ग्राहकांप्रती उदासीन BSNL
दि 24
रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा झाला. “नेमेची येतो मग पावसाळा” याप्रमाणे महसूल विभागात हा
दिवस साजरा होतो. महाराष्ट्र शासनाचे आदेश असूनही हा दिवस कुठे साजरा होतो तर कुठे नाही. जिथे होतो तिथे निव्वळ एक formality म्हणून साजरा केला जातो. शासनाच्या वतीने ज्याप्रमाणे महसूल विभाग ग्राहक
दिन साजरा करते त्याच प्रमाणे शासनाच्या इतर विभागांनी सुद्धा हा दिवस साजरा करणे
अपेक्षित आहे. व याची सुरुवात व्हावी ती BSNL या भारत
सरकारच्या कंपनी पासून असे वाटते. कारण तशी सर्वप्रथम आवश्यकता बीएसएनएल लाच आहे. BSNL तशी टेलीकॉम
क्षेत्रातील मोठी कंपनी. परंतू अत्यंत सुस्त कारभारामुळे रसातळाकडे वाटचाल सुरु
करीत असलेली कंपनी. खरे म्हटले तर एखाद्या राष्ट्राची जर कोणती कंपनी असेल तर त्या
कंपनीच्या खात्याने तीला नफ्यात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असले
पाहिजे. BSNL चे संचार खाते काय करते आहे ? मोबाईल , इंटरनेट या क्षेत्रात BSNL च्या कितीतरी नंतर आलेल्या खाजगी कंपन्या आज चांगला नफा कमवून गबर बनीत
आहे. BSNL काय करते आहे ? BSNL त्यांचे
जे काही ग्राहक आहेत त्यांना सुद्धा गमावण्याच्या चांगल्याच तयारीस लागले असल्याचे असे चित्र आहे. BSNL लँड लाईन धारकांकडे तर
त्यांचे मुळीच लक्ष नाही. तुम्ही कितीही तक्रार करा निवारण करण्यासाठी कुणीही येत
नाही. मारे ओंनलाईन तक्रार निवारण सुविधा उपलब्ध करतात , त्याची जाहीरात करतात , त्या जाहिरातींवर लाखो रुपये
उधळतात. परंतू ओंनलाईन तक्रार दाखल करण्याच्या तक्रारीचे निवारण करण्यास कुणीही
येत नाही. बुलडाणा जिल्ह्यात BSNL ने अक्षरश: मागे लागून-लागून,रोज फोन, लघु संदेश पाठवून
ग्राहकांना 4G सीम कार्ड घेण्यास सांगितले.अनेकांनी ते
घेतले. मात्र आज अशी परिस्थिती आहे की, हे 4G सीम तर आले परंतू BSNL मोबाईल धारक मात्र
अत्यंत धीम्या गतीने चालणा-या नेटमुळे त्रस्त झाले आहेत. आज पंतप्रधानांच्या
आवाहनामुळे कित्येक लोक डिजिटल पेमेंट करीत आहेत व पंतप्रधांनांच्या आवाहनास प्रोत्साहित
होऊन प्रतिसाद देत आहेत. परंतू माहीती व
दूरसंचार खात्या अंतर्गत येत असलेलेले BSNL मात्र
आपल्या अतिशय वाईट सेवेने स्वत:च्याच ग्राहकांना त्रस्त करून सोडीत आहे.
ग्राहकांना जेरीस आणीत आहे. तरीही अद्यापही काही राष्ट्रीय विचारांचे ग्राहक
बीएसएनएल ला धरून आहेत. परंतू बीएसएनएल मात्र आपल्या ग्राहकांप्रती शंभर टक्के
उदासीन आहे. लँड लाईन धारकांकडे तर बीएसएनएल साफ कानाडोळा करीत आहे. लँड लाईन च्या
कित्येक तक्रारी निवारण त्वरीत होत नसते किंवा होतच नाही.
अनेक लँड लाईन धारकांनी त्रस्त होऊन लँड लाईन सुविधा बंद केली आहे. त्यांची अनामत रक्कम
नंतर मिळेल असे सांगून संपूर्ण देशभरात अब्जाबधी रुपयांची रक्कम अद्यापही बीएसएनएल
कडेच जमा आहे. त्या रकमेवर ते व्याजही मिळवत आहेत. ग्राहक लँड लाईनची तक्रार, अनामत रक्कम, मोबाईल फोनची तक्रार, याबाबत बोलण्यास गेले असता त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे देऊन त्यांची बोळवण
केली जाते. अनेक खाजगी मोबाइल कंपन्या सूनियोजित कारभार करून, ग्राहक सेवा देऊन, जीवघेण्या स्पर्धेत नफा कमवित असतानाचे
चित्र सर्व पाहतच आहेत.परंतू माहीती व प्रसारण खाते, त्या खात्याचे
मंत्री मात्र कुंभकर्णी निद्रेत आहे.त्यांच्या डोळ्या देखत खाजगी
कंपन्या ग्राहकांकडून नफा मिळवीत आहेत.परंतू यांना मात्र राष्ट्राची कंपनी बीएसएनएल
ला उभारी देण्याची काही एक भावना दिसत नाही आहे.इतर देशात त्या-त्या देशांच्या कंपन्या
चांगल्या जोमात सुरू असल्याचे चित्र असते.भारतात मात्र राष्ट्राच्या कंपनीस डबधाईस आणून काही लाडक्या उद्योगपतींच्या खाजगी कंपन्यांना
पुढे आणले जात आहे. प्रसंगी हे नियमबाह्य पद्धतीने पद्धतशीर पद्धतीने करण्यात येत आहे.हीच का यांची राष्ट्रीय भावना? केंद्र सरकार मधील एका मंत्री महोदयांनी मागे व्यायाम करण्याचे
चँलेंज सोशल मिडीयाद्वारे तरुणांना दिले होते. तंदुरुस्त राहणे योग्यच आहे परंतू शारीरीक तंदुरुस्ती प्रमाणेच आपल्या राष्ट्रीय भारतीय कंपनी BSNL ला सुद्धा तंदुरुस्त कसे कर्ता येईल हे पाहणे, BSNL च्या
सेवा ,इंटरनेटचा स्पीड चांगला करणे हे सर्व करण्याचे चँलेंज टेलिकम्युनिकेशन मंत्र्यांनी स्वत: स्विकारावे.BSNL ला बळ द्यावे, कंपनीच्या सेवेत सुधारणा (Drastic Change) करून इतर खाजगी कंपन्यांना चँलेंज द्यावे. असे केल्यास
एका राष्ट्रीय कंपनीबाबत,तिला सावरण्याबाबत,मा. पंतप्रधानांच्या डिजीटल इंडीयाच्या संकल्पनेबाबतची आपली राष्ट्रीय भावना
जनतेच्या नजरेस पडेल .