असुरी आनंद
आनंद हा दोन प्रकारचा असतो एक म्हणजे कुणाच्यातरी
भल्यातून झालेला आनंद तर दूसरा कुणाच्या नुकसानामुळे किंवा दुस-याच्या पराभवामुळे झालेला
आनंद. यातील पहीला आनंद हा दैवी आहे, नैसर्गिक आहे परंतू दूसरा आनंद हा मात्र असुरी आनंद आहे. या
असूरी आनंदचा उपभोग घेण्याची वृत्ती अनेकांत दिसून येते. याच असुरी आनंदाची
प्रचिती “नमोहरम” या शब्दावरुन आली. “नामोहरम” या शब्दाचा चपखल वापर करून भाजपाचा
पाच राज्यात झालेल्या पराभवातून असुरी आनंद घेतल्या जात आहे. असा असुरी आनंदाचा
उपभोग घेतांना त्यांना स्वत:चे सुद्धा आत्मपरीक्षण करणे जरूरी आहे. मोठा भाऊ आता
म्हणावा तितका प्रभावी असल्याचे दिसून येत नाही. मित्रपक्षासोबत सत्तेचा वाटेकरी बनतो
व त्याच मित्रपक्षाच्या पराभवातून असुरी आनंद घेतो. 2014
पासून या असुरी आनंद घेणा-यांनी स्वत:च्याच मित्रपक्षावर वारेमाफ तोंडसुख घेतांना, अफझलखान सारखी मुक्ताफळे उधळतांना जनतेने पाहीले आहे. एखाद्याचा द्वेष
करतांना आपण किती द्वेष करीत आहोत याचे भान ठेवणे आवश्यक आहे. ज्या राज्यांच्या
निवडणूका होत्या तेथे अनेक वर्षे येथे भाजपाने सत्ता उपभोगली. कार्य सुद्धा चांगले
केले. जनतेला बदल आवश्यक वाटला त्यामुळे जनतेने तसा कौल दिला. परंतू विजयी कोंग्रेसपेक्षाही
जास्त आनंद हे असुरी आनंद घेणारे घेत आहेत. कोंग्रेस नेतृत्वाने तरी विनम्रतेने हा
विजय स्विकारून, सुयोग्य भाष्य करून आपण सुद्धा राजकीय
प्रगल्भ झालो आहोत हे दाखवले. परंतू ज्या कोंग्रेसचा तिटकारा यांचे साहेब करीत आले,ज्या कोंग्रेसवर वारेमाप तोडसुख घेत आले त्याच कोंग्रेसबद्दल यांना अचानक
मोठा पुळका आलेला आहे. त्यांची मोठी स्तुती काल हे नमोहरम म्हणणारे खासदार महाशय
करीत होते. हे कोंग्रेस नेतृत्वाचे मोठे गुणगान करीत होते तर ज्यांचे स्वत:चे आमदार,खासदार कुणीही नाही त्यांना त्वरीत तीन राज्यात विजयी झालेल्यांचे नेतृत्व
लगेच “परमपूज्य” सुद्धा वाटू लागले आहे. मुद्दा हा आहे की कुणी हारणार कुणी
जिंकणार परंतू दुस-याच्या पराभवातून आनंदी होणे हे मात्र योग्य वाटत नाही. तसेच
सत्ताधारी असो वा विरोधी वृथा अहंकार, फाजील आत्मविश्वास
सुद्धा नको. या असुरी आनंद घेणा-यांना एकच सूचना करावीशी वाटते. आज तुम्ही
समविचारींच्या पराभवातून असुरी आनंद घेत आहात. परंतू निवडणूका जवळच आहेत.
स्वत:च्या विजयाचे सूत्र बांधा, महाराष्ट्रात आता
पूर्वीसारखा जोर राहीला नाही, राष्ट्रीय पातळीवर तर आपला
काही विशेष प्रभाव नाही. गुजराथ विधानसभा निवडणूकीतील आपला “परफॉरमन्स” जनतेने
पाहीला आहे. त्यामुळे असुरी आनंद घेणे योग्य नव्हे. तुमच्या हितचिंतकांना तुम्ही
समविचारी, नैसर्गिक मित्र सोबतच हवे वाटतात व तेच तुमच्या, तुमच्या पक्षांच्या व देशाच्या सुद्धा हिताचे आहे. त्यामुळे आपल्या वरीष्ठांनी
ज्याप्रमाणे समविचारींशी, नैसर्गिक मित्रांशी सलगी ठेवली त्याचप्रमाणे
ठेवली तर तेच रास्त ठरेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा