रिमझिम गिरे सावन
काल संध्याकाळी रिमझिम पाऊस पडत होता. त्यातच सोशल मिडीयावर 27 जून हा संगीतकार #RDBurman आर. डी बर्मनच्या जन्म दिवस असल्याचे कळले. मग आर.डी.नेच संगीतबद्ध केलेले “रिमझिम गिरे सावन” हे पाऊस गीत कसे काय नाही आठवणार? शीर्षक वाचता क्षणीच
संगीतप्रेमीना हे गीत नक्कीच आठवले असणार. हिंदी चित्रपटसृष्टीत पावसाची अनेक श्रवणीय , सुमधुर गीते आहेत. या गीतांवर लेख लिहू गेल्यास एक भला
मोठा लेख तयार होईल. तसे या विषयावर आधारीत अनेक लेख यापूर्वी प्रकाशित होऊन गेले आहेत. कृष्ण धवल जमान्यापासून ते आजपावेतो अनेक चित्रपटातून पाऊस गीते आलेली आहेत. यातील अनेक गीते उत्कृष्ट आहेत. त्याच पंक्तीतील “रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन” हे गीत आहे. अनेकांना भावणारे हे गीत वेगळ्याच विश्वात नेते, गीत सुरु होताच रसिक तन्मयतेने ते ऐकण्यास हमखास भाग पडतोच. अनेक संगीतकारांनी एका पेक्षा एक अशी सरस पाऊस गीते संगीतबद्ध केली आहेत. त्यातीलच हे एक सुमधुर गीत. 1979 मध्ये झळकलेल्या मंजिल या अमिताभ बच्चन #AmitabhBachchan व व मौसमी चॅटर्जी #MoushumiChhaterjee अभिनित चित्रपटातील हे गीत आहे. तसा मंजिल हा चित्रपट अमिताभचा विशेष गाजलेला असा चित्रपट नाही. अदालत, एक नजर, दो अंजाने, रास्ते का पत्थर,
“मै प्यासा तुम सावन” हे गीत असलेला फरार हे अमिताभचे कमी चर्चिल्या जाणारे, कमी पाहिले गेलेले चित्रपट आहे. यातीलच एक चित्रपट म्हणजे हा मंजिल. जरी हे चित्रपट व्यवसायिकदृष्ट्या ‘हिट’ नसले तरी या चित्रपटातील गाणी व
काही चित्रपटांचे कथानक खूप छान होते. मंजिलचे कथानक सुद्धा चांगले होते. श्रीमंत
मुलीवर भाळलेला एक गरीब तरुण तीला श्रीमंत असल्याचे भासवत असतो. जुने गॅल्व्हनॉमीटर
परत दुरुस्त करून अर्थात आजच्या भाषेत refurbish करून विकण्याच्या त्याचा व्यवसाय.
त्यात यश मिळावे म्हणून रात्रंदिवस त्याच विषयात रमणारा ध्येयपुर्ती साठी झटणारा,
त्यासाठी प्रसंगी वाममार्गाचा अवलंब करणारा तरुण अमिताभने छान साकारला आहे. आर. डी.
ने यात “रिमझिम गिरे सावन” या गीताचे दोन व्हर्जन संगीतबद्ध केले आहेत एक लताच्या तर
दुसरे किशोरच्या आवाजात. किशोरचे इन डोअर गीत अमिताभवर चित्रित केले आहे तर लताचे
आऊट डोअर, मौसमी व अमिताभ या दोघांवर पावसात चित्रित केलेले. दोन्ही गीते सुश्राव्य.
पहिले थोडे संथ तर दुसरे वेगवान. पडद्यावर बघण्यास व ऐकण्यास जास्त आनंद देणारे गीत
लताच्या आवाजातील आहे. अर्थात किशोरचे गीत सुद्धा काही कमी नाही. आउट डोअर गीतात सुंदर
फोटोग्राफी, मुंबईतील पाऊस, पावसामुळे रस्त्यांवर कमी गर्दी व त्या पावसात अमिताभ
व मौसमी मुंबईतील रस्त्यावर फिरत आहेत, पार्श्वभूमीला लताच्या आवाजातील वेगाने
पुढे जाणारे हे गीत सुरु आहे. पादचारी थबकून शुटिंग पहातांना या गाण्यात दर्शकांना दिसतात.
“इस बार सावन दहका हुआ है, इस बार मौसम बहाका हुआ है” तसेच “पहले भी युंही बरसे थे
बादल, पहले भी युंही भीगा था आंचल” या आशयाच्या कुणीतरी जोडीदार मिळाल्यावर नेहमीचाच पाऊस कसा वेगळा वाटायला लागतो हे सांगणा-या योगेशच्या #Yogesh सुंदर शब्दांत गुंफलेल्या ओळींना लता दीदी त्यांच्या सुमधुर आवाजात व्यक्त करतात. त्याच वेळी कधी मरीन ड्राईव्ह वर
फिरत, ओव्हल मैदानावरील चिखल तुडवत तर कधी चिंब पावसात भिजल्याने ओली झालेली खिशातील कागदे काढून फेकत पडद्यावर अमिताभ व मौसमी जोडीने पावसात भिजण्याचा अभिनय सुरेख
वठवला आहे. कुठेही अश्लीलता अथवा तत्सम हावभावाचा आधार दिग्दर्शकाला घेण्याची गरज
वाटली नाही. आर. डी. चे संगीत, शुद्ध हिंदीत “कंही दूर जब दिन ढल जाये”, “जिंदगी कैसी है पहेली”, “कई बार युंही देखा है” अशी गीते लिहणा-या योगेश या गीतकाराचे हे गीत,
पडद्यावर बिग बी, पावसातील मुंबईचे चित्रण या सर्वांमुळे हे सदाबहार गीत “ऑल टाईम हिट”
आहे.
मोठा लेख तयार होईल. तसे या विषयावर आधारीत अनेक लेख यापूर्वी प्रकाशित होऊन गेले आहेत. कृष्ण धवल जमान्यापासून ते आजपावेतो अनेक चित्रपटातून पाऊस गीते आलेली आहेत. यातील अनेक गीते उत्कृष्ट आहेत. त्याच पंक्तीतील “रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन” हे गीत आहे. अनेकांना भावणारे हे गीत वेगळ्याच विश्वात नेते, गीत सुरु होताच रसिक तन्मयतेने ते ऐकण्यास हमखास भाग पडतोच. अनेक संगीतकारांनी एका पेक्षा एक अशी सरस पाऊस गीते संगीतबद्ध केली आहेत. त्यातीलच हे एक सुमधुर गीत. 1979 मध्ये झळकलेल्या मंजिल या अमिताभ बच्चन #AmitabhBachchan व व मौसमी चॅटर्जी #MoushumiChhaterjee अभिनित चित्रपटातील हे गीत आहे. तसा मंजिल हा चित्रपट अमिताभचा विशेष गाजलेला असा चित्रपट नाही. अदालत, एक नजर, दो अंजाने, रास्ते का पत्थर,
“मै प्यासा तुम सावन” हे गीत असलेला फरार हे अमिताभचे कमी चर्चिल्या जाणारे, कमी पाहिले गेलेले चित्रपट आहे. यातीलच एक चित्रपट म्हणजे हा मंजिल. जरी हे चित्रपट व्यवसायिकदृष्ट्या ‘हिट’ नसले तरी या चित्रपटातील गाणी व
खूप छान लिहिले आहे
उत्तर द्याहटवा🙏
हटवासुंदर ब्लॉग
उत्तर द्याहटवा🙏
उत्तर द्याहटवा