Click "Follow" Button below To Follow this Blog

३०/०६/२०१८

English version of Marathi article on all time hit song of lyricist Yogesh "Rimzim Gire Sawan", a song of 1979 Amitabh Bachchan's movie Manzil


Rimzim Gire Sawan……… a nostalgic song

          Yesterday was drizzling evening. Date June 27, music composer R.D Burman's Birthday. Then how the song "Rimzim Girie Sawan" composed by R.D.is not remember? At the time of reading the title, music fans must have remembered this song. There are many beautiful rain songs in the Hindi film industry.If someone writes articles on such songs then definitely a huge article will be created.As such, many articles have been published beforehand on this subject. Since black and white era of Hindi films to recent days, there have been many rain songs shown in many films. Many of these songs are excellent. The song "Rimzim Girie Sawan Sulag Sulag Jaye Mana" from the same row. This song will take in a different world to listeners. As soon it begins, music lovers listen it with the melodious concentration. Many musicians have composed melodious, nostalgic rain songs like this one. This one is a beautiful song among them.This song was picturised on Amitabh Bachchan and Maushmi Chatterjee in the film “Manzil” which was released in 1979. Manzil is not a special film of Amitabh. “Adalat”, “Ek Nazar”, “Do Anjane”, “Raste ka Patthar” and “Farar” of the song "Mai Pyasa Tum Sawan", are a lesser-known movies of Amitabh. “Mazil” is one of them. Though the film was not commercially hit, the plot and songs of this film and above mentioned other films was very nice.The plot of the “Manzil” was also good. A poor young man falled in love with a rich girl and pretends to be rich.Refurbishing the old galvanometer and selling them was his business. To achieve success in this, the young Amitabh has done a good job for the day and night. R.D.has composed two versions of the song "Rimzim Gire Sawan" in a Lata Mangeshkar and another in all rounder Kishorekumar’s voice. Kishore's In-Door song is depicted on
Amitabh Bachchan, Lata's outdoors has been painted out on Amitabh Bachchan and Maushmi Chhatterjee. Both songs are well-known. The first one is little slower than the other. The song that gives more joy to hear and watch on the screen is from Lata's voice. Kishore's song is also best one.Beautiful photography in out door, rain in Mumbai, low crowds on the roads due to rain, Amitabh and Maushmi are walking on the streets in Mumbai and in the background this fast moving song is played in one and only Lata Mangeshkar’s melodious voice. Audience can see how the footsteps of the pedestrians stops for a while to see the shooting and their beloved actor, actress."Iss Baar Sawan Dahaka huva hai"

, and "Pahele bhi yun to barse the baadal, pahele bhi yun to bhiga tha aanchal", these lines describes how the usual rain feels different after getting a partener. The rain begins to rush through the beautiful words of Yogesh, Lata didi express beautiful lines delightedly. At the same time, walking on the marine drive, tilting the mud on oval ground, and sometimes throwing wet papers removed from the pocket Amitabh and Maushmi acted gracefully.There is no need to take the basis of obscenity or similar gesture anywhere. R.D.’s music, pure Hindi words of lyricist Yogesh which he priorly used in songs like "Kanhi door jab din dhal jaye", "Jindagi Kaisee hai paheli haay", "Kai baar yunhi dekha hai", Big B’s pleasant presence on screen and depiction of Mumbai rain combination of all these made “Rimzim Gire Sawan” the all time hit" song.


२७/०६/२०१८

Article on all time hit song of lyricist Yogesh "Rimzim Gire Sawan", a song of 1979 Amitabh Bachchan's movie Manzil

रिमझिम गिरे सावन 
काल संध्याकाळी रिमझिम पाऊस पडत होता. त्यातच सोशल मिडीयावर 27 जून हा संगीतकार    #RDBurman आर. डी बर्मनच्या जन्म दिवस असल्याचे कळले. मग आर.डी.नेच संगीतबद्ध केलेले “रिमझिम गिरे सावन” हे  पाऊस गीत कसे काय नाही आठवणार? शीर्षक वाचता क्षणीच संगीतप्रेमीना हे गीत नक्कीच आठवले असणार. हिंदी चित्रपटसृष्टीत पावसाची अनेक श्रवणीय , सुमधुर गीते आहेत. या गीतांवर लेख लिहू गेल्यास एक भला 
मोठा लेख तयार होईल. तसे या विषयावर आधारीत अनेक लेख यापूर्वी प्रकाशित होऊन गेले आहेत. कृष्ण धवल जमान्यापासून ते आजपावेतो अनेक चित्रपटातून पाऊस गीते आलेली आहेत. यातील अनेक गीते उत्कृष्ट आहेत. त्याच पंक्तीतील “रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन” हे गीत आहे. अनेकांना  भावणारे हे गीत वेगळ्याच विश्वात नेते, गीत सुरु होताच रसिक तन्मयतेने ते ऐकण्यास हमखास भाग पडतोच. अनेक संगीतकारांनी एका पेक्षा एक अशी सरस पाऊस गीते संगीतबद्ध केली आहेत. त्यातीलच हे एक सुमधुर गीत. 1979 मध्ये झळकलेल्या मंजिल या अमिताभ बच्चन #AmitabhBachchan व व मौसमी चॅटर्जी #MoushumiChhaterjee अभिनित चित्रपटातील हे गीत आहे. तसा मंजिल हा चित्रपट अमिताभचा विशेष गाजलेला असा  चित्रपट नाही. अदालत, एक नजर, दो अंजाने, रास्ते का पत्थर, 

“मै प्यासा तुम सावन” हे गीत असलेला फरार हे अमिताभचे कमी चर्चिल्या जाणारे, कमी पाहिले गेलेले चित्रपट आहे. यातीलच एक चित्रपट म्हणजे हा मंजिल. जरी हे चित्रपट व्यवसायिकदृष्ट्या  ‘हिट’ नसले तरी या चित्रपटातील गाणी व 
काही चित्रपटांचे कथानक खूप छान होते. मंजिलचे कथानक सुद्धा चांगले होते. श्रीमंत मुलीवर भाळलेला एक गरीब तरुण तीला श्रीमंत असल्याचे भासवत असतो. जुने गॅल्व्हनॉमीटर परत दुरुस्त करून अर्थात आजच्या भाषेत refurbish करून विकण्याच्या त्याचा व्यवसाय. त्यात यश मिळावे म्हणून रात्रंदिवस त्याच विषयात रमणारा ध्येयपुर्ती साठी झटणारा, त्यासाठी प्रसंगी वाममार्गाचा अवलंब करणारा तरुण अमिताभने छान साकारला आहे. आर. डी. ने यात “रिमझिम गिरे सावन” या गीताचे दोन व्हर्जन संगीतबद्ध केले आहेत एक लताच्या तर दुसरे किशोरच्या आवाजात. किशोरचे इन डोअर गीत अमिताभवर चित्रित केले आहे तर लताचे आऊट डोअर, मौसमी व अमिताभ या दोघांवर पावसात चित्रित केलेले. दोन्ही गीते सुश्राव्य. पहिले थोडे संथ तर दुसरे वेगवान. पडद्यावर बघण्यास व ऐकण्यास जास्त आनंद देणारे गीत लताच्या आवाजातील आहे. अर्थात किशोरचे गीत सुद्धा काही कमी नाही. आउट डोअर गीतात सुंदर फोटोग्राफी, मुंबईतील पाऊस, पावसामुळे रस्त्यांवर कमी गर्दी व त्या पावसात अमिताभ व मौसमी मुंबईतील रस्त्यावर फिरत आहेत, पार्श्वभूमीला लताच्या आवाजातील वेगाने पुढे जाणारे हे गीत सुरु आहे. पादचारी थबकून शुटिंग पहातांना या गाण्यात दर्शकांना दिसतात. “इस बार सावन दहका हुआ है, इस बार मौसम बहाका हुआ है” तसेच “पहले भी युंही बरसे थे बादल, पहले भी युंही भीगा था आंचल” या आशयाच्या कुणीतरी जोडीदार मिळाल्यावर नेहमीचाच पाऊस कसा वेगळा वाटायला लागतो हे सांगणा-या योगेशच्या #Yogesh सुंदर शब्दांत गुंफलेल्या ओळींना लता दीदी त्यांच्या सुमधुर आवाजात व्यक्त करतात. त्याच वेळी कधी मरीन ड्राईव्ह वर 
  फिरत, ओव्हल मैदानावरील चिखल तुडवत तर   कधी चिंब पावसात भिजल्याने ओली झालेली  खिशातील कागदे काढून फेकत पडद्यावर  अमिताभ व मौसमी जोडीने पावसात भिजण्याचा  अभिनय सुरेख वठवला आहे. कुठेही अश्लीलता  अथवा तत्सम हावभावाचा आधार दिग्दर्शकाला  घेण्याची गरज वाटली नाही. आर. डी. चे संगीत,  शुद्ध हिंदीत “कंही दूर जब दिन ढल  जाये”, “जिंदगी  कैसी है पहेली”, “कई बार युंही  देखा है” अशी गीते लिहणा-या योगेश या गीतकाराचे हे गीत, पडद्यावर बिग बी, पावसातील मुंबईचे चित्रण या सर्वांमुळे हे सदाबहार गीत “ऑल टाईम हिट” आहे.

१६/०६/२०१८

Article reminds the serial "Phir Wohi Talash" a television show by director Lekh Tandon broadcast on Doordarshan in 1989–1990.


फिर वही तलाश




भारतातील टीव्हीवर जेंव्हा फक्त दूरदर्शन दिसायचे त्या काळातील लोकांना विशेषत: विद्यालयीन व महाविद्यालयीन तरुणांना फिर वही तलाश नावाची मालिका शीर्षक वाचताक्षणीच आठवली असेल. त्याकाळात दूरदर्शनवर एकापेक्षा एक सरस अशा दर्जेदार कथानक असेलेल्या  मालिका असत. पोलीस अधिकारी बनण्याची महत्वाकांक्षा असलेल्या तरुणीची उडान , भारत पाकिस्तान फाळणीवर आधारीत तमस , कथानकाला काश्मीरची  पार्श्वभूमी असलेली गुल गुलशन गुलफाम, बुनियादहमलोग. चॅनल जरी एकच असले तरी उत्कृष्ट कथानक, दिग्दर्शन असलेल्या आणि विशेष म्हणजे आटोपशीर कथानक असलेल्या कमी भागांच्या व आठवड्यातून एकच दिवस दिसणा-या या मालिका असत. रिपीट टेलीकास्ट नसल्याने दर्शक मालिकेची आतुरतेने वाट पहात असत. फिर वही तलाश ही त्यापैकीच एक मालिका, एका डॉक्टर बनू ईच्छीणा-या गरीब मुलाची ही कथा. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिवस व्यतीत करणारा, डॉक्टर बनण्यासाठी शहरात येणारा व एका बंगल्याच्या आऊट हाऊस मध्ये राहणारा, गरीबीमुळे कॉम्प्लेक्सअर्थात न्यूनगंड असणारा एक तरुण व त्याच्यावर अव्यक्त प्रेम करणारी घरमालकाची कन्या पद्मा (#PoonamRehaniSarin), ते समजूनही आपल्या गरीब परिस्थितीमुळे पद्माला टाळणारा लाजाळू नरेंद्र (#Ashwinikumar) , पद्माची अवखळ मैत्रीण शहनाज यांच्या सर्वांच्या सुरेख अभिनयामुळे ही मालिका खूप गाजली होती. शहनाजची भूमिका








करणारी #NeelimaAzeem निलिमा अजीम व सलीमची भूमिका करणारा राजेश खट्टर #RajeshKhattar हे दोघेच ते काय नंतर इतर सिनेमा व मालिकांत दिसले. नरेंद्र देखणा नसूनही त्याच्यावर भाळणारी सुंदर पद्मा, पद्माचे कडक वडीलपद्माची आत्या व इतर सहकलाकार सर्वानी आप-आपल्या भूमिका सुरेख वठवल्या होत्या. त्यामुळेच ही मालिका अजूनही चांगली स्मरणात आहे. मालिका लक्षात राहण्याचे आणखी एक कारण मालिकेचे दिग्दर्श हे जुन्या जमान्यातील आम्रपाली, प्रोफेसर, अगर तुम ना होते या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक #LekhTandon लेख टंडन यांनी केले होते. कथानकदिग्दर्शन, अभिनय या सर्वांमुळे कलाकार नवखे असूनही या मालिकेची भट्टी मात्र छान जुळून आली होती.
कभी हाद्सो की डगर मिले,
कभी मुश्किलो का सफर मिले,
यह चिराग है मेरी राहके
मुझे मंझीलोंकी तलाश है
या मालिकेचे हे श्रवणीय शीर्षक गीत तेंव्हा फार लोकप्रिय झाले होते. 1990 च्या दशकात दूरदर्शनवर झळकलेली ही मालिका पुन्हा कधीही पहाण्यात आली नाही. मालिकेचे पुन:प्रक्षेपण झालेही असेल तर त्याची काही माहिती नाही कारण दूरदर्शन वाहिनीचा क्रमांक सुद्धा आता कुणाला माहीत नसतो. भरमसाठ वाहिन्यांच्या भाऊगर्दीत दूरदर्शन हरवले आहे.  वाहिन्यांचा निव्वळ सुळसुळाट झाला आहे परंतू दर्जेदार कथानकाच्या मालिकांची मात्र वानवा आहे. नव-याची दुसरी बायको, सांस-बहु, नवरा बायकोच्या मध्ये येणारी एखादी व्दाड स्त्री. थोड्याफार फरकाने असेच कथानक असणा-या मालिका असतात. शिवाय त्यांच्या लांबीला काही मर्यादा नाही. घरोघरी या असल्या तद्दन भिकार मालिका पहिल्या जातात, ते सुद्धा जेवण करतांना. दर्जेदार लेखक, दिग्दर्शक कुठे लोप पावले ? की दर्शकांचीच रुची  आता बदलली आहे? काळ बदलला, नवीन तंत्रज्ञान आले, अनेक वाहिन्या आल्या त्या वाहेन्यांवरून सादर होणा-या कार्यक्रमांमुळे त्यांचा टीआरपी ठरू लागला, बिग बॉस सारखे काहीही खेळ करणे सुरु झाले टीआरपी च्या नादात दर्जेदार कार्यक्रम, दर्जेदार मालिका लोप पावल्या व दर्शकांची मात्र दर्जेदार मालिका, चित्रपट, नाटक यांच्यासाठी फिर वही तलाश सुरु झाली.



१४/०६/२०१८

Sharad Pawar changed "Puneri Pagadi" of Chhagan Bhujbal, a perticular type of cap in Maharashtra article about this political issue


टोपी, झेंडे , रंग आणि आता पगडी
त्तेसाठी आपले राजकीय  नेते काय करतील याचा नेम नसतो. वरकरणी “जातीभेद, पंथभेद, धर्मभेद  दूर करा” अशा स्वरूपाच्या पोकळ वल्गना करायच्या आणि निवडणुकांची चाहूल लागताच विविध प्रतिकांव्दारे  नागरिकांत भेदभाव वाढून, मतांचे ध्रुवीकरण होउन त्याचा सत्तेच्या पाय-या चढण्यास कसा उपयोग करता येईल अशा कृती किंवा अशी विधाने करायची. राष्ट्रपुरुष व त्यांची विविध प्रतीके जसे टोपी , झेंडे , रंग यांची याआधीच वाटणी झाली असून त्यात आता अजून एका प्रतीकाची भर पडली आहे. ती म्हणजे पुणेरी पगडी. राष्ट्रवादी पक्षाच्या एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांचे स्वागत पुणेरी पगडी घालून करण्यात आले. तसे पाहिले तर ज्या कॉंग्रेस पक्षात पूर्वी जाणते राजे होते त्या कॉंग्रेस पक्षाच्या महान नेते म्हणजे महात्मा गांधी यांच्या गुरुंची ही पगडी आहे. राज्यात केंद्रात दोन्हीकडे सत्तेत नसल्याने विरोधकांना जो पोटशूळ उठला आहे तो काही केल्या शमत नाही आहे तसेच  विविध मोर्चे, आंदोलने यां सर्वाना तरुण, तडफदार, हुशार मुख्यमंत्री निष्णात राजकारणाने हाताळत आहेत हा सुद्धा एक सल आहेच म्हणून मग “छत्रपतींची नेमणूक केली” , “टोकाची भूमिका घ्या” आणि आता “पुणेरी पगडी वापरू नका” अशाप्रकारची वक्तव्ये केली जातात. केवळ पक्षाचे नांव राष्ट्रवादी असून चालत नाही तर आचार विचार वाणी यांनी सुद्धा सुद्धा राष्ट्रवादी असावे लागते. राष्ट्रवादी असले की सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते, पगडी वरुन भेद करून चालत नाही. भुजबळ तुरुंगात गेले , त्यांच्या जाण्याने नाराज झालेल्यांची मने व त्यानिमित्ताने त्यांची मते आपल्याकडे वळावी म्हणूनच हा भुजबळांची पगडी बदलवण्याचा सोपस्कार पार पडला हे कळायला महाराष्ट्रातील जनता खुळचट नाही. पुणेरी पगडी ही काही कुण्या एका जातीची मक्तेदारी नाही. काही प्रज्ञावान राष्ट्पुरुष ती पगडी परिधान करायचे म्हणून त्या पगडीला एक मान आहे. परंतू मतांचे ध्रुवीकरण करून आपला सत्तेचा मार्ग सोयीस्कर करण्यासाठी राजकीय नेते नाना प्रकारचे राजकारण व युक्त्या करीत असतात त्यातीलच ही एक पगडीची युक्ती. संपूर्ण महाराष्ट्र हा एका झेंड्याखाली होता त्या महाराष्ट्रात आता निरनिराळे झेंडे झाले आहेत. विकासाची भाषा करण्या ऐवजी जातीभेद व व्देशाची बीजे रुजवली गेली आहेत. पगडी कोणती का असेना ती घालणा-याच्या डोक्यातील विचारांचे काय ? त्या पगडीखाली जर भ्रष्टाचार, गैरव्यवहार करणारी डोकी असतील तर त्या पगडीचा उपयोग तो काय ? तेंव्हा पगडी बदलून चालणार नाही ज्या डोक्यावर ती परिधान केली आहे त्या डोक्यात सकारात्मक , बेरजेच्या , विकासाभिमुख , पारदर्शक आणि मुख्यत: राष्ट्रवादी असे विचार असावेत. एखादा व्यक्ती जर भ्रष्टाचार, गैरव्यवहाराच्या गंभीर आरोप झालेला असेल , तुरुंगवास भोगून आलेला असेल त्याने किती का उंची वस्त्रे घातली, कोणती का पगडी घातली तरी त्याचा काही उपयोग नाही. मतांच्या धृवीकरणासाठी यापूर्वी अनेक बाबींचा उपयोग आजपावेतो करण्यात आला टोप्या झाल्या, रंग वाटले गेले , नाना प्रकारचे झेंडे झाले त्यातच आता पगडीची सुद्धा भर पाडली. परंतू जनतेने राजकारण्यांची चाल ओळखून , सर्व बाबी घ्यानात घेऊन जातीभेदाचे राजकारण करणा-यांना थारा न देता विकासाची भूमिका घेणारेच लोकप्रतिनिधी निवडून द्यावेत तरच देश प्रगतीपथावर जाईल    

०७/०६/२०१८

Article about sad demises of 6 eminent leaders of Maharashtra during last 12 years



12 वर्षातील राजकीय हानी 
हाराष्ट्रातील राजकारणात मातीशी नाळ असणारे नेते जे काही प्रमुख नेते होते, जे खेडोपाडी हिंडले होते, ज्यांनी जनतेच्या समस्या जवळून पाहिल्या होत्या असे नेते आता फार कमी आहेत व अशा नेत्यांची संख्या दिवसेंदिवस  कमीच होत आहे. निव्वळ चमकोगिरी करणा-या व पक्षनिष्ठ नसणा-या नेत्यांचा राजकीय पटलावर उदय होत आहे. महाराष्ट्रातील नेत्यांच्या बाबत बोलायचे झाल्यास 2006 ते 2018 या 12 वर्षात महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांवर काळाने घाला घातला. हे सर्व नेते मोठे होते, जनेतेतून पुढे आले होते , स्वकर्तुत्ववान होते , जनतेच्या समस्यांची चांगली जाण असलेले नेते होते. ते गरीबीतून वर आलेले होते. 12 वर्षांपूर्वी मे महिन्यात 2006 मध्ये #PramodMahajan प्रमोद महाजन यांची वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी हत्या झाली. त्यांच्या हत्येमुळे भाजपाची मोठी हानी झाली. भावी पंतप्रधान म्हणून ओळखल्या जाणारे महाजन जर असते तर आजचे राजकारण कदाचित वेगळे असते. त्यानंतर 2012 या वर्षी कॉंग्रेसचे लोकप्रिय नेते #VilasraoDeshmukhविलासराव देशमुख हे सुद्धा वयाच्या 67 व्या वर्षी गेले. विलासराव सुद्धा सरपंच पदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेले मातीशी नाळ असणारे, सर्व पक्षातील नेत्यांशी सलगी असणारे नेते होते. विलासरावांनंतर काही महिन्यातच आपल्या ‘रिमोट’ ने महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील राजकारण हालवणारे हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे #BalasahebThakre निवर्तले. आपली भाषणे, लेखणी, व्यंगचित्रे यांनी विरोधकांना भंडावून सोडणा-या बाळासाहेबांची जादू निराळीच होती.युती सरकार  सत्तेत येण्यास बाळासाहेबांचा करिश्मा हे एकमेव कारण होते. बाळासाहेबांच्या जाण्यानंतर दोनच वर्षानी 2014 मध्ये भाजपाच्या दणदणीत विजया नंतर “माधवं” फॉर्म्युल्या व्दारे सोशल इंजिनियरिंग करणारे भाजपाचे उपमुख्यमंत्री राहिलेले, युती टिकवण्यास सतत झटणारे गोपीनाथ मुंडे #GopinathMunde यांचे अपघाती निधन झाले त्यांच्या जाण्याने जनसामान्यांना मोठा धक्का पोहोचला. पुढच्याच वर्षी म्हणजे 2015 मध्ये आर आर पाटील वयाच्या 58 व्या वर्षी गेले. तासगावातील शरदरावांनी अचूक हेरलेला हा प्रामाणिक चहेरा राष्ट्रवादीचा चेहरा होता. निष्कलंक, सकारात्मक राजकारणी असेलेले, मातीशी जुळलेले आर आर पाटील #RRPatil सुद्धा अकाली गेले आणि नुकतेच भाऊसाहेब फुंडकर #BhausahebFundkar या शेतकरी पुत्र असलेल्या, तळागाळातील जनतेशी जुळून असलेल्या भाजपातील ज्येष्ठ नेत्याचे निधन झाले. त्यांच्या निधनाने भाजपा व फुंडकरांच्या कमर्भूमीची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने बुलडाणा जिल्ह्यातील भाजपा मध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दोनच वर्षापूर्वी मंत्रीपद मिळाले होते, मुलगा आमदार केंद्रात भाजपा ,राज्यात भाजपा म्हणजे आपल्या मतदारसंघात मोठा विकास करण्याची संधी त्यांच्याकडे आली होती खामगांवकरांना विकासाचे तसेच जिल्हा होण्याचे वेध लागले होते. भाऊसाहेबांना नेमके चांगले दिवस आले असतांनाच , त्यांच्या इतक्या वर्षाची मेहनत सफल होण्याची वेळ असतांनाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. 2006 ते 2018 या काळात प्रमोद महाजन, विलासराव देशमुख , बाळासाहेब ठाकरे , गोपीनाथ मुंडे , आर आर पाटील  व परवा भाऊसाहेब फुंडकर असे सर्व मातीशी जुळलेले, विकासाभिमुख, पक्षनिष्ठ असे नेते गेले. हे नेते असते तर राजकारणाची दिशा काही वेगळी असती. परंतू शेवटी नियतीला जे मंजूर असते तेच होत असते. दिवसेंदिवस राजकारणातून मातीशी नाळ असलेले नेते कमी होत आहेत. राजकारण म्हणजे स्वत:चा विकास अशी वृत्ती असणारे नेते पुढे येत आहेत या पार्श्वभूमीवर गेल्या 12 वर्षात या सहा प्रमुख नेत्यांचे निधन म्हणजे एक मोठी राजकीय हानी होय.      

०४/०६/२०१८

Article for a friend who is not in contact since many years

“जी एस” कुठे आहे बे?
शालांत परीक्षा संपली आणि कॉलेज मध्ये दाखल झालो. आम्ही कनिष्ट महाविद्यालयात होतो आणि तू वरिष्ठ. बी.एससी. ला. तुझी ती बिना ‘कॅरीअर’ ची सायकल, खांद्यावर शबनम बॅग, कुर्ता आणि पँट मोठ्या फ्रेमचा गॉगल असा तुझा वेश तुझ्याबाबत आकर्षण वाढवत होताच. नेहमी हसमुख आणि दिलखुलास असणा-या तुला तुझे  वर्ग मित्र "जी एस" असे संबोधत. मग आम्हीही तुला त्याच तुझ्या नावाच्या आद्याक्षराने संबोधू लागलो. तुझ्याशी परीचय झाला तो एनसीसीमुळे पुढे हा परिचय रोजच्या हँडबॉल खेळण्याने आधिक वाढला. तदनंतर मैत्री झाली व जी एस पाटील म्हणजे गजानन श्रीकृष्ण पाटील असे तुझे पूर्ण  नांव कळले. आणि त्यानंतर रोज संध्याकाळी म्युन्सिपल हायस्कूलच्या मैदानावर आपण सर्व हँडबॉल खेळत असू. खूप घामाघूम होऊन धकून खेळ झाला की तुझ्या त्या पोलीस निवासस्थानात येऊन आम्ही सर्व खास आमच्यासाठी भरलेल्या रांजणातील थंडेगार पाणी पिऊन तृप्त होऊन आपआपल्या घरी असा दिनक्रम कित्येक दिवस सुरु होता. हँडबॉलच्या सामन्यांसाठी आपण चंद्रपूरला गेलो होतो.वर्धा स्टेशनवर आपल्या जेवणाच्या डब्ब्याची खूप गमंत झाली होती. तुला चांगलेच आठवत असेल. पण त्या गंमतीमुळे तुला आलेला राग तुझ्या “स्पोर्टमन स्पिरीट’ मुळे लवकरच मावळला होता. नंतर तुझी  ती विना कॅरीअरची सायकल जाऊन तुझ्याकडे लुना आली मागे इंग्रजीत “हे जीएस’ असे लिहिलेली. खामगांव येथील शिक्षण संपवून  आपण सर्व विखुरल्या गेलो. “किस्मत मे जिनकी मिलना है , वो किस तरह भी मिल जाये” याप्रमाणे जळगांव खान्देशला अचानक एक दिवस तू आमच्या रुमच्या शेजारील घरात दिसला. तुला आवाज दिला ,पुनर्भेट झाली तू तेंव्हा “एम आर” होता. मग आपण रोज भेटत असू. परंतू एक दिवस पुन्हा तू गायब झाला, नेहमीच्या तुझ्या पद्धतीने काही गाठ भेट न घेता.केंव्हा,कुठे,कधी गेला काही कळले नाही. त्यानंतर आपले सर्व टीममेट नोकरी,व्यवसायाच्या शोधात होतेच तेंव्हा तू खामगांवला संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते, सेटअप सुद्धा छान केला होता. तद्नंतर माझ्या खामगांवात नसण्याने पुन्हा संपर्क तुटला. मी परत खामगांवला आलो तर तुझ्या केंद्राच्या ठिकाणी दुसरेच काही सुरु झाले होते.तू कुठे गेला हे पुनश्च एकदा एक गुपित झाले. कित्येक वर्षे  लोटली ,काळ बदलला,तंत्रज्ञान आले त्या अनुषंगाने सोशल मिडीया फोफावला,अरे अगदी शाळकरी मित्र सुद्धा फेसबुक व व्हॉट्स अॅप मुळे गवसले,आडनांव जरी बदलले असले तरी मैत्रिणी सुद्धा गवसल्या. टेलिफोनविना , एस एम एस विना , वा इतर कोणत्याही तंत्रज्ञानाचे सहाय्य न घेता भेटणारे आपण आज तंत्रज्ञान सहाय्यास असतांनाही संपर्कात नाही आहोत.तुझे नांव कित्येकदा सर्च करूनही तू मात्र काही सापडला नाही. कुठे आहेस ? कसा आहेस ? सोशल मिडीयाच्या सहाय्याने कदाचित हे पत्र तुझ्या पर्यंत पोहोचेल अशी आशा आहे. पोहचल्यास संपर्क कर. माझ्याप्रमाणेच सर्व मित्र सुद्धा “जी एस” कुठे आहे बे? अशी एकमेकांना विचारणा करीत असतात.

०१/०६/२०१८

Article on sad demise of Hon Agricuture Minister, Maharashtra State Mr Bhaushaheb Fundkar

खामगांवकरांचा ‘पांडुरंग’ गेला
काल सकाळी भाऊसाहेबांना देवाज्ञा झाल्याचे वृत्त मिळाले आणि धक्काच बसला. विश्वास बसत नव्हता.  परंतू नंतर माध्यमांवर बातमी पसरली. परवाच भाऊसाहेबांना टीव्हीवर पाहिले होते आणि आज अचानक त्यांच्या दु:खद  निधनाची बातमी येऊन धडकली. पांडुरंग पुंडलिक फुंडकर म्हणजे भाजपातील जेष्ठ नेत्यांच्या पंक्तीतील, नरखेड सारख्या छोट्या खेड्यातून, सर्वसामान्य शेतकरी घरातून शिक्षणा नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अभाविपच्या माध्यमातून पुढे आलेले जननेते होते. सरळमार्ग असल्याने जनतेचा पाठिंबा प्राप्त करत हा नेता वाटचाल करत राहिला, पक्षनिष्ठ राहिला, पक्षाचा जो काही आदेश असेल तो शिरसावंद्य मानीत राहिला. 1978 पासून आमदार म्हणून राजकीय प्रवास सुरु केला.तद्नंतर अनेक पदे विभूषित केली.राजकारणात अत्यंत संयमी पद्धतीने माणसे जोडत त्यांनी वाटचाल केली. एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आल्यामुळे स्वभाव निगर्वी होताच. तसा भाऊसाहेबांशी वैयक्तिक परिचय नव्हता परंतू 1991 मध्ये लोकसभा निवडणूक ते जिंकले त्यांची विजयी मिरवणूक पाहिली आणि त्यांचे नांव माहीत झाले. आम्ही तेंव्हा शालेय जीवनात असू. तेंव्हा भाऊसाहेब नऊ नंबर शाळेजवळ राहत असत त्यांच्या घराजवळच आम्ही खर्चे सरांकडे शिकवणी साठी जात असू त्यांचे ते साधे-सुधे घर व साधी राहणी जवळून पाहिली आणि जरी लहान असलो तरी हा नेता वेगळा आहे, सर्वसामान्यांसारखाच आहे, काही डामडौल नाही की   बडेजाव नाही ही कल्पना आली होती. म्हणूनच त्यांच्या त्या विजयी मिरवणूकीत सिव्हील लाईन मध्ये आपसूकच फटाके फोडण्यास हात सरसावल्या गेले होते. आता दोन वर्षापूर्वी भाऊसाहेब मंत्री झाल्यावर त्यांची जंगी मिरवणूक निघाली होती. आपल्या नेत्यावर जनतेचे किती प्रेम असते हे निदर्शित करणारी भर पावसातील त्या मिरवणूकीतील जनतेची अलोट गर्दी पाहून भाऊसाहेबांची लोकप्रियता लक्षात आली होती. मिरवणूक बालाजी प्लॉटमध्ये आल्यावर मी व माझे बंधू गणेश वरणगांवकर दोघांनी त्यांना दोन कमळाची फुले दिली तेंव्हा त्यांच्याच पक्ष चिन्हाची ती छोटी तरीही सूचक अशी भेट पाहून भाऊसाहेब दिलखुलास हसले आणि त्यांनी हस्तांदोलन केले होते. एकदा काही कार्या निमित्त भाऊसाहेबांना भेटण्यासाठी घरी गेलो, ते चांदे कॉलनीतील गजानन महाराज मंदिराबाबत कुणाशी तरी बोलत होते, त्यांनी बोलणे संपवले व
लगेच काय काम आहे? अशी आपुलकीने चौकशी केली व त्वरीत आमचे मित्र व भाऊसाहेबांचे सचिव जितेंद्र कुयरे यांना आमच्या कामाबाबत पुढील कार्यवाही त्वरीत करण्यास सांगितले. कालपासून त्यांच्या अनेक आठवणी ताज्या होत आहेत. पावसाळ्यात अकोला रोडवरून जातांना हमखास भाऊसाहेबांची आठवण येते. पावसाळा म्हटला की रिधो-या जवळ ‘ट्रॅफिक जाम’ ,वाहनांच्या लांबच लांब रांगा असे चित्र असे. रिधो-याचा जुना पुल अतिशय कमी उंचीचा होता, भाऊसाहेबांनी हे त्वरीत ध्यानात घेतले होते व त्यांच्या निधीतून तेथे नवीन पूल बांधला होता त्यानंतर कधीही पुरामुळे अकोला रोडवरची वाहतूक रिधो-याजवळ खोळंबली नाही.कालपासून अनेकांनी समाज माध्यमांवर आपल्या भावना व्यक्त करीत आहेत.एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या ब्लॉगवर भाऊसाहेबांप्रती व त्यांच्या पक्षनिष्ठतेप्रती सुंदर शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. पक्ष सत्तेत नसतांना, त्या नंतर कधी सत्तेत तर विरोधात अशी वाटचाल करीत भाऊसाहेब मंत्रीपदावर पोहोचले होते, मुलगा आमदार झाला होता खामगांवकरांसाठी हे भूषणावह होते आणि नियतीने नेमके याचवेळी खामगांवकरांच्या या ‘पांडुरंगास’ बोलावून घेतले याचे सर्वांनाच दु:ख झाले.