त झाले.बहुतांश गुन्ह्यात एखाद्या विशिष्ट धर्माच्या गुन्हेगारांचेच प्रमाण जास्त का असते हा सुध्दा एक संशोधनाचा विषय आहे.आपल्या देशात माणूस Quick Money च्या मागे इतका का आकर्षीला गेला की त्वरीत पैसे कमवण्यासाठी तो युरीयाचे दूध,नकली खवा,नकली कोबी,नकली रंगाची लाल जर्द स्ट्रॉबेरी आणि आता नकली अंडे असले उपद्व्याप करायला लागला.भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्षातच हे नसते उपद्व्याप सुरु झाले.1980 च्या दशकात अनिल कपूरच्या ‘मिस्टर इंडीया’ या चित्रपटात सुद्धा अन्न पदार्थात भेसळ करणारी टोळी दाखवली होती.एका जुन्या हिन्दी चित्रपटातील “|खाली डब्बा खाली बोतल” हे गीत गातांना मेहमूद म्हणतो “शहदमें गुड के मेल का डर है,घी के अंदर तेल का डर है,तम्बाखूमे घास का खतरा, सेंटमे झूटी बास का खतरा,मख्खनमे चरबी की मिलावट, केसरमे कागज की चीलावट,आटेमे पत्थर की पिसाई,व्हिस्की अंदर टींचर घुलता क्या जाने किस चीजमे क्या हो गरम मसाला लीद भरा हो |“ 60 च्या दशकातील हे गाणे आहे चित्रपट म्हणजे समाजाचा आरसाच.समाजातील घटना चित्रपटात दाखवल्या जातात.60 च्या दशकातील हे गाणे खाद्य पदार्थात भेसळ असते याची साक्ष देणारे आहे.या गाण्यावरून अंदाज करता येईल की खाद्य पदार्थात भेसळ ही अनेक वर्षापासून होत आहे.आता भेसळ तर आहेच शिवाय तंत्रज्ञानामुळे ‘प्लॅस्टिक’च्या अंडयांसारखे बनावट खाद्य पदार्थ सुद्धा बनत आहेत.काय करत आहे सरकार? कुठे गेले ते अन्न व औषधी विभाग? कुठे गेले अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय आणि त्यांचे कर्मचारी?, काय करतो आहे पोलिस खात्याचा गुप्तहेर विभाग?नागरीकांच्या तसेच लहान-लहान मुलांच्या जीविताशी खेळणारे हे समाजकंटक दंडनीय आहेत.केवळ दंडनीय नव्हे तर देहांत प्रायश्चित भोगण्याच्या लायकीचे आहेत शिवाय खाद्य पदार्थ विभागाशी संबंधीत कर्मचारी व जनतेचे रक्षण करणारे सुद्धा अकार्यक्षम आहेत,भ्रष्ट आहेत त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे असले गंभीर गुन्हे घडतात त्यामुळे संबंधीत नाकर्ते कर्मचारी व लोकप्रतिनिधी हे सुद्धा दंडनीय आहेत.भेसळ करणा-या या अतिरेक्यांच्या, होय हे सुद्धा अतिरेकीच म्हणावे, कारण हे सुद्धा जनतेच्या जीवीताशी खेळतात यांच्या हे सुद्धा ध्यानात येत नाही की कुठे तरी त्यांची मुले,त्यांचे नातेवाईक त्यांनी निर्माण हे केलेले भेसळयुक्त पदार्थ किंवा बनावट खाद्य पदार्थ खावू शकतात.हे असे करण्यास धजावतात याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे सौम्य कायदे.यांनी अपराध केल्यावर हे लगेच जामिनावर मुक्त होतात.जनतेच्या जीवीताशी खेळणा-यांना अजामिनपात्र गुन्हाच हवा,त्यांच्यावर कठोर शासनच हवे.मानवाधिकारवाल्यांनी अशा अपराध्यांच्या बाजूने उगीच लुडबुड करू नये.जेंव्हा जनतेच्या जीवावर बेतते तेंव्हा त्या जनतेच्या बाजूने मानवाधिकार वाल्यांनी येणे हे जास्त अभिप्रेत आहे.अनीता कुमारी यांच्या सारखे सर्व नागरीकांनी सुजाण आणि जागरुक राहणे आता अत्यावश्यक झाले आहे.असले गंभीर गुन्हेगार यांच्यामुळे गरीब जनता आजारी होते आणि आजारी झाल्यावर त्याला पुन्हा आर्थिक दृष्टया नागवणारे दवाखाने आहेतच.जनतेच्या आरोग्यावर परीणाम करणारे हे नीच, दुर्जन भेसळखोर यांना मायबाप सरकारने सक्तीने वठणीवर आणणे आता अत्यावश्यक झाले आहे.रस्ते बांधा,मंदीर बांधा,अनुदाने वाटा किंवा लाटा परंतू जनतेकडे जनतेच्या आरोग्याकडे सुद्धा थोड़े लक्ष दया. “मेरी जान मेरी जान खाना मुर्गी के अंडे” या गीताचा तसेच “संडे हो या मंडे रोज खावो अंडे” या घोषवाक्याचा जनहीत जाहीराती करीता उपयोग करणा-या शासनाने कोंबडीचे अंडे खावे की प्लॅस्टिकचे बनवलेले नकली अंडे खावे हे सुद्धा स्पष्ट करावे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा